व्हिएस न्यूज - पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेतील पर्यावरण विभागात काम करणाऱ्या एका महिला कर्मचारी बरोबरच छेडछाडीचा प्रकार झाला होता. यामध्ये दोषी असतानाही पर्यावरण विभागातील अभियंता संजय कुलकर्णी याला इतक्या दिवसापासून प्रशासनाकडून पाठीशी घालण्यात येत होते. मात्र, आता महापालिकेच्या विशाखा समितीने अभियंता कुलकर्णी याला दोषी ठरवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी आयुक्त हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, संजय कुलकर्णी यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना निलंबीत करावे, तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.