पुलाच्या कठड्याला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू; दोघे जखमी
वाकड
2018-01-22
व्हीएस न्यूज - भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तरूणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. दुचाकीवरून इतर दोघे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास काळेवाडी पुलावर घडली.
संदेश सुरेश गवई असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी सलिम शेख (वय-20, रा. सदाशिव कॉलनी, थेरगाव) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री संदेश, सलिम व त्यांचा एक मित्र एकाच दुचाकीवरून काळेवाडीतील पुलावरून जात होते. संदेश भरधाव वेगाने दुचाकी चालवत होता. त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाच्या कठड्याला जावून धडकली. यामध्ये गंभीर तिघेही जखमी झाले. तर संदेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. ए. जाधव अधिक तपास करत आहेत.