व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेने हद्दीतील अनाधिकृत बाधकामांना शास्तीकर लागू केला आहे. या शास्तीकर दंडाच्या रकमेतून महापालिकेला ५३० कोटी एवढी रक्क्म मिळणार आहे. भाजपने महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता आल्यास शास्तीकर पुर्णत: माफ करण्याचे आश्वासन दिले होते. आता भाजपची सत्ता येऊन एक वर्ष होत आले. तरी आजपर्यंत शास्तीकर काय माफ होऊ शकला नाही. महापालिका करसंकलन विभागाने नागरीकांना शास्तीकराबरोबरच चक्रवाढ व्याज लाऊन नोटीस दिल्या आहेत. शास्तीकर भरला नाही तर मिळकती जप्त करण्यात येतील अशीही नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिकेने शास्तीकराच्या नावाखाली सावकारी धंदाच सुरु केल्याचा आरोप करत हा धंदा त्वरित बंद करण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. चक्रवाढ व्याज लाऊन नोटीसा देणे बंद करावे. तसेच शास्तीकर माफीच्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी भाजप नगरसवेकांच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे, आवाहनही त्यांनी केले. महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाच्या या मनमानी कारभारा विरूद्ध नागरीकांमध्ये मोठा असंतोष आहे. शहरातील अनेक नागरीकांनी रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन शास्तीकराच्या या प्रश्नाबाबत लक्ष घालण्याची विनंती केली.
खासदार बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शास्तीकराच्या नावाखाली चालवलेला सावकारी धंदा बंद करावा. महापालिका निवडणूकीत शहरवाशींना शास्तीकर माफीच्या दिलेल्या आश्वासनाची सत्ताधा-यांनी पुर्ती करावी. शहरातील कोणत्याही नागरीकांनी शास्तीकर तसेच त्यावर आकारण्यात येणारे व्याज भरू नये. भाजपाने दिलेल्या शास्तीकर माफीच्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी स्थानिक भाजपा नगरसेवकांच्या घरासमोर धरणे आंदोलन करावे. जेणेकरून त्यांनाही निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाची आठवन होईल.
पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी अनाधिकृत बांधकामे नियमीत करून शास्तीकर पूर्णत: माफ करण्याचे आश्वासन भाजपाच्या स्थानिक नेत्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी दिले होते. सत्ता मिळाल्यानंतर त्यांना त्याचा विसर पडत आहे. मी अनेकवेळा मुख्यमंत्र्यांना भेटून शास्तीकर पुर्णत: माफ करण्याची विनंती केली. परंतू, शासनाने शास्तीकर माफ केलाच नाही. उलट नागरीकांना चक्रवाढ व्याज लावून अधिक मनस्ताप दिला आहे. अनाधिकृत बांधकामे नियमीत करण्यासाठी जी नियमावली बनवली ती अधिक जाचक असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दंडाची प्रक्रीया असल्याने नागरीक अनाधिकृत मिळकती अधिकृत करण्यासाठी अर्ज करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. शास्तीकराचा दंड व व्याजाची रक्कम नागरीकांना परवडनारी नसल्याने जो पर्यंत पुर्णत: शास्तीकर पूर्वलक्षी माफ होत नाही तो पर्यंत कोणीही शास्तीकराची रक्कम भरू नये व शास्तीकर व त्याच्या चक्रवाढ व्याजाचा विरोध करावा, असे खासदार बारणे म्हणाले.
बारणे म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी अनाधिकृत बांधकामे नियमीत करून शास्तीकर पूर्णत: माफ करण्याचे आश्वासन भाजपाच्या स्थानिक नेत्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी दिले होते. सत्ता मिळाल्यानंतर त्यांना त्याचा विसर पडत आहे. मी अनेकवेळा मुख्यमंत्र्यांना भेटून शास्तीकर पुर्णत: माफ करण्याची विनंती केली परंतू शासनाने शास्तीकर माफ केलाच नाही. उलट नागरीकांना चक्रवाढ व्याज लावून अधिक मनस्ताप दिला आहे. अनाधिकृत बांधकामे नियमीत करण्यासाठी जी नियमावली बनवली ती अधिक जाचक असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दंडाची प्रक्रीया असल्याने नागरीक अनाधिकृत मिळकती अधिकृत करण्यासाठी अर्ज करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. शास्तीकराचा दंड व व्याजाची रक्कम नागरीकांना परवडनारी नसल्याने जो पर्यंत पुर्णत: शास्तीकर पूर्वलक्षी माफ होत नाही, तो पर्यंत कोणीही शास्तीकराची रक्कम भरू नये व शास्तीकर व त्याच्या चक्रवाढ व्याजाचा विरोध करावा असेही खासदार बारणे म्हणाले.
व्हीएस न्यूज - शहराच्या सौदर्यांला बाधा पाहेचवणा-या अनधिकृत फेरीवाल्यांवर दिवसांतुन दोनवेळा कार्यवाही करण्याच्या सूचना महापौर नितिन काळजे व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिल्या तर हॉकर्सझोनचे काम जानेवारी अखेरपर्यंत पुर्ण करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर नितीन काळजे यांचे अध्यक्षतेखाली हॉकर्सझोन संदर्भात् आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रविण आष्टीकर, क्षेत्रीय अधिकारी विजय खोराटे, चंद्रकांत इंदलकर अण्णा बोदडे, सदिप खोत, योगेश कडुसकर,आशा राऊत, आशादेवी दुरगुडे, सिताराम बहुरे आदी उपस्थीत होते. या वेळी बैठकीत राष्ट्रीयफेरीवाला धोरणांतर्गत महापालिका हददीतील क्षेत्रिय कार्यालय निहाय फेरीवाल्यांची संख्या, बायोमेट्रीक सर्वेक्षण झालेल्या प्रात्र फेरीवाल्यांची संख्या क्षेत्रिय कार्यालय निहाय निश्चीत केलेल्या झोनची संख्या, उपलब्ध हॉकर्स क्षमता,फिरते, स्थीर, व चल हॉकर्स,भक्ती शक्ती चौकातील खेळनीवाले,नोंदणी न केलेले फेरीवाले, अनधिकृत बॅनर्स, गटई कामगार आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
व्हीएस न्यूज – स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व मॉडर्न महाविद्यालय, यमुनानगर, निगडी यांच्या सहकार्याने नागरीकांमध्ये स्वच्छते विषयक जनजागृती व्हावी यासाठी गुरुवार दि. २५ जानेवारी २०१८ रोजी “स्वच्छ भारत सुदृढ भारत” या विषयावर शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध व कोलाज स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
यमुनानगर निगडी येथील मॉडर्न महाविद्यायात होणा-या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सोमवार दि.२२ जानेवारी ते बुधवार दि.२४ जानेवारी २०१८ पर्यंत उत्सर्फूतपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेण्यासाठीचे नियम व अटी पुढील प्रमाणे असणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयातील एक किंवा दोन विद्यार्थ्यांचा सहभाग असावा. अभिव्यक्तीचे माध्यम मराठी, हिंदी व इंग्रजी असे असेल. प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त पाच ते सात मिनिटे बोलण्याची परवानगी दिली जाईल. वक्तृत्व स्पर्धेचा विषय “स्वच्छ भारत, सुदृढ भारत” असा असेल. सादरीकरण, शब्दफेक, संदेश व जनजागृती या गोष्टी परिक्षणासाठी प्रामुख्याने पाहिल्या जातील. संयोजकांना स्पर्धेच्या नियमात बदल करण्याचा हक्क राहिल व संयोजकांचा निर्णय अंतिम राहिल. वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख बुधवार दि. २४ जानेवारी, २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजे पर्यंत राहिल. कोलाज स्पर्धेत सहभाग घेण्यासाठीचे नियम व अटी पुढील प्रमाणे असणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व एक किंवा दोन विद्यार्थी करु शकतील. कोलाज बनविण्यासाठी विषय दिल्यानंतर त्यासाठीचे लागणारा कागद जागीच पुरवला जाईल. स्पर्धेचा कालावधी २ तास ३० मिनिटे असेल. स्पर्धेत सहभाग घेणा-या विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी लागणारे साहित्य स्वत: आणणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी वृत्तपत्र व मासिकांसह तयार राहणे आवश्यक आहे. संयोजकांना स्पर्धेच्या नियमात बदल करण्याचा हक्क राहिल व संयोजकांचा निर्णय अंतिम राहिल. कोलाज स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख बुधवार दि. २४ जानेवारी, २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजे पर्यंत असणार आहे. निबंध स्पर्धेत सहभाग घेण्यासाठीचे नियम व अटी पुढील प्रमाणे असणार आहेत. स्पर्धेचा कालावधी ६० मिनिटे असेल. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी लागणारे साहित्य स्वत: आणावे. संयोजकांना स्पर्धेच्या नियमात बदल करण्याचा हक्क राहिल व संयोजकांचा निर्णय अंतिम राहिल. निबंध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख बुधवार दि. २४ जानेवारी, २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. या स्पर्धेच्या प्रवेशासाठी तथा अनुषंगीक माहितीसाठी आकाश चव्हाण (मो.क्र. 9881234771) यांच्याशी संपर्क साधावा. शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी “स्वच्छ भारत, सुदृढ भारत” या विषयावर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या या वक्तृत्व,कोलाज व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहआयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002