व्हीएस न्यूज - एका सदनिकेचे कुलुप उचकटुन अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 62 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी बोपोडी औंधरोड येथे घडली.
दत्तात्रय राणे(वय 32 रा.औंधरोड बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणे यांचे डॉं. आंबेडकर चौक औंधरोड येथिल सत्संग भगन सोसायटीमध्ये सदनिका आहे. येथे राणे क्लासेस या नावाने ते विद्यार्थ्याची ट्युशन ही घेतात. त्यांचे पिंपळे गुरव येथे ही सदनिकि आहे. ते तेथे सध्या राहतात व सकाळी औंधरोड येथिल सदनिकेत येतात. शनिवारी संध्याकाळी ते सदनिकेस टाळे लावुन पिंपळे गुरव येथिल घरी गेले होते. रविवारी सकाळी औंधरोड येथिल सोसायटीचा सफाई कर्मचारी सफाई करित असताना त्याला राणे यांचे सदनिकेचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्याने तत्काळ राणे यांना कळवले. राणे तातडीने आले व त्यांनी सदनिकेत प्रवेश करुन पाहीले असता बेडरुम मधील कपाटातील 2 लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने तर रोख 62 हजार चोरी केल्याचे लक्षात आले. पोलिस उपनिरिक्षक निलेशकुमार महाडीक करीत आहेत.