व्हीएस न्यूज - ओढ्याच्या कडेला असलेल्या शिवरीच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने एका वाहन चालकाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी पुनावळे येथे उघडकीस आली. महादेव दत्तात्रय बारसकर (वय-45, रा. पुनावळे) असे आत्महत्या केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारसकर यांनी गुरूवारी सकाळी पुनावळे येथील ओढ्याच्या कडेला आले. त्यांनी शिवरीच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या मुलगा किरणने हा प्रकार पहिल्यानंतर त्यांना त्वरीत खाली उतरवत वायसीएम रग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यांच्य़ा आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. वाकड पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - अमृत योजने अंतर्गत चिखली, पिंपळे निलख व बोपखेल येथे मैलाशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येणार आहेत. शहरातील जुन्या २०९ किलोमिटर ड्रेनेज लाईन बदलण्यात येणार आहेत. त्यासाठी येणा-या सुमारे १५६ कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील २०१८-२०१९ या वर्षासाठी करांचे व करेत्तर शुल्क निश्चित करण्यास अंतिम मान्यतेसाठी महापालिका सभेकडे पाठविण्याची शिफारस स्थायी समिती सभेत करण्यात आली. यासह शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणा-या सुमारे २५७ कोटी ५३ लाख ९३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. शहरामध्ये ज्या मिळकतींना पाणी कनेक्शन नाही परंतु त्यांना स्वत्रंत कनेक्शन घेण्याच्या दृष्टीने महानगरपालिके मार्फत पाणीपुरवठा लाईन टाकणेत आलेली असते. निर्धारित तरतूदीनुसार त्याकरिता पाणी कनेक्शन नसणा-या मिळकतींना मिळकत करामध्ये पाणीपट्टी कर आकारणी करता येईल. त्या अनुषंगाने सन २०१८-२०१९ पासून पाणी कनेक्शन नसणा-या मिळकतींना मिळकत कराचे बिलात त्यांचे कर योग्य मूल्याचे ५% दराने पाणीपट्टी कर लागू करणेबाबत प्रस्तावित केले आहे. सन २०१८-१९ या वर्षाकरिता महानगरपालिका करांचे दर आणि करेत्तर बाबीची फी/शुल्क निश्चित करण्याचा व खाजगी मराठी माध्यामांच्या शाळा इमारतींना मालमत्ता कर हा बीगरनिवासी दराचे ऐवजी निवासी दराने आकारणी करणेस तसेच करयोग्यमूल्य निश्चित करणेकामी जे अ,ब,क,ड विभाग करणेत आलेले आहेत त्याची पुनर्रचना करण्यास मान्यता देणेकामी महापालिका सभेकडे पाठविण्याची शिफारस यावेळी बैठकीत करण्यात आली.
रहाटणी येथे कोकणे चौक ते काळेवाडी फाटा चौकापर्यंत उच्चक्षमता दृतगती मार्ग HCMTR विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे २८ कोटी ४५ लाख ५१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. २४ मध्ये नव्याने ताब्यात येणा-या आरक्षित जागेस सिमाभिंत बांधणे व उद्यान विकसित करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ५२ लाख ७० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पुनावळे प्रभाग क्रमांक ५२ आ.क्र.४-७१ येथे उद्यान विकसित करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ५४ लाख ०४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. च-होली येथील मैलाशुध्दीकरण केंद्राची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी येणा-या सुमारे २ कोटी ०७ लाख ०४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ७ च-होली येथील आ.क्र.२-६४ येथील उद्यानाची उर्वरित कामे करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ०८ लाख २२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी यांना इन्स्ट्रुमेंट मॅकेनिकल या व्यवसायाकरीता ट्रेनिंग वर्क बेंचेस खरेदी करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ०५ लाख ०४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
थेरगाव सर्व्हे.न.०९ येथे बहुउद्देशीय इमारत बांधण्यासाठी येणा-या सुमारे ११ कोटी ८० लाख ८७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. जुन्या तालेरा हॉस्पिटलची इमारत पाडुन नविन इमारत बांधण्यासाठी येणा-या सुमारे ३९ कोटी १३ लाख ७० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१८ मध्ये चापेकर चौक ते केशवनगर काळेवाडी रस्त्यांच्या क्रॉक्रीटीकरणाचा दुसरा टप्पा विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे ११ कोटी ०७ लाख १६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ०५ जाधववाडी कुदळवाडी मधील ताब्यात आलेल्या आरक्षणांच्या जागा विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ४७ लाख ५२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.५३ वाकड मध्ये नव्याने ताब्यात येणा-या जागेनुसार विकास आराखड्यातील रस्ते विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी २६ लाख ०६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
व्हीएस न्यूज - पिंपळे निलख येथील चौंधे पाटील स्पोर्टसच्या वतीने तिस-या वार्षिक इंटर सोसायटी स्पोर्टस मिटचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन रविवारी (दि. 11 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजता महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, आमदार महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका आरती चौंधे, ममता गायकवाड, नगरसेवक संदिप कस्पटे, तुषार कामठे, पीसीएमटीचे माजी चेअरमन सुरेश चौंधे आदी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती संचालक संकेत चौंधे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
या इंटर सोसायटी स्पोर्टस मिट अंतर्गत क्रिकेट, फुटबॉल, स्केटिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन आणि लॉन टेनिसच्या स्पर्धा होणार आहेत. वयोगट मुले व मुली 10,13 व 16 वर्षांखालील सोसायटी संघाने सहभाग घ्यावा. तसेच पुढच्या रविवारी (दि. 25 फेब्रुवारी) राजी सकाळी 6वाजता सर्व वयोगटातील इच्छुकांसाठी 2,4 व 6 किलोमीटर खुल्या मॅरेथोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ रविवारी 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 वाजता पिंपळे निलख येथील चौंधे पाटील स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे. या स्पर्धांमध्ये भाग घेऊ इच्छिना-या स्पर्धकांनी 9158961010 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - अतिशय कार्यक्षमतेने पुण्यातील सार्वजनिक बस वाहतूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली असून मुंढे यांच्या बदलीने पुणेकरांना धक्का बसला आहे. नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचबरोबर पुणे महापालिकेच्या उपायुक्त प्रेरणा देशभ्रतार यांचीही बदली करण्यात आली आहे. मागील काही काळापासून हे दोन्ही अधिकारी सत्ताधारी भाजप नेत्यांची डोकेदुखी ठरताना दिसत असल्यामुळेच त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजप नेत्यामुळे मुंढे यांची बदली झाली असल्याचा आरोप सेनेच्या गटनेत्यांनी केला आहे.
मुंढे यांनी पीएमपीएमएल कारभाराला शिस्त लावण्यासाठी सतत प्रयत्न केले. त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना घरी पाठवले होते. त्यामुळे कामगार संघटनाही त्यांच्यावर नाराज होत्या. पिंपरीत किंवा पुण्यात डॉ. श्रीकर परदेशी, तुकाराम मुंढे यांच्यासारखे कार्यक्षम अधिकारी हे आपला कार्यकाल पूर्ण करू शकत नाहीत, हे पुन्हा सिद्ध झाले. मुंढे यांनी गेल्या वर्षी २९ मार्चला पीएमपीएमएलचा कारभार हाती घेतला होता.
व्हीएस न्यूज - संशयावरून ताब्यात घेतलेल्या तिघांनी चार ठिकाणी घरफोडी केल्याचे पोलीस तपासात कबूल केले. त्यांच्याकडून तीन लाखांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई निगडी पोलीसांनी बुधवारी केली. सचिन गोरखनाथ काळे (वय-40, रा. जुना ओटास्कीम, निगडी), संतोष लालाजी पवार (वय-30, रा. आझाद चौक, झोपडपट्टी, निगडी), हमीद अंतुम शिंदे (वय-25, रा. गांधीनगर झोपडपट्टी, देहूरोड) असे अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्त घालणाऱ्या पोलीसांना कृष्णानगरमधील एका मेघमल्हार हौसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये तिघे संशयतरित्या पाहिल्याचे त्यांनी पाहिले. यावरून तिघांना ताब्यात घेवून त्यांची झाडाझडती घेतली. त्यांच्याकडील दोन कापडी पिशव्या सापडल्या. त्यांनी मेघमल्हार हौसिंग सोसायटीमध्येच घरफोडीसह इतर गुन्हे केल्याचे कबूल केले. आरोपीकडून 2 लाख 97 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 4 हजार 770 रूपयांचे मसाले, रोख रक्कम असा तीन लाख 1 हजार 770 रूपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षख गुन्हे निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देेवेंद्र चव्हाण, तात्या तापकीर, मंगेश गायकवाड आदींनी केली....Read More
व्हीएस न्यूज - कामावरून घरी जाणाऱ्या दुचाकीस्वार सीओडी कामगाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास मोरवाडी येथे ग्रेडसेपरेटरमध्ये घडली. सुनिल नारायण जाधव (वय-47, रा. गुलमोहर अपार्टमेंट, बालाजीनगर, वारजे, माळवाडी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. जाधव हे देहूरोड सेंट्रल ऑर्डनस डेपोमध्ये कामाला होते. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव बुधवारी दुपारी चारच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. मोरवाडीतील ग्रेडसेपटरमध्ये त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्यांनी हेल्मेट घातले होते. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ व डॉ.डी.वाय.पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीच्या डॉ.डी.वाय.पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविदयालय आकुर्डी यांच्या संयुक्त विदयामाने घाटघर कळसुबाई हरिषचंद्रगड अभयारण्यात वनस्पती शास्त्राच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दुर्मिळ औषधी वनस्पती अभ्यास करणे, त्यांचा अभ्यास करून तेथील आदिवासी बांधवांना त्याची जपवणुक कशी करावी याची माहिती देणे तसेच निसर्ग आणि जैवविविधता यांचा अभ्यास करणे हा हेतु होता. या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन प्रवरा इंन्स्ट्यूटचे कुलगुरू डॉ. वाय.एम.जयराज, स्वामी रांमानंदतीर्थ मराठवाडा विदयापीठाचे कुलगुरू डॉ. पंडीत विदयासागर उपस्थित होते. या परिषदेला महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठातील वनस्पतीषास्त्रातील तज्ञ व्यक्तींनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. सचिन पुणेकर, डॉ. मिलींद सरदेसाई, डॉ.डी.आर शिर्के, डॉ.महेश शिंदीकर यासारख्या वनस्पतीषास्त्रात अभ्यासक असणाऱ्या व्यक्ती होत्या. या परिषदेमध्ये सहभागी व्यक्तींना नाईट टक करणे, निसर्गाची पाहणी करणे, आपला इतिहास अभ्यासणे या गोष्टींचा अनुभव घेता आला. या परिषदेच्या आयोजनामध्ये महाविदयालयातील वनस्पतीशास्त्राच्या प्रमुख प्रा. अर्चना सुतार, ए. आर.सी.अंजली अकीवाटे, प्रा.हेमल ढगे,प्रा.मुकेष तिवारी यांचा समावेष होता. प्रास्ताविक प्रा. अंजली अकीवाटे यांनी केले. आभार प्रा.अर्चना सुतार यांनी मानले. ...Read More
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेक्टर क्रमांक येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी पुरवठा विभागाची नियमित दुरुस्तीसाठी आज (गुरुवार) शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. विद्युत विभागातील रावेत पंपीग स्टेशनमधील तातडीची आवश्यक कामांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. ...Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002