व्हीएस न्यूज - भरधाव वेगातील अज्ञात मोटार चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पिंपळे-निलख येथील आंबेडकर पुलाजवळ घडली.
परमेश्वर पंढऱी पुलेवाड (वय-25, रा. गणेशनगर, पिंपळे-निलख) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याचा भाऊ ज्ञानेश्वर पुलेवाड (वय-31, रा. काळेपडळ) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर हा शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून पिंपळे-निलख येथे जात होते. भरधाव अज्ञात मोटारीन त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघात स्थळी न थांबता मोटार चालक पसार झाला. फौजदार एस. ए. बागुल अधिक तपास करत आहेत.