व्हीएस न्यूज– पुण्याला जाणाऱ्या रेल्वे खाली सापडून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 22) रात्री साडेदहाच्या सुमारास तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन येथे घडली. दरम्यान, अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेदहाच्या तळेगाव रेल्वे स्टेशनमधील दोन लेनच्या मध्ये पुण्याला जाणाऱ्या अज्ञात एक्सप्रेस गाडी खाली सापडून या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचे वय अंदाजे 35 वर्षे आहे. उंची 5फूट 2 इंच, चेहरा गोल, अंगाने सडपातळ रंग नीम गोरा, लांब काळे केस, असे या महिलेचे वर्णन आहे.
तिच्या अंगात गुलाबी रंगाचा कुर्ता, पांढऱ्या रंगाचा सलवार, कानावर पिवळ्या धातुची कर्णफुले, बोटात 2 अंगठ्या, पायात पैंजण, असा पेहराव आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.वरील वर्णनाच्या महिलेला ओळखणाऱ्या व्यक्तिने पुणे रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.