व्हीएस न्यूज - कुलूप लावून बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. शयनगृहातील कपाटामधील रोख अडीच लाख, सोन्याचे दागिने असा तीन लाख 67 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी पिंपरीगावातील प्रसुन्न शिव अपार्टमेंटमध्ये घडली. तन्मय दातीर (वय-32, रा. प्रसुन्न शिव अपार्टमेंट, पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दातीर यांचा रविवारी दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत फ्लॅट कुलूप लावून बंद होता. या कालावधीत चोरट्याने कुलूप तोडून शयनगृहातील कपाटामधील रोख अडीच लाख, सोन्याचे दागिने असा तीन लाख 67 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. फौजदार ठुबल अधिक तपास करत आहेत.