व्हीएस न्यूज - घरासमोर पार्क केलेला ट्रकला व एका दुचाकीला आग लावून जाळण्याचा प्रयत्न केला. हिंजवडीत ट्रक जाळण्याचा तर सांगवीत दुचाकी जाळण्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. हिंजवडीतील घटनेप्रकरणी नितीन दगडे (वय-45, रा. बावधन-बुद्रुक) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दगडे यांचा एमएच 12, डीटी 4005 हा ट्रक घरासमोरील शिवसेना ऑफिसच्या पाठीमागे लावला होता. रविवारी रात्री अज्ञात इसमाने ट्रकला आग लावून जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. दुचाकी जाळल्या प्रकरणी समाधान मोटे (वय-39, रा. पिंपळे-निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोटे यांनी एमएच 12 पीक्यु 2862 ही दुचाकी घरासमोरील मोकळ्या जागेत पार्क केली होती. रविवारी रात्री अज्ञात आरोपीने दुचाकीला आग लावून जाळली. हिंजवडी आणि सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.