व्हीएस न्यूज - एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेली कॅश घेऊन व्हॅनसह फरार चालकाला त्याच्या साथीदारांसह पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून ७४ लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेतली आहे. गुन्हा घडल्यानंतर पोलीसांनी आपली चक्रे फिरवत या गुन्ह्याचा ७२ तासात छडा लावला आहे.
एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेले ७४ लाख रुपये घेऊन व्हॅन चालक व्हॅनसह फरार झाल्याची धक्कादायक घटना बुधवार (दि. ३१) रोजी दुपारी दीडच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम शाखेजवळ घडली होती. या प्रकरणातील आरोपींना वाकड पोलिसांनी ७२ तासात जेरबंद केले असून त्यांच्याकडून ७४ लाख ५० हजार रुपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.
या कारवाईची माहिती देताना पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, मुख्य आरोपी रणजित धर्मराज कोरेकर (रा. सनशाईन हॉटेलजवळ, माऊलीनगर दिघी मूळ रा. मु.पो. नारेवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर), असे या व्हॅन चालकाचे नाव आहे. तर त्रिंबक गणपती नहिराळे (वय ३७, रा. मांडवजाळी, ता. जि. बीड), अमोल लक्ष्मण धुते (वय २७,साई पार्क, माऊलीनगर, दिघी), विठ्ठल रामहरी जाधव (वय ३४, रा. लोळदगाव, ता. गेवराई, जि. बीड), अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर पूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ब्रिक्स इंटरनॅशनल या कंपनीची गाडी (एम. एच.१४, सीएक्स ५७११) रणजित कोरेकर चालवत होता. बुधवारी सकाळी ही गाडी डेक्कन येथून एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी निघाली. दुपारपर्यंत सात एटीएममध्ये पैसे भरण्यात आले. गाडीमध्ये सुरक्षा रक्षक, दोन कॅशियर आणि चालक असे चौघे होते. दुपारी सव्वाएकच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आल्यानंतर सुरक्षारक्षक आणि कॅशियर एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी उतरले असता चालक रणजित कोरेकर याने गाडी घेऊन धूम ठोकली. यावेळी गाडीमध्ये ७४ लाख रुपयांची रोकड होती.
वरील आरोपी ईटीऑस कार (एम एच ४८, एफ १९८४) मधून पैसे असलेल्या वाहनाचा पाठलाग करीत होते. कॅश वाहन चोरण्याची संधी साधून चौघांनी मिळून भोसरी येथून सर्व कॅश ईटीऑस कारमध्ये ठेवून पळाले. बुधवारी रात्री उशिरा पळवून नेलेली व्हॅन भोसरी एमआयडीसी येथे एका कंपनीजवळ आढळून आली. मात्र, त्यामधील रोख रक्कम घेऊन चालक रणजित कोरेकर फरार झाला होता. गुरुवारी शिक्रापूर हद्दीत ज्या पेटीमध्ये कंपनीने पैसे भरून ठेवले होते, ती पैशांची पेटी सापडली. पण सापडलेली पेटी मोकळी होती. काही वेळेच्या फरकाने एक-एक गोष्टी समोर येत असल्याने हा पूर्वनियोजित कट तर नसेल ना, अशी शंका व्यक्त केली जात होती. त्यावरून वाकड पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले, व त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता हा गुन्हा उघडकीस आला. प्रकरणाचा ७२ तासांमध्ये तपास करत आरोपींना गजाआड करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे.
व्हिएस न्युज - चिंचवड येथे भुमकर चौकात वाहतूक पोलीसाने चालकाला बेदम मारहाण केल्याचा विडिओ वायरल झाला असून सोशल मीडिया वर चर्चेत आहे. सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेल्या विडिओमध्ये एमएच 12, एफ डी 6795 हा टेम्पो उभा आहे.त्या व्हिडिओ मागचं पूर्ण सत्य अद्याप स्पष्ट झालं नसून त्यावर लवकरात लवकर तपास करण्यात येईल, असे स्पष्टीकरण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिले.
वाहतूक पोलीसाने चालकाला बेदम मारहाण केल्याचा आणि चालक वाहतूक पोलीसाची मरू नये म्हणून हाथ जोडून विनंती करत असल्याचे विडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ रस्त्याने जाणा-या एका वटसरूने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्यावरून सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. वर्दीची ताकद, पोलिसी खाक्या, अशोभनीय, निंदनीय, कदाचित पैशांची मागणी पूर्ण केली नसणार म्हणून मारहाण करण्यात येत आहे. अशा एक ना अनेक चर्चा सध्या सुरू आहेत.
याबाबत बोलताना परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, या प्रकरणाची लवकरच चौकशी करण्यात येईल. नेमका प्रकार काय आहे हे तपासणे महत्वाचे आहे. ज्याची चूक असेल त्याला शिक्षा नक्की होणार. नागरिकांनी नको त्या चर्चा सोशल मीडियावर पसरवू नये. व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी तसेच व्हिडिओ संपल्यानंतर नेमका काय प्रकार झाला आहे, हे देखील तपासण्यात येईल.
वाहतूक पोलीसांची दादागिरी आणि अरेरावी वाढत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत पार पाडण्या पेक्षा पावती फाडण्यात जास्त मग्न आहेत असे नागरिकांचे मत आहे.
व्हिएस न्युज - रविवार दिनांक ४/५/२०१८ रोजी महाराष्ट्रातील शिवसेना सोशल टिमचा मेळावा मंगलसेन बहल सभागृह नेहरूनगर या ठिकाणी शिवसेना पिंपरी विधानसभा संपर्क प्रमुख गिरीशजी सावंत व पिंपरी विधानसभा आमदार अॕड गौतम चाबुस्कवार यांच्या प्रमुख उपस्थित उत्सहात पार पाडला.
व्हीएस न्यूज - जीवनात सकारत्मकतेची ताकद येण्यासाठी अध्यात्मिक योग, ध्यानधारणा गरजेची आहे. चांगले विचार आचरण, संवाद संस्कार यातूनच प्रेम आपुलकी वाढते. चांगले कर्म चांगली दिशा देऊ शकतात. डॉक्टर ताण तणाव, क्रोध, अहंकार, स्वार्थ दूर करूनच रुग्णांच्या वेदना दूर करू शकतात यासाठी मनशक्ती जागरूक ठेवण्याची गरज आहे त्यासाठी स्वतःला वेळ द्यावा, असे मत बी के शिवानी दीदी यांनी व्यक्त केले. डॉ. डी. वाय पाटील मेडिकल महाविद्यालय व संशोधन केंद्रात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयच्या बी के शिवानी दीदी यांनी 'आत्मविश्वास व सकारत्मकता' या विषयी व्याख्यानाप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्ष भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ पी. एन राजदान तसेच विद्यार्थी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्यानी उपस्थित होते....Read More
व्हीएस न्युज - पिडीत वंचित वर्गाचा विकास करण्यासाठी मला काम करायचे आहे. उत्कृष्ठ लोकनेता होणे हे गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न होते. ते पुर्ण करण्यासाठी मी भविष्यात काम करील. लोकप्रतिनिधी घडविणारे त्यांचे व्यक्तीमत्वं होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणा-यांवर मी अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन ग्रामविकास, महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी रहाटणी, पुणे येथे केले.
व्हीएस न्यूज - संकेतस्थळावर हॉटेलमध्ये नोकरीची जाहिरात पाहून दोन उच्च शिक्षित तरूणांची 60 हजार रूपयांची फसवणूक सराईत गुन्हेगाराने केली. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी उघडकीस आली. दिपेश सोनी (रा. पिंपरी) असे फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर भोसरीसह चतुःश्रृगी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या आरोपी सोनी हा चतुःश्रृगी पोलीसांच्या कोठडीत आहे. याप्रकरणी नदिन गंवडी (वय-25, रा. कर्वेनगर) याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार दि. 6 ते 26 सप्टेंबर 2017 या कालावधीत घडला. फौजदार आर. बी. सोडनवर यांनी माहिती दिली. फिर्यादी गंवडी हा बीई इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेत आहे. तो व त्याचा अभिजीत बाबासाहेब पाटील पार्टटाईम नोकरीच्या शोधात होते. लिंक इन या संकेतस्थळावर त्यांनी चिंचवड येथील रिव्हर व्हयु हॉटेलमध्ये नोकरी लावण्याची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. ही जाहिरात पाहून फिर्यादी व त्याच्या मित्राने आरोपी सोनीशी संपर्क साधला. नोकरी लावण्याचे अमिष दाखवून सोनीने दोघांकडून प्रत्येकी 30 हजार असे 60 हजार रूपये घेतले. नोकरी न लावताच त्यांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - ज्ञानदीप इंग्लिश स्कुलचे वार्षिकोत्सव स्नेहसंमेलन उत्साहात विविध उपक्रमांनी पार पडले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ज्ञानदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे, माजी अध्यक्ष राहुल चिताळकर, प्रशांत पाटील, परशु केकाण, पूजा ठवरे, यशस्वी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवकाते, अंकुश पांढरे, भागवत काटकर आदी उपस्थित होते. नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपाध्यक्ष सागर भोसले, संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे यांनी मनोगत व्यक्त केले. विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांसह शालेय वैयक्तिक व सामाहिक स्पर्धा, खेळ, मनोरंजनात्मत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात झाले. या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी पल्लवी जाधव, हेमांगी शिंदे, शीतल जगताप, पूजा ठवरे, हेमलता राऊत, रुपाली गजरमल आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मारुती बोन्द्रे यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे यांनी तर आभार अनिल नाटेकर यांनी मानले. ...Read More
व्हीएस न्यूज - धार्मिक व सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याची ताकद महिलांच्या सामूहिक नेतृत्वात असून त्यास प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या कविता बहल यांनी नुकतेच केले. श्री जगद्गुरु प्रतिष्ठानच्या वतीने कर्तृत्वान महीलांचा व उत्कृष्ट महीला बचतगटांचा सत्कार समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. संत तुकारामनगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. नगरसेविका सुलक्षणा धर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. लक्ष्मण रानवडे, ऍड. सुनिता रानवडे आदी मान्यवर उपस्थित होते. एच. ए. कॉलनीतील स्वरांजली महिला बचत गट, छाया सिनलकर, रंजना मुळिक, सुरेखा कामठे, संस्कृती महिला बचत गट वनमाला वाघमारे यांना जिजाऊ सावित्री उत्कृष्ठ कार्य पुरस्कार देऊ न सन्मानित करण्यात आले. तर सायुजता दोडके यांना आदर्श महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बहल पुढे म्हणाल्या, गेली एकवीस वर्षे महिलांच्या नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ऍड. रानवडे हे पुरस्कार देऊन करत असलेले कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या समाजरुपी कार्याची दखल राज्य शासनानेही नुकतीच घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला सुमारे एक हजार महिला उपस्थित होत्या. यावेळी सुलक्षणा धर यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. लक्ष्मण रानवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजिता ऍड. सुनिता रानवडे यांनी आभार मानले. चॉंद शेख, देवेंद्र गावंडे, सुधीर कांबळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले....Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002