Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
मुंबई-विशाखापट्टणम एक्सप्रेसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

व्हीएस न्यूज - मुंबई-विशाखापट्टणम एक्सप्रेसच्या धडकेत अनोळखी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकात घडली. मृत्यू झालेल्या महिलेचे वय अंदाजे 40 असून अद्यापर्यंत ओळख पटली नाही. ही महिला आकुर्डी रेल्वे स्थानकातील रेल्वे फलटाच्या शेवटी थांबली होती. त्यावेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई-विशाखापट्टणम एक्सप्रेसची जोरात धडक तिला बसली. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला.
महिलेचे वय अंदाजे 40 आहे. अंगावर गुलाबी रंगाची साडी आणि काळा ब्लाऊज परिधान केला आहे. संबंधित महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु असून रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या घरावर छापा

व्हीएस न्यूज - पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या घरावर मंगळवारी आयकर विभागाने छापा टाकला. येथील बाणेर परिसरातील वीरभद्र नगरमध्ये बाबुराव चांदेरे यांचे घर आहे. या ठिकाणी आज सकाळी साडेसहाच्या सुमारास आयकर विभागाचे पथक येऊन धडकले. सध्या हे अधिकारी चांदोरे यांच्या घरी चौकशी करत आहेत. बाबुराव चांदोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांपैकी एक आहेत. ते अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. बाबुराव चांदोरे आतापर्यंत तीनवेळा नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यांनी कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणुकही लढवली होती. मात्र, त्यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांचे अनेक व्यवसाय होते. काही दिवसांपूर्वीच मुलाच्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. पुण्यात या लग्नाची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आज सकाळी साध्या वेषातील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी चांदेरे यांच्या घरावर छापा टाकला. आयकर विभाग आणि पोलिसांचे पथक अजूनही याठिकाणी उपस्थित असून चांदेरे यांची चौकशी केला जात आहे. मात्र, या कारवाईमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

...Read More

V. S. News
चाकणमध्ये डोक्यात दगड घालून युवकाची हत्या

व्हीएस न्यूज - चाकण एमआयडीसी परिसरात एका युवकाची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. एमआयडीसीतील मर्सिडीज बेंझ कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला. ही घटना आज (मंगळवार) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी हद्दीत सारा सिटी ते मर्सिडीज बेंझ कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला ३५ वर्षीय युवकाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही हत्या कोणी व कशासाठी केली हे अद्याप समजू शकलेले नाही. डोक्यात दगड घातल्याने मृतदेहाची ओळखही पटू शकलेली नाही. मृताकडे आढळून आलेल्या ऐवजावरून चाकण पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

...Read More

V. S. News
भाजपकडून पिंपरीतही ‘जल्लोष’

व्हीएस न्यूज - गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले. या विजयाचा पिंपरी चिंचवड शहर भाजपच्यावतीने मोठा जल्लोष करण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पदाधिकार्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. तर महिला पदाधिकार्यांनी फुगडी खेळून विजयोत्सव साजरा केला.

यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, महिला अध्यक्षा शैलजा मोळक, प्रदेश सदस्या उमा खापरे, सरचिटणीस प्रमोद निसळ, अमोल थोरात,नगरसेवक शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, विलास मडिगेरी, माऊली थोरात, शैलेश मोरे, उत्तम केंदळे, नामदेव ढाके, सागर गवळी, नगरसेविका कमल घोलप तसेच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...Read More

V. S. News
कर्जासाठी नागरिकांना ‘ना हरकत दाखला’ मिळावा - चिखले

व्हीएस न्यूज - प्राधिकरण, निगडी, यमुनानगर, साईनाथनगर या भागातील तब्बल सात हजार घरे स्वत:च्या मालकीचे असतानाही ती केवळ रेड झोनच्या हद्दीत येत असल्याने त्यांना राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे स्वत:चे घर असूनही रहिवाशांना कर्ज मिळत नसल्याने आर्थिक कुंचबणा होत आहे. त्यात प्राधिकरणही कर्जासाठी ‘ना हरकत दाखला’ देत नसल्याने रहिवाशी आर्थिक कात्रीत सापडले आहे. या नागरिकांना ना हरकत दाखले देण्याची मागणी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.

याप्रकरणी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत मोटे यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना सचिन चिखले म्हणाले, पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण विकास प्राधिकरणाच्या हद्दीत सदर भाग येतो. सन १९७२ मध्ये स्थापन झालेल्या प्राधिकरणाने भूखंडावर स्वत: बांधकाम करून इमारती विकल्या आहेत. प्राधिकरण स्थापन झाल्यापासून सुमारे ४५ वर्षे या परिसरामध्ये अनेक रहिवाशी राहत आहेत. त्यातील असंख्य रहिवासी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना मुले-मुलीचा विवाह, परदेशात जाणे, इतर कारणांसाठी आर्थिक रक्कमेची गरज भासते. मात्र, त्यासाठी कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका स्पष्ट नकार देत आहेत.

प्राधिकरण, निगडी, यमुनानगर, साईनाथनगर परिसरातील घर मालकांना ही समस्या भेडसावत आहे. त्यांची घरे ४५ वर्षे जुनी असताना सन १९९८-९९ मध्ये रेड झोन हद्दीचा प्रश्‍न समोर आला. यामध्ये संबंधित रहिवाशांचा कोणताही दोष नाही. तरीही, त्यांना बँका कर्ज नाकारत असल्याने त्यांची आर्थिक कुंचबणा होत आहे, असे चिखले यांनी सांगितले. मोटे यांनी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे सदर प्रकरण सादर करणार असल्याची ग्वाही दिल्याचे,सचिन चिखले यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
युवराज दाखले यांच्या नुतन वर्षे दिनदर्शिका २०१८ चे खासदार संजयजी राऊत यांच्या हस्ते प्रकाशित

व्हीएस न्यूज - शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना शहरप्रमुख युवराज भगवान दाखले यांनी तयार केलेल्या जानेवारी २०१८ नविन वर्षे दिनदर्शिका प्रकाशन शिवसेना नेते खासदार संजयजी राऊतसाहेब यांच्या शुभ हस्ते मुंबई या ठिकाणी करण्यात आले यावेळी राऊत साहेबांनी दिनदर्शिकेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या .

यावेळी जेष्ठ निष्टावंत शिवसैनिक किशोर पाटील , शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना शहर प्रमुख युवराज दाखले , उपशहरप्रमुख गणेश आहेर ,चिंचवड विधानसभा प्रमुख निलेश भोरे, उपविधानसभा प्रमुख राज श्रीमंत गिरी ,शिवसैनिक रोहीदास तांबे आदी उपस्थित होते .

...Read More

V. S. News
जाब दो आंदोलन ...

व्हीएस न्यूज - शनिवार दिनांक १६/१२/२०१७ रोजी सायंकाळी बहुजन समाजातील तसेच प्रामुख्याने मातंग समाजाच्या कोणत्याच वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेऊन साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा निगडी येथील अधिकृत पुतळा पिंपरी चिंचवड महानरपालिका व भाजपा सत्ताधारी यांच्या संघनमताने काढला याच्या निषेधार्त जाब दो आंदोलन करण्यात आले.

वास्तविक पाहता सदरचा अधिकृत पुतळा निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवनात बसविणे आपेक्षित होते व त्या कामी समाजातील वरीष्ट नेत्यांनी महानरपालिका प्रशासनाला वेळोवेळी कल्पना दिली होती. या गोष्टींचा गांभीयाॕने विचार भाजपा सत्ताधारी व महानरपालिका प्रशासनाने केला नाही यांच्या निषेधार्त बहुजन समाजाच्या विविध संघटनेच्या व सर्व राजकीय पक्ष्यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानरपालिका प्रशासनाला व भाजपा सत्ताधार्यांना जाब दो आंदोलन सोमवार दिनांक १८/१२/२०१७ रोजी रोजी सकाळी ११वाजता करण्यात आले.
यावेळी जेष्टनेते भाऊसाहेब अडागळे ,राष्ट्रवादी काँग्रेस पाटीॕचे तथा मांतग समाजाचे नेते संदिपान झोंबाडे ,मा आध्यक्ष नानासाहेब कसबे ,जयंती मोहत्सव आध्यक्ष तथा संजय गाधी निराधार योजना पिंपरी विधानसभा आध्यक्ष नितीन घोलप,कार्याध्यक्ष संजय ससाने ,काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे आध्यक्ष विशाल कसबे ,भारतीय लहुजी सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश गवारे,शिवव्यापारीसेना महीला संघटीका भाग्यश्री ताई म्हस्के शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना शहरप्रमुख युवराज दाखले ,उपशहरप्रमुख गोरख पाटील ,गणेश पाडुळे ,चिंचवड विधानसभा प्रमुख निलेश भोरे ,रा स पा शहर आध्यक्ष भरत महानवर ,आण्णा कसबे ,ज्ञानेश्वर चव्हाण ,दिपक लोखंडे बापु वाघमारे ,सन्मयक विद्यार्थी परिषधेचे आध्यक्ष संतोष जोगदंड भाजपा चे बाळासाहेब खंदारे आदी प्रमुख कायकतेॕ उपस्थित होते.
या जाब दो आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना शहरप्रमुख तथा अण्णा भाऊ साठे जयंती मोहत्सव मा आध्यक्ष युवराज दाखले व जयंती मोहत्सव विद्यमान कार्याध्यक्ष संजय ससाने यांनी केले.
...Read More

V. S. News
पिंपळे गुरव येथे महापालिकेच्या इमारतीत अनधिकृत अनाथालय

व्हीएस न्यूज - पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या सांस्कृतिक भवनात अनधिकृतपणे अंध, अनाथ केंद्र सुरू असून या केंद्रातील मुले अनाथ नाहीत. संस्थाचालक मुलांच्या पालकांकडून फी घेत आहेत. त्यामुळे महापालिकेने ही इमारत मोकळी करून ताब्यात घ्यावी, अशी तक्रार माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी शनिवारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
जगताप यांनी आपल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, पिंपळे गुरव येथे महापालिकेने बांधलेल्या इमारतीत सध्या तुषार कांबळे हे ममता अंध अनाथ केंद्र चालवीत आहेत. या केंद्रातील मुले अनाथ नसून त्यांना पालक आहेत. या पालकांकडून सदर संस्था फी घेत आहे. त्याचबरोबर परिसरातील प्रतिष्ठीत व्यक्तींना भावनिक आवाहन करून आर्थिक व वस्तू स्वरुपात मदत घेऊन स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जात आहे. काही भाजपा नेते आणि नगरसेवक यांना हाताशी धरून त्यांच्यामार्फत या सांस्कृतिक भवनाचा गैरवापर केला जात आहे. या संस्थेकडून महापालिकेस कोणतेही आर्थिक उत्पन्न दिले जात नाही. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे या संस्थेची चौकशी करून ही इमारत महापालिकेने आपल्या प्रशासकीय कामासाठी वापरात आणावी अथवा सदर संस्थेस कायदेशीर करार करून भाडेतत्वावर वापरण्यास द्यावी. संस्थेत शिकणाऱ्या मुलांबाबत आपले काही मत नाही परंतु या विद्यार्थ्यांच्या नावाखाली जो गैरकारभार सुरू आहे त्याला पायबंद घालावा अशी मागणी जगताप यांनी आयुक्तांकडे केली आहे.
...Read More

V. S. News
हिंजवडीत ट्रक, सांगवीत दुचाकी जाळली

व्हीएस न्यूज - घरासमोर पार्क केलेला ट्रकला व एका दुचाकीला आग लावून जाळण्याचा प्रयत्न केला. हिंजवडीत ट्रक जाळण्याचा तर सांगवीत दुचाकी जाळण्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. हिंजवडीतील घटनेप्रकरणी नितीन दगडे (वय-45, रा. बावधन-बुद्रुक) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दगडे यांचा एमएच 12, डीटी 4005 हा ट्रक घरासमोरील शिवसेना ऑफिसच्या पाठीमागे लावला होता. रविवारी रात्री अज्ञात इसमाने ट्रकला आग लावून जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. दुचाकी जाळल्या प्रकरणी समाधान मोटे (वय-39, रा. पिंपळे-निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोटे यांनी एमएच 12 पीक्यु 2862 ही दुचाकी घरासमोरील मोकळ्या जागेत पार्क केली होती. रविवारी रात्री अज्ञात आरोपीने दुचाकीला आग लावून जाळली. हिंजवडी आणि सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
पिंपरीगावात साडेतीन लाखांची घरफोडी

व्हीएस न्यूज - कुलूप लावून बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. शयनगृहातील कपाटामधील रोख अडीच लाख, सोन्याचे दागिने असा तीन लाख 67 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी पिंपरीगावातील प्रसुन्न शिव अपार्टमेंटमध्ये घडली. तन्मय दातीर (वय-32, रा. प्रसुन्न शिव अपार्टमेंट, पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दातीर यांचा रविवारी दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत फ्लॅट कुलूप लावून बंद होता. या कालावधीत चोरट्याने कुलूप तोडून शयनगृहातील कपाटामधील रोख अडीच लाख, सोन्याचे दागिने असा तीन लाख 67 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. फौजदार ठुबल अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
पुर्ववैमनस्यातून तीन महाविद्यालयीन तरूणावर वार

व्हीएस न्यूज - पुर्ववैमनस्यातून तीन महाविद्यालयीन तरूणावर तिघांनी धारदार कटरने वार केले. ही घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरीतील सद्‌गुरूनगर येथील गणपत लांडगे चाळीत घडली. मंगेश धनदक, रोहित दिपक बंदरे, ऋतिक अनिल मिसाळ (सर्वाचे वय 17, रा. सद्‌गुरूनगर, भोसरी) असे गंभीर जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी रामेश्वर गंगाधर गोरे याला भोसरी पोलीसांनी अटक केली असून सागर आत्माराम गायकवाड (वय-18, रा. आदर्शनगर, मोशी) याच्यासह त्यांचा एक साथीदार फरार आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांनी माहिती दिली. आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये पुर्ववैमनस्य आहे. फिर्यादी मंगेश व त्याचे मित्र रोहित, ऋतिक हे गणपत लांडगे चाळ येथे रविवारी दुपारी थांबले होते. त्याठिकाणी आरोपी सागर त्याच्या दोन साथीदारासह आला. त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्राला कटरने वार करून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
अभियंता संजय कुलकर्णीवर कारवाई करा - रमेश वाघेरे

व्हिएस न्यूज - पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेतील पर्यावरण विभागात काम करणाऱ्या एका महिला कर्मचारी बरोबरच छेडछाडीचा प्रकार झाला होता. यामध्ये दोषी असतानाही पर्यावरण विभागातील अभियंता संजय कुलकर्णी याला इतक्या दिवसापासून प्रशासनाकडून पाठीशी घालण्यात येत होते. मात्र, आता महापालिकेच्या विशाखा समितीने अभियंता कुलकर्णी याला दोषी ठरवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी आयुक्त हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, संजय कुलकर्णी यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना निलंबीत करावे, तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!