व्हीएस न्यूज - - आजारपणाला कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी निगडीतील मिलिटरी माळ येथे पावणेतीन वाजता घडली. मुरप्पा झाजप्पा कलाल (वय 58 रा. राजनगर,ओटास्कीम, निगडी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार मुरप्पा हे आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास ते घरातून बाहेर गेले. दुपारी जेवायला परतले नाहीत म्हणून शोधशोध केली असता त्यांच्या पत्नीला मिलिटरी माळ येथे झाडाला गळफास घेतलेला त्यांचा मृतदेह आढळला. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.