Skip to content

VS News

Pimpri-Chinchwad · Pune

Breaking
जय हिंद स्कूलविरोधातील तक्रारी प्रलंबित; चौकशी समिती दीड वर्षानंतरही निष्क्रिय असल्याचा आरोप!अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे पदाधिकारी मच्छिंद्र चिंचोळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखलपिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या सभेत महत्त्वपूर्ण निर्णय; महिला आरक्षणासह विविध ठराव मंजूरपाणी बचतीसाठी महापालिका ॲक्शन मोडवर! निष्काळजी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईरुग्णालयातच शिस्तीचे धिंडवडे! सुरक्षारक्षकाच्या वर्तनावर संतापजनक प्रश्नचिन्ह!अभिजात मराठी भाषा सप्ताहात बालगीतांची मैफल रंगली; चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाददापोडीच्या विषारी दारूप्रमाणेच सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गॅस चोरीही धोकादायक!PMPML कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी भाजपा कामगार मोर्चाचे निवेदनदोन पदांवर एकाच व्यक्तीची वर्णी; भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संतापपीसीयूमधील उच्च तंत्रज्ञान सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य सिद्ध करावे : हर्षवर्धन पाटीलकामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छानिष्ठावंत शिवसैनिक गणेश आहेर यांची शिवसेना पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुखपदी निवडमराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला विसर?उन्नतीच्या ‘स्वर निनाद’ मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हिंदुस्थान अँटिबायोटिक्स शाळा २००३ बॅचच्या रियुनियनमध्ये रंगला गुरु-शिष्य स्नेहसोहळाकंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पगार स्लिप द्या; हनुमंत लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणीसंघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरीराष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल!'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेशआषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवासऔंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीमोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरूविद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाजंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारामोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणीमोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकारमोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमभाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देशबालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारामतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शनपर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिकापिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरीसागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती!जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली!पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक.काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते

पिंपरी

जय हिंद स्कूलविरोधातील तक्रारी प्रलंबित; चौकशी समिती दीड वर्षानंतरही निष्क्रिय असल्याचा आरोप!

· 229 reads

जय हिंद स्कूलविरोधातील तक्रारी प्रलंबित; चौकशी समिती दीड वर्षानंतरही निष्क्रिय असल्याचा आरोप!

८ जानेवारी २०२५ रोजी समिती नियुक्त; शाळेची प्रत्यक्ष पाहणी आणि चौकशीबाबत प्रश्नचिन्ह

व्हिएस न्युज - पिंपरी येथील सिंघू एज्युकेशन ट्रस्ट संचलित जय हिंद प्राथमिक-माध्यमिक विद्यालयाविरोधात पालक व विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध तक्रारींच्या चौकशीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने नियुक्त केलेली चौकशी समिती अद्याप प्रत्यक्ष कार्यरत नसल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ॲड. उमेश खंदारे यांनी केला आहे. दि. ८ जानेवारी २०२५ रोजी नऊ सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली असतानाही समितीची बैठक झाली नसल्याचा आणि शाळेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Your ad here

ॲड. खंदारे यांनी २०२३ पासून जय हिंद स्कूलसंदर्भात महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे विविध तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्याला इयत्ता पाचवीत प्रवेश नाकारल्याची तक्रार, इयत्ता नववीतील ५९ विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण ठरवून पुढील प्रवेश नाकारल्याचा आरोप, तसेच विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले घेण्यासाठी आणि १७ नंबरचा फॉर्म भरून दहावीची परीक्षा देण्यासाठी पालकांवर दबाव टाकण्यात आल्याच्या तक्रारींचा समावेश आहे.

याशिवाय, प्रवेशाच्या वेळी ‘रिफंडेबल डिपॉझिट (व्याजमुक्त परतावा ठेव)’ या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्याकडून १० हजार रुपये घेतले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधित नियमांनुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारींद्वारे करण्यात आली होती.

नोटिसांनंतरही चौकशी पुढे सरकली नसल्याचा दावा

या तक्रारींच्या अनुषंगाने महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापनाला वेळोवेळी नोटिसा बजावून चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, शाळा व्यवस्थापन चौकशीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहिले नसल्याचा दावा ॲड. खंदारे यांनी केला आहे. संबंधित व्यवस्थापनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसेल, तर शिक्षण विभागाने उपलब्ध प्रशासकीय अधिकारांचा वापर करून नियमानुसार पुढील कार्यवाही करणे आवश्यक होते. मात्र, हे प्रकरण दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने विभागाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नऊ सदस्यीय समितीच्या कामकाजाबाबत प्रश्न

शाळेविरोधातील तक्रारींची प्रत्यक्ष तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी शिक्षण विभाग (प्राथमिक), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या प्रशासन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दि. ८ जानेवारी २०२५ रोजी क्र. शिक्षण/खाप्राशा/३/कावि/२४/२०२५ अन्वये नऊ सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. प्रशासन अधिकारी संगीता बागर यांच्याकडे या समितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले होते.

समितीने संबंधित शाळेची तपासणी करून स्वयंस्पष्ट अहवाल कार्यालयास सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र, समितीच्या बैठका झाल्या नसल्याचा आणि शाळेची प्रत्यक्ष पाहणीही करण्यात आली नसल्याचा आरोप ॲड. खंदारे यांनी केला आहे. त्यामुळे चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेली समिती प्रत्यक्षात कितपत कार्यरत आहे, तसेच तिच्या कामकाजाचा आढावा शिक्षण विभागाने घेतला आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

शिक्षण विभागाने लेखी खुलासा करावा

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याशी संबंधित तक्रारी, प्रवेश प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि १० हजार रुपयांच्या कथित ठेव रकमेबाबत निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे ॲड. खंदारे यांनी म्हटले आहे. तसेच शाळेला बजावण्यात आलेल्या नोटिसांनंतर कोणती कार्यवाही करण्यात आली, चौकशी समितीने आतापर्यंत काय काम केले, समितीच्या बैठका का झाल्या नाहीत आणि शाळेची प्रत्यक्ष पाहणी का करण्यात आली नाही, याबाबत शिक्षण विभागाने लेखी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पालक आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी केवळ कागदोपत्री न ठेवता त्यांची निष्पक्ष चौकशी करून नियमानुसार ठोस कार्यवाही करणे आवश्यक आहे. तक्रारदारांना केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कार्यवाहीतून न्याय मिळाल्याचे दिसले पाहिजे, अशी भूमिका ॲड. खंदारे यांनी मांडली आहे. दरम्यान, या आरोपांबाबत शाळा व्यवस्थापनाची आणि संबंधित महापालिका अधिकाऱ्यांची अधिकृत बाजू उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

“शाळेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची असताना तक्रारी, नोटिसा आणि चौकशी समिती नियुक्त करूनही प्रत्यक्ष तपासणी न होणे ही संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह आहे. ८ जानेवारी २०२५ रोजी समिती नेमूनही बैठक व पाहणी झाली नसेल, तर या प्रकरणाची वरिष्ठांनी तातडीने गंभीर दखल घेऊन शाळेसोबत संबंधित अधिकारी व समितीमधील सदस्य यांच्यावरही नियमानुसार कारवाई केली पाहिजे.”

-ॲड. उमेश खंदारे.

Your ad here