व्हीएस न्यूज - महापालिकेच्या अस्थापनेवरील नागरवस्ती विभागातील सहाय्यक आयुक्त सामूहिक विकास हे पद गेली 27 वर्षापासून रिक्त आहे. आतापर्यंत त्या जागेवर प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली असून महापालिकेतील अधिकाऱ्यांना सेवा जेष्ठतेनुसार जाणीवपूर्वक डावलण्यात येत असल्याचा आरोप समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी केला आहे. महापालिका अस्थापनेवर सहाय्यक आयुक्त (सामूहिक विकास) व समाज विकास अधिकारी या दोन पदांची निर्मिती केली आहे. त्यास 1 डिसेंबर 1989 अन्वये नागरवस्तीच्या दोन्ही पदास शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र या निर्णयानुसार महापालिकेच्या प्रशासनाने समाज विकास आधिकारी हे पद भरले आहे. तर सहाय्यक आयुक्त या अभिमानाचे एक पद कित्येक वर्षापासून भरलेले नाही. या पदासाठी एमएसडब्ल्यू ही शैक्षणिक पात्रता आहे. हे पद भरले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सहाय्यक आयुक्त ठराव क्रं. 913 नुसार संभाजी ऐवले यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. यामध्ये त्यांची शैक्षणिक आहर्ता व सेवाजेष्ठता आणि गोपणीय अहवाल आदिंचा तपशील विचारात घेवून त्यांना बढती देण्यास सर्वानुमते ठरावास मान्यता दिली आहे. मात्र पदोन्नती देण्यास डावलले जात आहे, असे ऐवले यांनी सांगितले.
नागरवस्ती विभागाच्या सहाय्यक आयुक्त सामुहिक विकास या पदावर पदोन्नती देण्यास सर्वसाधारण सभेने ठराव करुन सर्वानुमते मान्यता देवूनही महापालिका प्रशासन संभाजी ऐवले यांना पदोन्नती देण्यास डावलले जात आहे. या पदावर पदोन्नती मिळावी म्हणून समाज विकास अधिकार संभाजी ऐवले यांनी महापालिका आयुक्त, कर्मचारी महासंघ व निदेशक राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोग यांच्याकडे लेखी मागणी केली आहे.