व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेने हद्दीतील अनाधिकृत बाधकामांना शास्तीकर लागू केला आहे. या शास्तीकर दंडाच्या रकमेतून महापालिकेला ५३० कोटी एवढी रक्क्म मिळणार आहे. भाजपने महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता आल्यास शास्तीकर पुर्णत: माफ करण्याचे आश्वासन दिले होते. आता भाजपची सत्ता येऊन एक वर्ष होत आले. तरी आजपर्यंत शास्तीकर काय माफ होऊ शकला नाही. महापालिका करसंकलन विभागाने नागरीकांना शास्तीकराबरोबरच चक्रवाढ व्याज लाऊन नोटीस दिल्या आहेत. शास्तीकर भरला नाही तर मिळकती जप्त करण्यात येतील अशीही नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिकेने शास्तीकराच्या नावाखाली सावकारी धंदाच सुरु केल्याचा आरोप करत हा धंदा त्वरित बंद करण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. चक्रवाढ व्याज लाऊन नोटीसा देणे बंद करावे. तसेच शास्तीकर माफीच्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी भाजप नगरसवेकांच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे, आवाहनही त्यांनी केले. महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाच्या या मनमानी कारभारा विरूद्ध नागरीकांमध्ये मोठा असंतोष आहे. शहरातील अनेक नागरीकांनी रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन शास्तीकराच्या या प्रश्नाबाबत लक्ष घालण्याची विनंती केली.
खासदार बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शास्तीकराच्या नावाखाली चालवलेला सावकारी धंदा बंद करावा. महापालिका निवडणूकीत शहरवाशींना शास्तीकर माफीच्या दिलेल्या आश्वासनाची सत्ताधा-यांनी पुर्ती करावी. शहरातील कोणत्याही नागरीकांनी शास्तीकर तसेच त्यावर आकारण्यात येणारे व्याज भरू नये. भाजपाने दिलेल्या शास्तीकर माफीच्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी स्थानिक भाजपा नगरसेवकांच्या घरासमोर धरणे आंदोलन करावे. जेणेकरून त्यांनाही निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाची आठवन होईल.
पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी अनाधिकृत बांधकामे नियमीत करून शास्तीकर पूर्णत: माफ करण्याचे आश्वासन भाजपाच्या स्थानिक नेत्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी दिले होते. सत्ता मिळाल्यानंतर त्यांना त्याचा विसर पडत आहे. मी अनेकवेळा मुख्यमंत्र्यांना भेटून शास्तीकर पुर्णत: माफ करण्याची विनंती केली. परंतू, शासनाने शास्तीकर माफ केलाच नाही. उलट नागरीकांना चक्रवाढ व्याज लावून अधिक मनस्ताप दिला आहे. अनाधिकृत बांधकामे नियमीत करण्यासाठी जी नियमावली बनवली ती अधिक जाचक असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दंडाची प्रक्रीया असल्याने नागरीक अनाधिकृत मिळकती अधिकृत करण्यासाठी अर्ज करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. शास्तीकराचा दंड व व्याजाची रक्कम नागरीकांना परवडनारी नसल्याने जो पर्यंत पुर्णत: शास्तीकर पूर्वलक्षी माफ होत नाही तो पर्यंत कोणीही शास्तीकराची रक्कम भरू नये व शास्तीकर व त्याच्या चक्रवाढ व्याजाचा विरोध करावा, असे खासदार बारणे म्हणाले.
बारणे म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी अनाधिकृत बांधकामे नियमीत करून शास्तीकर पूर्णत: माफ करण्याचे आश्वासन भाजपाच्या स्थानिक नेत्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी दिले होते. सत्ता मिळाल्यानंतर त्यांना त्याचा विसर पडत आहे. मी अनेकवेळा मुख्यमंत्र्यांना भेटून शास्तीकर पुर्णत: माफ करण्याची विनंती केली परंतू शासनाने शास्तीकर माफ केलाच नाही. उलट नागरीकांना चक्रवाढ व्याज लावून अधिक मनस्ताप दिला आहे. अनाधिकृत बांधकामे नियमीत करण्यासाठी जी नियमावली बनवली ती अधिक जाचक असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दंडाची प्रक्रीया असल्याने नागरीक अनाधिकृत मिळकती अधिकृत करण्यासाठी अर्ज करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. शास्तीकराचा दंड व व्याजाची रक्कम नागरीकांना परवडनारी नसल्याने जो पर्यंत पुर्णत: शास्तीकर पूर्वलक्षी माफ होत नाही, तो पर्यंत कोणीही शास्तीकराची रक्कम भरू नये व शास्तीकर व त्याच्या चक्रवाढ व्याजाचा विरोध करावा असेही खासदार बारणे म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002