Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
हिरो सायकल्सची नवीन मॉडेल्स बाजारात

व्हीएस न्यूज - पश्‍चिम भारतातील बाजारपेठ अधिक मजबूत करण्याकरिता सायकल कंपनी हिरो सायकल्सने अनेक नवीन मॉडेलचे अनावरण केले. वजनाने हलकी असलेली ही मॉडेल मुलींच्या सायकली आहेत. अनावरण करण्यात आलेल्यांमध्ये मिस इंडिया श्रेणीत फ्लोरा आणि रीवा, ऑक्‍टोन श्रेणीत फायरफ्लाई आणि जाईफर तसेच स्प्रिंट श्रेणीतील एक्‍सप्लोड आणि झापपर यांचा समावेश आहे. हिरो सायकलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज मुंजाळ म्हणाले, सादर करण्यात आलेली ही सहा मॉडेल्स विक्रीच्या दृष्टीने खूपच आश्‍वासक आहेत.

डिलर मेळाव्यात बोलताना मुंजाळ पुढे म्हणाले की यापैकी काही मॉडेल्स भरपूर संशोधन आणि नियोजन केल्यानंतरच डिझाइन केले गेले आहे. लॉंच केलेल्या ऑक्‍टोन श्रेणीमधील बाइकचे वजन सर्वात कमी आहे. आजच्या पिढीच्या गरजा लक्षात घऊन स्पोर्टी आणि आकर्षक लुक ठेवण्यात आला आहे. हिरो साइकिलच्या देशभरातील 2200 वितरकांचे प्रचंड नेटवर्क आहे. या व्यतिरिक्त कंपनीने स्प्रिंट स्टोअर उघडणे देखील सुरू केली आहे.

...Read More

V. S. News
सुरक्षित बीआरटीसाठी जनजागृती मोहीम

व्हीएस न्यूज - बीआरटी मार्गावरून पादचारी व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मुंबईच्या आयआयटी संस्थेने उपस्थित केला होता. त्यानुसार शहरात सुरक्षित बीआरटी मार्गासाठी महापालिका सिग्नल व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणार आहे. याकरिता लवकरच एक संस्थेचे नेमणूक करणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पिंपरी महापालिकेने महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती, सत्तारुढ पक्षनेते, नगरसेवक, अधिका-यांसह आयुक्त श्रावण हर्डीकर हे शुक्रवारी (दि.3) अहमदाबाद दौऱ्यावरून परतले आहेत. याबाबत आयुक्‍त हर्डीकर म्हणाले की,अहमदाबाद बीआरटी प्रकल्प चांगला असून आपल्याकडेही जास्तीत जास्त सोयीस्कर बीआरटी राबविण्याचा प्रयत्न करीत आहोत, शहरातील प्रमुख चार मार्गावर बीआरटी सुरू झाल्यानंतर त्याचा फायदा शहरातील नागरिकांना होणार आहे. निगडी ते दापोडी मार्गावर बीआरटीचा चांगला प्रतिसाद मिळण्याचा विश्‍वास आहे.

मात्र, प्रवाशी व पादचा-यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित केला जातो. त्यासाठी पालिका वेगळा विचार करत आहे. सुरक्षाविषयक सुधारणा बीआरटी मार्गात करण्यात येणार आहेत. त्यानुसार या बीआरटी मार्गाचे नियोजन सुरू आहे. सुरक्षेच्या मुद्दयावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वर्ल्ड बॅंकेने पालिकेला परवानगी दिली आहे. या मार्गावर प्रवासी, नागरीक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच एक संस्था नेमली जाणार असून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्याला प्राधान्य दिले जाईल, असे आयुक्त हर्डीकर म्हणाले.

...Read More

V. S. News
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा निगडीत

व्हीएस न्यूज - स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ व वसुंधरा क्‍लब पुणे यांच्या वतीने निगडी येथे 11 ते 13 नोव्हेंबर कालावधीत किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पर्यावरण विषयक विविध लघुपट, अनुबोधपट प्रदर्शित केले जाणार आहेत. नदी वाचवा, जीवन वाचवा हा यंदाच्या महोत्सवाचा हेतू असणार आहे. यावेळी जल दिंडीचे प्रणेते डॉ. विश्‍वास येवले यांना यंदाचा वसुंधरा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष विनोद बन्सल यांनी दिली.

या महोत्सवाचे उद्‌घाटन शनिवारी (दि.11) नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, नगरसेविका शर्मिला बाबर उपस्थित राहणार आहेत. उद्‌घाटनानंतर लगेच पर्यावरण विषयक विविध लघुपट आणि अनुबोधपट प्रदर्शित केले जाणार आहेत. निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्राशी संबधित असलेल्या समस्या व आव्हानांचा शोध घेऊन, त्यावर कायमस्वरूपाची उपाययोजना व समाधान शोधून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारा हा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पिंपरी-चिंचवडमध्ये संपन्न होणार आहे.

शनिवारी (दि.11) सकाळी सहा वाजता एम्प्रेस गार्डन येथे निसर्ग अभ्यास सहलीचे ही आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता संभाजीनगर येथील नोव्हेल ज्युनिअर कॉलेजमध्ये गिर्यारोहण प्रात्यक्षिके, उपकरणांची माहिती दिली जाणार आहे. दुपारी चार वाजता सावरकर सभागृहात पर्यावरण बाजार (पर्यावरणपूरक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री) व निसर्ग विषयक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक लघुपटाचे प्रक्षेपण होणार आहे. सायंकाळी सहा वाजता घरातील ओल्या कच-यापासून बायोगॅस व खत निर्मिती या विषयावर कार्यशाळा होणार आहे.

दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा व वसुंधरा सन्मान पुरस्काराचे वितरण सोमवार सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. यावेळी खासदार अमर साबळे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्‍रीज अँड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष प्रमोद चौधरी उपस्थित राहणार आहेत. जल दिंडीचे प्रणेते डॉ. विश्‍वास येवले यांना वसुंधरा सन्मान तर व्यंकटेश भताने, सोमनाथ म्हसुडगे देहूगाव यांना वसुंधरा मित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे लाभ घेण्याचे आवाहन, आयोजकांनी केले आहे. यावेळी श्रीकांत मापारी, नरहरी वाघ, राजेश देशमुख,विजय सातपुते, भास्कर रिकामे आदी उपस्थित होते.

पवना नदी अभ्यास वर्ग

रविवारी (दि.12) सकाळी आठ वाजता चिंचवड येथील पवना नदी घाटावर भावसर व्हिजनच्या वतीने पवना नदी अभ्यास वर्गाचे आयोजन केले आहे. सकाळी दहा वाजता कदम सभागृहात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक लघुपट प्रक्षेपण होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता सायकल फॉर रिव्हर नदी वाचवा, जीवन वाचवा संदेश देणारी सायकल फेरी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ येथून सुरु होऊन पवना नदी घाटावर शपथ ग्रहण करण्यात येईल.

25हून अधिक शाळांमध्ये प्रबोधन

सोमवारी (दि.13) सकाळी सात वाजता देहूरोड येथील घोरावडेश्‍वर मंदिरावर निसर्ग सहल जाणार आहे. सकाळी दहा वाजता सावरकर सदनातील विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी चित्रपट व फोटो प्रदर्शनाला भेट देणार आहेत. या महोत्सवात शहरातील 25 पेक्षा जास्त शाळांमधून पर्यावरण प्रबोधन करणारे विषयक लघुपट दाखविले जाणार आहेत. नदी वाचवा जीवन वाचवा या विषयाशी संबधित निबंध स्पर्धा आयोजित केल्या असून दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

...Read More

V. S. News
अधिकारांचे विकेंद्रीकरण करुन पंचायतराज व्यवस्था अधिक सक्षम करावी – राज्यपाल

व्हीएस न्यूज - राज्य शासनाने विविध अधिकारांचे विकेंद्रीकरण करुन पंचायतराज संस्थांचे अधिक सक्षमीकरण करावे. ग्रामीण पंचायतराज संस्था अधिक सक्षम झाल्या तरच आपला देश गतिमान प्रगती करेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

राज्य निवडणूक आयोग, राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग, मुंबई विद्यापीठ आणि पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेमार्फत ‘73 व 74 व्या घटना दुरुस्तीची 25 वर्षे : प्रगती आणि भावी वाटचाल’ या विषयावर मुंबई विद्यापीठात परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे आज राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते उद्घाटन व पिंपरी चिंचवड महानगरापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत राबविण्यात आलेल्या मतदार जनजागृती विषयक माहिती व निवडणूक कार्यप्रणालीच्या पुस्तिकांचे प्रकाशन आज त्यांच्या हस्ते मुंबई विद्यापिठात झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ग्रामविकास व महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, आयुक्त श्रावण हर्डीकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु देवानंद शिंदे, केंद्रीय पंचायतराज विभागाचे निवृत्त सहसचिव टि. आर. रघुनंदन, ग्राम विकास खात्याचे सचिव असिम गुप्ता, निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चेन्ने, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जगदीश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल सी. विद्यासागर राव राव म्हणाले, 73 व 74 व्या घटना दुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार दिले. ग्रामिण व शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था अधिक संक्षम करण्यासाठी त्यांना आणखी अधिकार देण्याची आवश्यकता आहे. दोन दिवसीय या परिषदेमध्ये त्यावर विचार विमर्ष करुन शासनाला शिफारशी कराव्यात. राज्यात ग्रामीण पंचायतराज संस्थांकडे 29 पैकी 14 तर शहरी पंचायतराज संस्थांकडे 18 पैकी 10 विषयाचे हस्तांतरण करण्यात आले आहे. उर्वरीत विषय तथा अधिकारांचे हस्तांतरण करण्यासाठी टाइम बाउंड कार्यक्रम आखण्यात यावा. केरळ राज्यात याबाबतीत प्रभावी काम झाले आहे. त्याचा अभ्यास करण्यात यावा. पंचायतराज संस्थांचे सक्षमीकरण झाल्याशिवाय देशाचा विकास गतिमान होणार नाही, असे ते म्हणाले. आदिवासी भागातील ग्रामपंचायतीना 5 टक्के टिएसपी निधी थेट देण्याबाबत आपण अधिसूचना काढली. त्याचा परिणाम म्हणून 2016-17 मध्ये 5हजार 800 आदिवासी ग्रामपंचायतींना साधारण 214 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. या ग्रामपंचायतींना 10 ते 80 लाख रुपयापर्यंत निधी मिळाला ज्याचा या गावाच्या विकासकार्यात मोठा उपयोग होऊ शकला. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ (ता. आकर्णी) या गावाला तर 83 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकला. अशा पद्धतीने पंचायतराज संस्थांकडे अधिकार, निधी आणि साधनसामृगीचे विकेंद्रीकरण केल्यास आपण विकसीत भारत देशाचे स्वप्न लवकरात लवकर साकार करु, असे त्यांनी सांगितले. मतदार नोंदणी, जनजागृती करण्याबरोबरच राज्यात विविध निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे यावेळी राज्यपालांनी कौतूक केले. पिंपरी चिचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती करण्यात आली होती. सन २०१२ च्या सार्वत्रिक निवडणूकी मध्ये ५४ टक्के मतदान झाले होते. तर सन २०१७ च्या निवडणूकीत त्यामध्ये वाढ होऊन ६५.३५ टक्के मतदान झाले. त्याची मार्गदर्शक पुस्तिका करण्याच्या सुचना निवडणूक आयोगातर्फे देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मतदार जनजागृती व निवडणूक कार्यप्रणालीच्या पुस्तिका तयार केल्या. त्या पुस्तिकांचे प्रकाशन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्य़ात आले.

ग्रामविकास व महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ग्रामीण पंचायतराज संस्था अधिक सक्षम करु राज्यात ग्रामीण पंचायत राज संस्थांना महत्वपूर्ण अधिकारांचे 14 विषय, 102 योजना आणि 15 हजार 408 इतका कर्मचारी वर्ग हस्तांतरीत करण्यात आला आहे. उर्वरीत अधिकारांचे हस्तांतरण करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. हे हस्तांतरण लवकरात लवकर करुन राज्यातील ग्रामीण पंचायतराज संस्थांचे संपूर्ण सक्षमीकरण केले जाईल. राज्यातील 27हजार 900 ग्रामपंचायतींचे विकास आराखडे तयार करण्यात आले आहेत. वित्त आयोगाचा 15 हजार कोटी रुपयांचा निधी राज्यातील ग्रामपंचायतींना थेट उपलब्ध करुन दिला जाणार आहे. सरपंचाची थेट निवड करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अशा विविध निर्णयातून ग्रामीण पंचायतराज संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया म्हणाले, शांत, पारदर्शक निवडणुका लोकशाहीच्या सक्षमीकरणास पुरक पंचायतराज संस्थांच्या निवडणुका शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यात राज्य निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या माध्यमातून पंचायतराज व्यवस्था अधिक बळकट होण्याबरोबरच आपली लोकशाही अधिक सक्षम होण्यास मदत झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे मतदार नोंदणीचे प्रमाण मागच्या तुलनेत 70 टक्क्याने तर मतदानाचे सरासरी प्रमाण 11 टक्क्याने वाढले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी राज्य निवडणूक आयोगाच्या तसेच पंचायतराज विषयक विविध पुस्तकांचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

...Read More

V. S. News
राष्ट्रीय युवा आयोगाची स्थापना करावी - मोहन अनमोलू

व्हीएस न्यूज - केंद्र सरकारने राष्ट्रीय युवा आयोगाची स्थापना करावी. याबाबत खासदार चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली देशभर युवकांचे संघटन करुन जनजागृती करण्यात येत आहे. या आयोगाच्या माध्यमातून देशभरातील युवकांना विशेषता मागासवर्गीय, दलित, आदिवासी समाजातील युवकांना उच्चशिक्षण, उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत व तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले जावे. यासाठी सोशल मिडीयातून देखील चळवळ उभारण्यात येत आहे. अशी माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा समितीचे सदस्य आणि लोक जन शक्ती पार्टीचे प्रदेश युवा अध्यक्ष मोहन अनमोलू यांनी दिली.

पिंपरी येथे लोक जन शक्ती पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा समितीचे अध्यक्ष धुराजी शिंदे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना अनमोलू बोलत होते. यावेळी प्रदेश सचिव सचिन जाधव, शहर महिला अध्यक्षा सरिता जामनिक, पुणे शहर सल्लागार सुनिल जामनिक, पिंपरी चिंचवड सचिव अरुण मैराळे, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष दत्ता गोडपे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष दिनकर ओव्हाळ, अतुल जगताप, राहूल गागडे, अभिषेक वानखेडे,लक्ष्मण शिंदे, आकाश शिंदे, राजेश इंगळे, ज्ञानेश्वर बोरकर आदी उपस्थित होते.

अनमोलू यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, लोक जन शक्ती पार्टीचे संस्थापक आणि अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यकर्ते सर्व गरीब घटकांना अन्न पुरवठा सुरळीत व्हावा. तसेच सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत केंद्र सरकारकडून दिला जाणारा निधी वापरला जावा यासाठी काम करीत आहेत. संसदीय बोर्ड समितीचे अध्यक्ष खासदार चिराग पासवान यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांना त्यांच्या हक्काबाबत जागृत करण्याचे काम करीत आहे. सर्व शिक्षा अभियानासाठी केंद्र सरकारकडून दिला जाणारा निधी अनेक जिल्ह्यात वापरला जात नाही. तसेच पुणे, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातून स्वस्त धान्य दुकानदारांकडून गरीबांची पिळवणुक केली जाते. याबाबत अनेक तक्रारी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा समितीकडे आल्या आहेत. ग्रामिण भागातील स्वस्त धान्य दुकानदार शासनाकडून मिळालेले अन्नधान्य मद्य व वाईनरी उत्पादकांना, हॉटेल, ढाबा व्यवसायीकांना काळ्या बाजाराने विकत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत चौकशी करुन कारवाई करावी. अशी मागणी अन्न पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्याकडे केली आहे. लोक जन शक्ती पार्टी एनडीएतील उत्तर भारतातील मुख्य घटक पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची बैठक झाली. त्यानुसार लोक जन शक्ती पार्टीला देशभरातून लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी साठ जागा देण्याचे निश्चित झाले आहे. त्या अनुशंगाने महाराष्ट्रात पक्ष संघटना कामाला लागली आहे. विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातून लोकसभेला युवा उमेदवार उभे करण्याचा पक्षाचा मानस आहे. पुणे व पिंपरी चिंचवड मधून पक्ष बांधणीचे काम धुराजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगाने सुरु आहे. असेही अनमोलू म्हणाले. स्वागत शहराध्यक्ष धुराजी शिंदे, सुत्रसंचालन सचिन जाधव आणि आभार अरुण मैराळे यांना मानले.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड पॉलिटेक्नीक महाविद्यालयाला ‘सर्वेाकृष्ट विद्यार्थी चॅप्टर’ पारितोषिक

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड पॉलिटेक्नीक महाविद्यालयाला ‘सर्वेाकृष्ट विद्यार्थी चॅप्टर’ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

रिजनल इन्स्टिट्युट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी आणि युएसटी मेघालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुवाहाटी, आसाम येथे घेण्यात आलेल्या 20 व्या आयएसटीई राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेत महाराष्ट्र आणि गोवा विभागातून पिंपरी चिंचवड पॉलिटेक्‌नीक विद्यालयाची प्रथम क्रमाकांसाठी निवड करण्यात आली.

नवी दिल्ली आयएसटीईचे अध्यक्ष प्रा. प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पॉलिटेक्‌नीक विद्यालयाच्या प्राचार्या व्ही.एस.ब्यकॉड आणि प्रा. व्ही.एस. खरोटे चव्हाण यांनी पारितोषिक स्विकारले. यावेळी प्रमुख पाहुणे युएसटीएम विद्यापीठाचे कुलगुरु एम. हक, उपकुलगुरु प्राध्यापक अमरज्योती चौधरी, आयएसटीईचे उपाध्यक्ष डॉ. बाबारंजन शर्मा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे सचिव व्हि.डी. वैद्य, एआयसीटीईचे सल्लागार प्रा. डी. एन. मालखेडे आदी उपस्थित होते.

शैक्षणिक वर्ष 2016 - 17 मध्ये केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल महाराष्ट्र आणि गोवा विभागातून ‘सर्वेाकृष्ट विद्यार्थी चॅप्टर’हा पुरस्कार विद्यालयाला प्रथमच मिळाला आहे. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, संचालक डॉ.गिरीश देसाई, प्रशासकीय अधिकारी पद्माकर विसपुते यांनी विद्यालयाच्या प्राचार्या व्ही.एस.ब्यकॉड यांचे व प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

...Read More

V. S. News
ट्रकचे अपहरण करुन ट्रकचालकास मारहाण

व्हीएस न्यूज लिलावातील ट्रक विकत घेतल्याच्या रागातून चार जणांनी त्या ट्रकवरील चालकाचे अपहरण करुन त्यास मारहाण केली. तसेच मोबाइल हिसकावून घेतला आणि ट्रकचालकास लोहगाव वन विभागाच्या हद्दीत सोडून ट्रक घेऊन पसार झाले. ही घटना मंगळवारी (दि.31) रात्री साडे दहाच्या सुमारास भोसरी-आळंदी रस्त्यावरील मयुरी पॅलेससमोर घडली.

शिरुरमधील एका 52 वर्षीय ट्रकचालकाने फिर्याद दिली असून, याप्रकरणी सागर शिंदे व इतर तीन अनोळखी व्यक्‍तींवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी अमोल व रशीद यांच्याकडे ट्रकचालक म्हणून काम करतो. अमोल आणि रशीद यांनी यांनी आरोपी सागर शिंदे याचा ट्रक लिलावात विकत घेतला होता. याचा राग मनात धरुन आरोपी आणि त्याच्या मित्राने ट्रकसह चालकाचे अपहरण करून मारहाण केली. तसेच ट्रकचालकाचा मोबाइल हिसकावून घेवून त्याला लोहगाव वन विभागाच्या हद्‌दीत सोडून ट्रकसह पसार झाले. ट्रकमध्ये दोन ब्रास वाळूही होती. भोसरी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी.आर. कठोरे पुढील तपास करत आहेत

...Read More

V. S. News
रेशनिंग विक्रेत्यांना दिलासा

व्हीएस न्यूज लाभार्थीकडे आधारकार्ड नसले, तरीदेखील रेशनिंग वितरित करा,असा न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने रेशनिंग दुकानदारांना काहिसा दिलासा मिळाला आहे. मात्र, स्थानिक वितरण प्रणाली प्रशासनाने याबाबत कोणती भूमिका घेतली आहे, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.

आधारकार्ड लिंक केले नसल्याने, मध्यप्रदेशातील एका महिलेला रेशनिंगवरील धान्य न मिळू शकले नाही. त्यामुळे भूकेने तच्या दहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर न्यायालयाने हस्तक्षेप करत, लाभार्थीकडे आधारकार्ड नसले, तरीदेखील रेशनिंगवरील धान्य वितरित करण्याचे आदेश दिला आहे.

ऑनलाईन प्रक्रियेसाठी अन्न धान्य पुरवठा विभाग आहे. याकरिता रेशनिंग लाभार्थ्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आधारकार्ड रेशनिंग कार्डला लिंक करणे आवश्‍यक करण्यात आले आहे. यापुर्वी दुकानदारांना पॉस मशिन व ऑनलाईन चलन बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अन्नवाटपात कोणताही गैरप्रकार होऊ नये, याकरिता दैनंदिन कामकाजात ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब केला जात आहे. याला रेशनिंग विक्रेत्यांच्या दोन्ही संघटनांचा पाठिंबा आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील रेशनिंगच्या अ आणि ज झोन कार्यालयांतर्गत येणाऱ्या रेशनिंग लाभार्थ्यांचे आधारकार्ड रेशीनंग कार्डला लिंक करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सहा महिन्यात हे काम केवळ 50 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, या कामातही अनेक तांत्रिक चुका असल्याने, या चुका सुधारण्यात आलेल्या नाहित. अनेक लाभार्थ्यांचे चुकीचे आधारकार्ड क्रमांक लिंक केल्याने पॉस मशिनवर योग्य माहिती दाखविली जात नसल्याने हे लाभार्थी रेशनिंगपासून वंचित राहत आहेत. निगडीत सुरु असलेले हे काम काही दिवस बंद राहिल्याने या गोंधळात भरच पडली.

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर पॉस मशिनच्या माध्यमातुन वितरित केल्या जाणाऱ्या धान्यावरच सुधारित कमिशन दिले जाणार असल्याच्या अन्नधान्य पुरवठा विभागाच्या निर्णयाला रेशनिंग विक्रेत्यांचा विरोध आहे. आधारकार्ड लिंक न होणाऱ्या अडचणींना आम्ही कारणीभूत नसल्याचा रेशनिंग संघटनांचा युक्तिवाद आहे. मात्र, ऑनलाईन प्रक्रियेत आमचा सहभाग असून,पॉस मशिनबरोबरच आधार कार्ड लिंक नसलेल्या लाभार्थींना वितरित केल्या जाणाऱ्या धान्यावरदेखील सुधारित कमिशन मिळण्यासाठी रेशनिंग संघटना आग्रही आहेत.

अन्नधान्य पुरवठा विभागाच्या प्रत्येक सुधारणेला आमचा पाठिंबा आहे. मात्र, नविन नियमाचा अर्थ प्रशासन आपल्या सोयीनुसार घेत असल्याने संघटना व प्रशासनात मतभेद होतात. रेशनिंग दुकानदारांनादेखील कुटुंब आहे, याचा बहुधा प्रशासनाला विसर पडतो. त्यामुळे दोन महिन्यांपुर्वी संघटनेने सुमारे महिनाभर संप केला होता. सणा-सुदीच्या तोंडावर हा संप मागे घेतला आहे. प्रशासनाला आमचे कायम सहकार्य लाभत आहे. शासनानेदेखील आमच्या मागण्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार करावा, एवढीच माफक अपेक्षा आहे.

विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकीपर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य.

...Read More

V. S. News
उंदीर खरेदी घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक

व्हीएस न्यूज महापालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील सापांसाठी हाफकिन ही संस्था 75 पैसे दराने उंदीर देण्यास तयार असताना पालिका प्रशासन जीबी एन्टरप्रायझेस या खासगी संस्थेकडून 138रुपयाला एक उंदीर कशासाठी खरेदी करते? असा सवाल पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांनी उपस्थित केला आहे. या सर्व प्रकारामध्ये संबंधितांनी लाखो रुपयांचा घोटाळा केला असून प्राणी संग्रहालयातील अनागोंदी कारभाराची आयुक्तांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी अध्यक्ष वाघेरे यांनी केली आहे.

प्राणी संग्रहालयातील सापांसाठी खाद्य म्हणून पालिकेतर्फे उंदरांची खरेदी केली जाते. शहरातीलच हाफकिन ही संस्था एक उंदीर 75 पैशात देण्यासाठी तयार असताना जीबी एन्टरप्रायझेस या खासगी संस्थेकडून तब्बल 138 रुपयाला एक उंदीर खरेदी करण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त दैनिक प्रभातने प्रसिध्द करून हा अनागोंदी कारभाराला वाचा फोडली. त्यानंतर शहरातील सामाजिक संघटना, विरोधी पक्षातील नेत्यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे. यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा होत असल्याचा आरोप अध्यक्ष वाघेरे यानी केला आहे. याशिवाय बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात पालिकेने अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नाहीत. त्यामुळे येथील अजगर, मगरीची पिल्ले, मांडूळ यासारख्या प्राण्यांची चोरी झाली आहे. यासारख्या घटना थांबविण्यासाठी सुरक्षारक्षकांची, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज असताना इतर गोष्टींवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे.

पालिकेने प्राणी संग्रहालयातील नियम पायदळी तुडवत एका कर्मचाऱ्याला संग्रहालयाच्या आवारातच राहण्यासाठी घर उपलब्ध करुन दिले आहे. याविषयी अधिक माहिती देण्यास संबंधित उद्यानातील अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे वरील प्रकरणाची तत्काळ चौकशी करुन संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ही संजोग वाघेरे यांनी आयुक्‍तांकडे केली आहे.

...Read More

V. S. News
बीन्स कंटेनर खरेदीत भ्रष्टाचार ?

व्हीएस न्यूज पिंपरी चिंचवड पालिकेने खरेदी केलेले बीन्स कंटेनर संशयांच्या जाळ्यात आले आहेत. या खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाचे शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनीच एका निवेदनाद्वारे केला आहे. पुणे महापालिकेने देखील अशाच प्रकारचे कंटेनर खरेदी केले होते. पिंपरी चिंचवड महापालिकेने मात्र पुण्याच्या दुप्पट दराने हे कंटेनर विकत घेतले आहेत. या प्रकरणातील संबंधित ठेकेदार आणि प्रशासनातील अधिकारी याला जबाबदार असून त्यांच्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणास वाचा फोडणारे भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे, परंतु सोबतच सत्ताधारी पक्षाला प्रशासनाने अंधारात ठेवल्याचे सांगून पक्षाची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न ही ते करत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे अमोल थोरात यांनी याबाबत निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी 4.5 घनमीटरचे कंटेनर खरेदी करण्यात आले. त्यासाठी महापालिकेच्या भांडार विभागातर्फे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आणि एकूण 230 कंटेनर खरेदी करण्यात आले. आरोग्य विभागासाठी 4.5 घनमीटरचे एकूण 230 कंटेनर खरेदीची निविदा प्रसिध्द केली. यात मेसर्स निर्मिती इंजिनिअरिंग कार्पोरेशन आणि रेखा इंजिनिअरिंग या दोन पुरवठादार ठेकेदार संस्थांनी निविदा भरल्या. संबंधित पुरवठादार ठेकेदारांनी कंटेनरचा प्रति नग दर 74 हजार 777 रुपये असा दिला.

ऑनलाईन आणि गुप्त पध्दतीने राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत दोन पुरवठादारांनी सादर केलेले दर तंतोतंत एकसारखे असणे अशक्‍य असते. मेसर्स निर्मिती इंजिनिअरिंग कार्पोरेशन आणि रेखा इंजिनिअरिंग या दोन पुरवठादार ठेकेदार संस्थांकडून आलेले दर संशयास्पद आहेत, असे थोरात यांनी म्हटले आहे. महापालिका अंदाजपत्रकीय दरानुसार 1 कोटी 75 लाख 95 हजार रुपये किंमतीची निविदा होती. मात्र, निविदाकारांकडून एक कोटी 71लाख 75 हजार 710 रुपये असा लघुत्तम दर प्राप्त झाला. पालिकेच्या अंदाजपत्रकीय दरानुसार सदरचा दर 2.38 टक्‍क्‍यांनी कमी होता. त्यानुसार मेसर्स निर्मिती इंजिनिअरिंग कार्पोरेशन या पुरवठादार ठेकेदार संस्थेकडून 115 आणि रेखा इंजिनिअरिंग या पुरवठादार ठेकेदार संस्थेकडून 115 असे एकूण 230 कंटेनर 74 हजार 777 रुपये प्रति नग दराप्रमाणे खरेदी करण्यात आले.

लघुत्तम निविदाकार हा निकष लावत मेसर्स निर्मिती इंजिनिअरिंग कार्पोरेशन या पुरवठादार ठेकेदार संस्थेला 85 लाख 87 हजार 855 रुपये आणि रेखा इंजिनिअरिंग या पुरवठादार ठेकेदार संस्थेला 85 लाख 87 हजार 855 रुपये अशा पध्दतीने निविदा विभागून देण्यात आली होती. मात्र, पुणे महापालिकेने 3.8 घन मीटरचे बिन्स कंटेनरची नुकतीच खरेदी प्रति नग 34 हजार रुपये दराने केली. ज्याअर्थी 3.8 घनमीटरचा कंटेनर केवळ 34 हजार रुपयांना उपलब्ध होत आहे, त्याअर्थी 4.5 घनमीटरचा कंटेनर 40 हजार रुपये दरात सहज उपलब्ध होऊ शकतो; मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 4.5 घनमीटरच्या बिन्स कंटेनरच्या प्रति नगासाठी 74 हजार 777 रुपये दर देण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या तुलनेत दुप्पट दराने ही खरेदी होत असल्याचे यातून दिसून येते, असे थोरात यांनी म्हटले आहे.

अधिकारी, ठेकेदारांवर कारवाईची मागणी

कंटनेर खरेदी प्रक्रियेत घोटाळा झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन यातील संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर आणि कंटेनरचा चुकीचा तपासणी अहवाल देणाऱ्या मोरवाडी आयटीआयच्या संबंधित निदेशक, प्राचार्य आदींवर योग्य कारवाई करण्यात यावी. या सर्वांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. संबंधित निविदाकार अर्थात पुरवठादार ठेकेदार संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, चुकीचा दर देऊन भ्रष्टाचार केला आहे. तसेच पालिकेची आर्थिक फसवणूक करून आणि निविदेतील अटी-शर्तीनुसार दर्जेदार मालाचा पुरवठा न केल्याप्रकरणी संबंधित पुरवठादार ठेकेदार संस्थांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. ठेकेदारांकडून खरेदी व्यवहारातील रक्‍कम वसूल करण्यात यावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

...Read More

V. S. News
ट्रकच्या धडकेने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

व्हीएस न्यूज - डंपरची दुचाकीला धडक बसल्याने एका महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयाजवळ गुरुवारी(दि.2) सकाळी नऊच्या सुमारास घडली. आशिष दीपक पावसकर (वय, 19 रा. शुभश्री सोसायटी, आकुर्डी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघातामध्ये त्याचा मित्र रोशनदीप दिलीपकुमार मेकाप हा जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रकचालक शिवकुमार हरिराम डांगे (वय 48, अशोकनगर, मध्यप्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष हा ताथवडे येथील एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होता. गुरुवारी (दि.2)सकाळी आशिष व त्याचा मित्र रोशनदीप दुचाकीवरुन खंडोबा चौकातून म्हाळसाकांत चौकात जात होता. यावेळी त्याच्या दुचाकीला ट्रकची धडक बसली. यात आशिषच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. यामुळे तो जागीच मरण पावला. या अपघातात रोशनदीप गंभीर जखमी झाला आहे.

आशिषचे वडील मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत अभियंता म्हणून काम करतात, तर आई चिंचवडमधील एका खासगी महाविद्यालयात शिक्षिका असून, तो आईसोबत आकुर्डीत राहत होता. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!