व्हीएस न्यूज - पुर्ववैमनस्यातून तीन महाविद्यालयीन तरूणावर तिघांनी धारदार कटरने वार केले. ही घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरीतील सद्गुरूनगर येथील गणपत लांडगे चाळीत घडली. मंगेश धनदक, रोहित दिपक बंदरे, ऋतिक अनिल मिसाळ (सर्वाचे वय 17, रा. सद्गुरूनगर, भोसरी) असे गंभीर जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी रामेश्वर गंगाधर गोरे याला भोसरी पोलीसांनी अटक केली असून सागर आत्माराम गायकवाड (वय-18, रा. आदर्शनगर, मोशी) याच्यासह त्यांचा एक साथीदार फरार आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांनी माहिती दिली. आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये पुर्ववैमनस्य आहे. फिर्यादी मंगेश व त्याचे मित्र रोहित, ऋतिक हे गणपत लांडगे चाळ येथे रविवारी दुपारी थांबले होते. त्याठिकाणी आरोपी सागर त्याच्या दोन साथीदारासह आला. त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्राला कटरने वार करून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.