व्हीएस न्यूज – महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दरवर्षी पवनाथडी जत्रा भरविण्याली जाते. स्वहस्ते निर्माण केलेल्या घरगुती वस्तू विक्री करण्यासाठी ही हक्काची बाजारपेठ मानली जाते. या जत्रेत सहभागी होण्यासाठी 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, जत्रा आयोजनात दरवर्षीप्रमाणे राजकीय हस्तक्षेप झाल्यास व्यवसायाला चालणा देणाऱ्या पवनाथडीला गालबोट लागण्याची भिती निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील महिला व बालकल्याण समितीअंतर्गत पवनाथडी आयोजित केली जाते. पवनाथडीच्या माध्यमातून शहरातील महिला बचत गटांच्या माध्यमातून जिज्ञासू महिलांनी घरात तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ही महत्वाची बाजारपेठ मानली जाते. पवनाथडीत जवळपास 800 स्टॉल्स उपलब्ध करून दिले जातात. हे स्टॉल्स मिळवण्यासाठी महापालिकेच्या हद्दीतील महिला बचत गटांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान बचत गटांनी स्टॉल्ससाठी अर्ज करायचे आहेत. त्यासाठी महिला बचत गटांच्या स्थापनेपासून बॅंकेतील व्यवहार, ठेवींवरील व्याजाची प्रतिपूर्ती, कर्ज हप्त्यांची परतफेड व सातत्य असलेल्या महिला बचत गटांनाच विचारात घेतले जाणार आहे. नवीन महिला बचत गटांना पवनाथडी जत्रेत सहभागी होण्यासाठी किमान दीड वर्षाचा कालावधी पूर्ण होणे नियमाधीन आहे. दीड वर्षाला एक महिना कालावधी अपुरा असल्यास अशा बचत गटांना जत्रेत सहभागी होता येणार नाही, अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत. विहित मुदतीत आलेल्या अर्जाचा यासाठी विचार केला जाणार आहे, असेही नागरवस्ती विकास योजना विभागाने सूचीत केले आहे.
प्रशासन म्हणते सांगवीत घ्या…
दरवर्षी पवनाथडीच्या आयोजनावरून पालिकेत राजकीय रणसंग्राम पहायला मिळतो. यावर्षी पवनाथडी आयोजनाचे ठिकाण अध्याप निश्चित झालेले नाही. बहुधा सांगवीतील पीडब्ल्युडी मैदानावर पवनाथडी 4 ते 8 जानेवारी 2018मध्ये आयोजनाचे प्रशासकीय नियोजन आहे. यामध्ये राजकीय हस्तक्षेपाने बदल होऊ शकतो. यापूर्वी पवनाथडी आयोजनात सांगवीला प्राधान्य दिले आहे. त्यानंतर पिंपरीलाही दोनवेळा मान देण्यात आला. मागच्या वर्षी भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या बाजुला मोकळ्या मैदानात जत्रा भरवून भोसरीलाही मान दिला आहे. मात्र, यावर्षी पवनाथडी कुठे आयोजित केली जाते? याबाबत प्रश्नचिन्हच आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002