Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
“स्मार्ट सिटी’साठी स्वतंत्र सेलची स्थापना

व्हीएस न्यूज – स्मार्ट सिटी योजनेसह विविध योजनांची कामे विहित वेळेत पूर्ण करणे आणि कामकाजात गतिमानता आणण्याच्या दृष्टीने महापालिकेने स्वतंत्र कक्षाची स्थापना केली, तसेच त्या सेलकरिता स्वतंत्रपणे आकृतीबंध निश्‍चित करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारित जेएनएनयुआरएम प्रकल्प, स्मार्ट सिटी योजना, पंतप्रधान आवास योजना, सीएसआर सेल, सिटी ट्रान्स्फॉमेंशन ऑफीस, अमृत योजनांचे कामकाज करण्यात येत आहे. विशेषतः स्मार्ट सिटी अभियानांतर्गत विविध कामे वेळेत पूर्ण करणे, त्या कामकाजात गतिमानता वाढविणे आवश्‍यक आहे. या कामकाजासाठी पालिकेने स्वतंत्र कक्षाची स्थापन केली आहे. त्या सेल करिता स्वतंत्र आकृतीबंध निश्‍चित करण्यात आलेला आहे.

पालिका प्रशासन विभागाने स्मार्ट सिटी सेल स्थापन करण्यास आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली. प्रशासन विभागाने त्या सेलची रचना व आकृतीबंध निश्‍चित केला. तसेच त्या सेलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्‍त श्रावण हर्डीकर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे, कार्यालयीन अधिक्षक राजीव घुले, लेखापाल आबासाहेब चौधरी, लिपीक प्राजंल इंगळे, प्रशांत यादव आणि शिपाई एकनाथ येंचवाड यांची नियुक्‍ती करुन त्यांच्याकडे अतिरिक्‍त पदभार दिलेला आहे.

दरम्यान, “स्मार्ट सिटी सेल’चे कामकाज करण्यास नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र, राज्य शासन व आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडील आदेशानुसार कामे करावी लागणार आहे. तसेच सेलबाबत दैनंदिन कामकाजाचा अहवाल मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यांनी प्रत्येक आठवड्यास मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्‍त हर्डीकर यांच्याकडे सादर करण्याचेही आदेशात म्हटले आहे.

...Read More

V. S. News
मोरवाडी न्यायालय स्थलांतरणाबाबत न्यायाधिशांच्या सूचना

व्हीएस न्यूज मोशीतील कोर्टाच्या नियोजित सुसज्ज इमारतीबरोबरच मोरवाडी कोर्टाच्या स्थलांतराबाबत पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे पदाधिकारी व उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय न्यायाधिशांची एकत्रित बैठक पुण्यात पार पडली. नव्या जागेतील इमारतीमध्ये स्थलांतरीत होणाऱ्या इमारतीमधील नियोजित न्यायालये व या इमारतीच्या भाड्याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली.

पुणे शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या या बैठकीला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री गवई, श्री बेदर, श्री कर्णिक, जिल्हा न्यायाधिश श्रीराम मोडक, पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेटस्‌ बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. राजेश पुराणिक,ऍड. कालिदास इंगळे, ऍड. तुकाराम पडवळ, ऍड. कांता गोर्डे, ऍड. प्रदीप ढोले, ऍड. हर्षद नढे, ऍड. गणेश राऊत, ऍड. विकास बाबर, ऍड.नीलेश घोडेकर, ऍड. ज्ञानेश्‍वर होलगोली, ऍड. प्रतिभा हगवणे, ऍड. प्रसन्ना लोखंडे, ऍड. अतिश लांडगे, ऍड. किरण पवार, ऍड. सुहास पडवळ आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, नव्याने स्थलांतरीत होणाऱ्या इमारतीमध्ये सिनिअर डिव्हिजन कोर्ट, ऍडीशनल सेशन कोर्ट,कामगार न्यायालय, मोटर व्हेईकल ऍक्‍ट कोर्टासह नऊ प्रथम वर्ग न्यायालय सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नव्याने उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या इमारतीचे भाडे कमी करण्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित चर्चा करुन, भाडेनिश्‍चित करण्याच्या सूचना करण्यात आल्या. उपस्थित न्यायाधिशांच्या या सर्व सूचनांचा आदर करुन,महापालिका प्रशासनाकडे याचा पाठपुरावा करु, असे आश्‍वासन बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यानी दिले.

...Read More

V. S. News
तळेगाव दाभाळे पोलिसांनी घातपात केल्याची तक्रार

व्हीएस न्यूज - अनिकेत कोथळे याच्या पोलीस कोठडीतील मृत्युमुळे सांगली पोलीस दलाच्या अब्रुचे राज्यात धिंडवडे निघाले आहे. या घटनेनंतर तळेगाव दाभाडे पोलिसांनी बुधवारी (दि.15) ताब्यात घेतलेल्या आयुब शेख याचा घातपात केल्याची तक्रार त्याचा चुलतभाऊ शाहरुख शेख यांनी वडगाव मावळ न्यायालयात केली आहे. या तक्रारीवरुन पोलीस अधिक्षक सुवेझ हक, देहूरोडचे पोलीस उपअधिक्षक गणपत माडगुळकर व तळेगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांना येत्या मंगळवारी (दि.21) जबाब देण्यासाठी उपस्थित राहण्याची नोटीस न्यायालयाने बजावली आहे.

अर्जदार शाहरुख शेख मावळ तालुक्‍यातील ताजे गावचे रहिवासी असून, बुधवारी (दि.15) त्यांना तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांनी फोन करुन, आयुब शेखच्या कुटुंबाविषयी चर्चा करुन, आम्ही त्याला पोलीस कर्मचारी रुममध्ये ठेवले असल्याचे सांगितले. मात्र, कोणत्या गुन्ह्यात अटक केली आहे, याविषयी त्यांनी शेख यांना कोणतीही माहिती दिली नाही. दुसऱ्यादिवशी शाहरुख शेख आपल्या वडीलांसह तळेगाव पोलीस स्टेशनला गेले, तसेच आयुबचे वडीलही पोलीस स्टेशनला गेले असता, सोनवणे यांनी त्यांना आयुबची भेट न घेऊ देताच हुसकावून लावल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे.

सोनवणे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गेली चार दिवस आयुबचा कुटुंबियांशी संपर्क झालेला नाही. त्यामुळे तळेगाव पोलीस आणि पोलीस उपअधिक्षक गणपत माडगुळकर यांनी आयुबचा घातपात केल्याची तक्रार शाहरुख शेख यांनी वडगाव मावळ न्यायालयात केली आहे. याची दखल घेत, येत्या मंगळवारी (दि.21)या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या सुनवाणीला जबाब देण्यासाठी पोलीस अधिक्षक सुवेझ हक, देहूरोडचे पोलीस उपअधिक्षक गणपत माडगुळकर व तळेगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आयुब शेख हा सराईत गुन्हेगार असुन, पौड येथे 2010 मध्ये झालेल्या खूनाच्या गुन्ह्यात तो चार वर्षे शिक्षा भोगुन आला आहे. सध्या त्याला तळेगाव पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली असून,न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्याची रवानगी येरावडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. त्याच्या कुटुंबियांनी केलेले आरोप निराधार आहेत.

वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन.

...Read More

V. S. News
आर्थिक संगनमताने “झोनिपु”मध्ये बोगस लाभार्थी

व्हीएस न्यूज - शहरातील गोरगरीब, उपेक्षित, वंचित झोपडपट्टीतील नागरिकांना घरे मिळावीत, याकरिता महापालिकेने झोपडपट्टी निर्मूलन व पुन:विकास प्रकल्प मिलिंदनगरमध्ये राबविला. मात्र, या पुनर्वसन प्रकल्पातील अनेक मूळ लाभार्थी अन्यत्र स्थलांतरीत झाले असून, त्या लाभार्थ्यांनी घरे भाडोत्री दिली आहे. विशेषत: “झोनिपु’ कार्यालयातील एका लिपिकाने आर्थिक संगणमताने झोपडपट्टी धारकांना बोगस कागदपत्राच्या आधारे फोटोपास बनवून त्यांना लाभार्थी बनविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबत लिपिकासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करुन कडक कारवाईची मागणी ग्राहक हक्क संघर्ष समितीचे शहर सरचिटणीस भीमराव तुरुकमारे यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सुमारे 72 घोषित व अघोषित झोपडपट्टी कार्यरत आहेत. शहरातील झोपडपट्यांचे प्रमाण कमी करुन तेथील नागरिकांना घरे उपलब्ध करण्यात येत आहे. याकरिता महापालिकेने झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाद्वारे शहरातील अनेक झोपड्यांचे 2002 मध्ये सर्व्हेक्षण केले होते. त्यानुसार झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना फोटो पास बनवून त्यांची यादी तयार केलेली आहे. त्यानुसार त्या रहिवाशांचे पुनर्वसनासाठी “एसआरए’ अतंर्गत घरांचे प्रकल्प राबविलेले आहेत. महापालिकेने पिंपरीतील मिलिंदनगरमध्ये नागरिकांच्या घरांसाठी झोपडपट्टी पुनवर्सन प्रकल्प टप्पा क्रमांक-2 राबविला. त्या पुनर्वसन प्रकल्पांतील तथागत हौसिंग सोसायटीत अनेक बोगस लाभार्थींना घरांचा लाभ दिला असून, लाभार्थ्यांना पात्र ठरविण्यासाठी बोगस कागदपत्राचा वापर करण्यात आला आहे.

त्या पुनर्वसन प्रकल्पात शेकडो मूळ लाभार्थी नागरिक वास्तव्य करीत नाहीत. त्यांनी अन्यत्र घरे घेवून प्रकल्पातील त्यांची घरे भाडोत्री दिली आहे. तसेच एकाच लाभार्थ्यांला संजय गांधीनगर झोपडपट्टीत फोटोपास देवूनही त्याला मिलिंदनगरमध्ये घराचा लाभ मिळाला. पण, त्यानेही पूर्वीच्याच ठिकाणी वास्तव्य करुन ते घर भाड्याने दिले आहे. दरम्यान, महापालिका झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनेक लाभार्थ्यांना घरे मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्राचा आधार घेवून फोटोपास देत लाभार्थी केले आहे. झोपडपट्टी सर्व्हेक्षणात घरांसाठी पात्र ठरलेल्या काही नागरिकांची नावे गायब करुन लक्ष्मी दर्शन केलेल्यांची नावे संभाव्य झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प यादीत समाविष्ट करत त्यांना फोटोपास दिलेले आहेत. त्यामुळे झोपडपट्टीतील मूळ लाभार्थी घरापासून वंचित राहू लागली आहेत.

सर्वसामान्य माणसांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे. याकरिता झोनिपु प्रकल्प राबविला जातो. परंतु, झोनिपु कार्यालयातील एका लिपिकाने दलाली सुरु केली आहे. त्या लिपिकांने अनेक लाभार्थ्यांची बनावट कागदपत्राच्या सहाय्याने आर्थिक हितसंबंध जोपासत घराचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना घरापासुन वंचित राहावे लागत आहे. त्या लिपिकाने गौतमनगर, मिलिंदनगर याठिकाणच्या प्रकल्पांत बोगस लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करुन त्यांना लाभार्थी केले आहे.

...Read More

V. S. News
घरांबाबत असलेली मागणी प्रशासनाकडून सोडवून देणार – आमदार जगताप

व्हीएस न्यूज – वाल्हेकरवाडी ते रावेत या मार्गावरील काही घरे रस्त्यात जाणार आहेत. त्या घर मालकांना प्राधिकरणाने नोटीसा बजाविल्या आहेत. मात्र, आपली घरे वाचवीत, अथवा घरच्या बदल्यात घर मिळावे, याकरिता वाल्हेकरवाडी येथील दत्त मंदिरासमोर बांधितांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते. दरम्यान, आमदार लक्ष्मण जगताप यांनी घराबाबत असलेली मागणी प्रशासनाकडून सोडवून न्याय देण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याने बाधितांनी उपोषण मागे घेतले आहे.

वाल्हेकरवाडी-रावेत या मार्गावरील घरे वाचावीत किंवा घराच्या बदल्यात घर अथवा जागा प्रशासनाने द्यावी, या मागणीकरिता वाल्हेकरवाडीतील नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते. महापालिका व नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहा पदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणापासून ते ओढ्यापर्यंतच्या भागाचे रस्त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या जागेचे भूसंपादन झाले नसल्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. त्या रस्ता-रुंदीकरणामध्ये काही बैठी घरे बाधित होत आहेत. त्या घरांना खाली करण्याच्या प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. त्यावर बधितांनी ग्रामपंचायतची परवानगी घेऊन घरे बांधली आहेत. ही आमची घरे अनधिकृत व रस्ता बाधित कसे ठरतात. या बाबत आम्हाला प्रशासनाने न्याय द्यावा व आम्हाला घराच्या बदल्यात घरे द्यावीत, या मागणीसाठी शशिकांत खाडे, प्रवीण देशमुख, अरुण देशमुख, पोपट खडतरे, बाळासाहेब गुळुंजकर, शरद पवार, हसीना शेख, शारदा नाईकनवरे, कमल शिंपी, मंदा सरोदे, माधुरी वायकर, नदाफ पठाण, शोभा इंगळे आदी आमरण उपोषण करीत होत.

दरम्यान, आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपोषणकर्त्या नागरिकांना आपल्या मागण्यांवर प्रशासनाशी चर्चा करुन योग्य तो तोडगा काढून न्याय देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी उपोषण मागे घेतले आहे. यावेळी ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसेविका करुणा चिंचवडे, माजी नगरसेवक शामराव वाल्हेकर, शिवसेनेचे सल्लागार भगवान वाल्हेकर, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर चिंचवडे, चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे आदींच्या उपस्थित होते. तसेच नगरसेवक नामदेव ढाके, मोरेश्‍वर भोंडवे, सचिन शिवले, नाना मरळ, छावाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील आदींनी भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती नागरिकांनी केली होती.

...Read More

V. S. News
चिंचवड येथील उद्योगनगर मध्ये घाणीचे साम्राज्य नागरिक त्रस्त

व्हीएस न्यूज - चिंचवड येथे उद्योगनगर येथे रेल्वे लाईन शेजारी असलेल्या झोपडपट्टी मधून गेलेल्या नाल्यामुळे परिसरात नागरिकांना दुर्गंधी मुळे नाकाला रुमाल लावून जावे लागते.या नाल्या जवळ असलेल्या सह्याद्री बॉईज हॉस्टेल मध्ये तर खुपच घाण वास येतो. तेथेच खाली बाथरूमचे पाईप सोडले असल्याने सर्व मैला खाली व रस्त्यावर साचत आहेत .त्यात डुकरे इतर जनावरे खेळत असतात,जवळच असलेले चेंम्बर फुटलेल्या अवस्थेत आहेत.या सर्व बाबीकडे आरोग्य खात्याचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
या परिसरात नवीन बांधकाम सुरु असलेल्या इमारतीतून वाहणारा मैला वाटेत साठल्या मुळे शेजारी असलेल्या गोदाई व्हीला,साकेत व्हीला तसेच माजी नगरसेवक गुरुबक्ष पहलानी यांचे चाललेले बांधकाम, तिथे असलेले नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिकेच्या प्रशासनाने लक्ष घातले तर सर्वांना दिलासा मिळेल.या सर्व बाबीतुन एकच प्रश्न उभा राहतो कि या घाणी मुळे पसरणाऱ्या रोगराईला जबाबदार कोण ?
...Read More

V. S. News
विद्यार्थांनी कचऱ्यातून साकारला अत्याधुनिक प्रकल्प.

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील यश व समृद्धी ढाके या भावा-बहिणीनी राष्ट्रीय स्तरावरील आराखडा स्पर्धेत कचऱ्या पासून ऊर्जा व बायो गॅस निर्मिती प्रकल्प सादर करून रोख ८० हजार रुपयाचे पारितोषिक मिळवले आहे.

हिंजवडी येथील राजीव गांधी सॉफ्टवेअर पार्क डसॉल्ट सिस्टिम (३ डी पी एल एम) कंपनीत घेण्यात आलेल्या आकृती २०१७ या राष्ट्रीय स्पर्धेत पी.सी.सी.ओईच्या मॅकेनिकल शाखेतील यश ढाके आणि संगणक शाखेतील समृद्धी ढाके यांनी ( वेस्ट मॅनेजमेंट अँड रीयूज )कचऱ्याच्या पुर्नवापरासाठी स्मार्ट आराखडा सादर केला होता .वेळेची-पैशाची बचत करणाऱ्या आणि पर्यावरण पुरक असणाऱ्या "काचऱ्याच्या पुर्नवापरासाठी स्मार्ट आराखडा " या प्रकल्पातून त्यांनी देशभरात सर्वच शहरांना भेडसावणाऱ्या कचऱ्याच्या प्रश्नावर उपाय शोधला आहे. जमा होणाऱ्या सुक्या कचऱ्यातून ऊर्जा निर्मिती तर ओल्या काचऱ्यातुन बायोगॅस निर्मिती करता येईल.या प्रकल्पासाठी पी.सी.सी.ओईचे आर अँड डी डीन डॉ. संजय लकडे यांनी मार्गदर्शन केले.

देश भरातून ८५० संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता या मध्ये यश व समृद्धी ढाके यांनी प्रथम क्रमांक मिळवला.यश व समृद्धी ढाके यांना ड सॉल्ट सिस्टिमचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन मोगासले यांच्या हस्ते रोख पारितोषिक, प्रमाण पत्र,स्मृती चिंन्ह देऊन गौरवण्यात आले. या वेळी सूचित जैन, डॉ.संजय लकडे हे उपस्थित होते.यश व समृद्धी ढाके यांना पुढील वर्षी लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या सॉलिड वर्क्स वर्ल्ड २०१८ स्पर्धेत थेट प्रवेश देण्यात आला.या स्पर्धेत जाण्याकरीता लागणारा सर्व खर्च ड सॉल्ट सिस्टिम कंपनी करणार आहे.

त्याच प्रमाणे दोघांनाही एक वर्षाचा सॉलिड वर्क्स परवाना देऊन पुढील काळात नोकरी देण्याचे जाहीर केले.डॉ. संजय लकडे तसेच यश व समृद्धी ढाके यांच्या या यशा बद्दल पी.सी.ई. टी चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे,उपाध्यक्ष पद्मा भोसले,सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष् एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील,भाईजान काझी,कार्यकारी संचालक डॉ.गिरीष देसाई,आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अ.म.फुलंबकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि आकृती २०१७ चे राष्ट्रीय स्पर्धेत यश व समृद्धी ढाके या बहीण भावांना विजेते घोषित केले.

...Read More

V. S. News
प्राधिकरण कार्यक्षेत्रातील अपंग स्टॉल धारकांवरील कारवाईस स्थगिती

व्हीएस न्यूज पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रातील अपंगांच्या स्टॉल धारकांवर अतिक्रमणाच्या नावाखाली नोटीस न देता कारवाई करण्यात येत आहे, याबाबत संपूर्ण अहवाल तात्काळ अपंग कल्याण आयुक्‍तालयाकडे सादर करावा आणि पुढील आदेश देईपर्यंत अपंग स्टॉलवरील कारवाई स्थगीत ठेवण्याचे आदेश अपंग कल्याण आयुक्‍तांनी प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.

कोणतीही पूर्व सूचना न देता कारवाई होत असल्याची तक्रार प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी केली होती. याची तात्काळ दखल पुणे अपंग कल्याण आयुक्‍तालयाने याची तात्काळ दखल घेतली व स्थगितीचे आदेश दिले व सात दिवसात विस्तृत अहवाल सादर सादर करावा व अपंग व्यक्‍तीबाबत अर्धन्यायिक प्रक्रिया अनुसरण्यात येईल. चौकशीचे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित अपंग स्टॉल विरुध्दची कारवाई पुढील आदेशापर्यंत स्थगीत ठेवावी, अशी सूचना केली.

अपंग व्यक्‍तींना नियमानुसार समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग 1 जानेवारी 1996 पासून लागू केला. यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना व प्राधिकरणांना त्यांच्या क्षेत्रातील अपंग अर्थात दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणकारी कामांसाठी दारिद्य्र निर्मूलन कार्यक्रमांतर्गत तीन टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. नागरी भागात दिव्यांगांच्या कल्याणासाठी कोणत्या प्रयोजनानिमित्त हा निधी खर्च करावा? हा निधी अन्य कोणत्याही कामासाठी खर्च करू नये. यावर दिव्यांगांसाठी राखीव ठेवलेला निधी खर्च केला जातो का किंवा कशा पद्धतीने? याबाबत आढावा घेण्याची सूचना अपंग कल्याण संचालनालयाने संबंधितांना दिल्या आहेत.

राखीव निधी खर्च व्हावा

दिव्यांगांसाठी निधी राखीव ठेवणे, तो त्यांच्याच कामासाठी खर्च करणे, याची पूर्तता होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी अपंग व्यक्‍ती अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, तसेच राखीव तीन टक्के निधीचा वापर त्यांच्यासाठीच करावा, अशी मागणी प्रहार क्रांती आंदोलनचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी केली.

...Read More

V. S. News
नगरसेवकाच्या सांगण्यावरुन खोटा गुन्हा

सामाजिक कार्यकर्ते संतोष चव्हाण यांचा आरोप

व्हीएस न्यूज पोलिसांविरोधात आंदोलन केल्याने भाजप नगरसेवक तुषार हिंगे याच्या सांगण्यावरुन निगडी पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकविल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष रामा चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या खोट्या तक्रारीमधून वगळण्याची मागणी या निवेदनात केली आहे.

नगरसेवक तुषार हिंगे व काही तरुणांमध्ये भांडण झाले होते. याचे पर्यावसन यमुनानगर चौकीसमोरच प्राणघातक हल्ल्यात झाले होते. मात्र, नगरसेवक तुषार हिंगे याच्याविरोधात तरुणांची तक्रार घेण्यास निगडी पोलीस टाळाटाळ करत होते. निगडी पोलिसांच्या या बेजबाबदार वर्तणुकीच्या निषेधार्थ या तरुणांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आमरण उपोषण केले होते.

उपोषणकर्त्यांमध्ये संतोष चव्हाण यांचा देखील समावेश होता. त्यानंतर नगरसेवक तुषार हिंगेसह त्याच्या साथीदारांवर निगडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हिंगे यांच्या सांगण्यावरुन निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याची चव्हाण यांची तक्रार आहे. दरम्यान, नगरसेवक हिंगे याच्यावर गुन्हा दाखल असताना देखील, त्याला अटक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

...Read More

V. S. News
एशियन ओसिएन स्टँडर्ड सेटर गृपच्या उपाध्यक्षपदी शिवाजी झावरे

व्हीएस न्यूज - एशियन ओसिएन स्टॅंडर्ड सेटर ग्रुपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवाजी झावरे यांचा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

पश्‍चिम भारत प्रादेशिक परिषदेचे अध्यक्ष विष्णू अगरवाल, उपाध्यक्ष सर्वेश जोशी, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष रवींद्र नेर्लीकर, अमोद भाटे, युवराज तावरे, प्राजक्ता चिंचोळकर, सुहास गार्डी, संतोष संचेती, अनिल अगरवाल,सचिन बन्सल आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम निगडी येथील शाखेच्या सभागृहात संपन्न झाला. एशियन- ओशिएन स्टॅंडर्ड सेटर्स ग्रुप ही आशियाई प्रदेशातील लेखा मानक संबंधित संघटना आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय मानकांचा अवलंब करण्यासंबंधित चर्चा तसेच उच्च गुणवत्तायुक्त जागतिक लेखा मानकांच्या विकासात सहभागी होण्याच्या उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आली असून शिवाजी झावरे हे या संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्त होणारे पहिलेच भारतीय सनदी लेखापाल ठरले आहेत. शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील व्यक्तींना पूरक ठरतील असे मानक बनविण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे शिवाजी झावरे यांनी यावेळी सांगितले.

...Read More

V. S. News
“हरी मुखे म्हणा” कवी संमेलन उत्साहात

व्हीएस न्यूज ज्ञानाची हो माऊली, शीतल तिची साऊली, लवकर ये रे, ये, रे विठूराया, तु विठ्ठल, मी विठ्ठल, सकल जग विठ्ठल, अशा एकापेक्षा एक सरस अशा भावपूर्ण काव्यरचनांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. निमित्त होते ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त आयोजित हरी मुखे म्हणा या कवी संमेलनाचे.

कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित या काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव होते. यावेळी साहित्यिक सुरेश कंक ज्येष्ठ कवी बाबू डिसूझा, कार्यक्रमाचे संयोजक व मंडळाचे कार्यवाह प्रदीप बोरसे, कवयित्री शोभा जोशी, शरद शेजवळ हे व्यासपीठावर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात राज अहेरराव यांनी सुरुवातीला आजच्या पावन दिनाची कशी होईल हो उतराई, आज पुरूष सारे विठ्ठल, स्ञिया दिसे रखुमाई या ओळी सादर केल्या. ते पुढे म्हणाले, संत ज्ञानेश्वर हे जगाच्या पाठीवर एकमेव असे संत होऊन गेले की त्यांनी विश्वात्मकतेचा संदेश दिला. ते समजण्यासाठी त्यांना देव म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून बघावे. त्यांनी आपल्या आचरणातून स्ञियांना सन्मान, सर्व पंथांना समदृष्टीने बघणे, सहनशीलता, विनम्रता, समता,बंधुता, अध्यात्मातून मुक्ती प्राप्त करून देण्याचे मार्ग सुचवले आहेत. त्यासाठी प्रत्येकाने ज्ञानेश्वर फक्त वाचू नये तर त्यांच्या अभंगाचा भावार्थ आचरणात आणावा. माउलींनी समाधी घेऊन 721 वर्षे झाली. आजही त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती आळंदीला येऊ शकते.

सुरेश कंक म्हणाले की, माउलींचे पसायदान प्रेम, करूणा आणि अखंड मानव जातीला त्यांच्या कल्याणाचा सन्मार्ग दाखवणारा महामंञ आहे. पसायदान आणि माउलींचा हरीपाठ तोंडपाठ असून चालणार नाही तर कृतीने अंगीकारला पाहिजे. दिंडी चालली चालली, विठ्ठलाच्या दर्शनाला, घुमे गजर हरीनामाचा, भक्त नामात रंगला या भजनाने माधुरी विधाटे यांनी कवी संमेलनाचा प्रारंभ केला. याच पाञातून वाहे, शुद्धसा ओलेपणा. हे इंद्रायणीचे मनोगत नंदकुमार मुरडे यांनी व्यक्त केले. ज्ञानाची हो माऊली, शीतल तिची साऊली. हे गीत आय. के. शेख यांनी सादर केले. लुसलुसणारी हिरवी पाने, कोकीळेचे मंजुळ गान अशी सुंदर शब्दकळा लेऊन असा ऋतुराज वसंत अवतरला राजेंद्र घावटे यांच्या शब्दांतून. लवकर ये रे, ये, रे विठूराया अशी आर्त साद घातली नितीन यादव यांनी. तर तु विठ्ठल, मी विठ्ठल, सकल जग विठ्ठल अशा शब्दात एकत्वाची सुरेख अनुभूती वर्षा बालगोपाल यांनी दिली.

अशोक कोठारी, नंदकुमार कांबळे, मधुश्री ओव्हाळ, राधा वाघमारे, भाग्यश्री कुलकर्णी, प्राची देशपांडे, तानाजी एकोंडे, कैलास भैरट, सुमन दुबे या कवींच्या रचनांनी वातावरण भक्तीमय झाले. ह.भ.प. श्‍यामराव गायकवाड यांनी संजीवन समाधीचा सोहळा शब्दांतून मूर्तिमंत साकारला. माउलींचा जीवनपट उलगडत ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर यांनी सूञसंचालन केले. सुरेश पवार यांनी आभार मानले. पसायदानाने या भक्तीमय सोहळ्याची सुरेल सांगता झाली.

...Read More

V. S. News
ट्रक चालकावर सहकाऱ्यांकडून चाकू हल्ला

व्हीएस न्यूज एका क्‍लिनरने आपल्या सहकारी चालकावर चाकू हल्ला केला. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 17) सकाळी अकराच्या सुमारास निगडीतील अंकुश चौकात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक रोशन वर्मा (वय 27, रा. डोंबिवली) आणि क्‍लीनर खिलेश्वर कुमार यादव (रा. बिहार) हे एकाच माल वाहतूक ट्रकवर कामाला होते. याप्रकरणी आरोपी खिलेश्‍वर कुमार यादवला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

क्‍लीनर खिलेश्‍वरला नेहमी चालकापासून धोका असल्याचे भासत होते. त्यातूनच त्याने हे कृत्य केले. सकाळी डोंबिवली येथून भोसरीमध्ये पत्रे पोहचवण्यासाठी हे दोघे ट्रक घेऊन आले होते. मात्र, निगडीतील अंकुश चौकात आल्यानंतर अचानकपणे खिलेश्‍वरने चालकाच्या पोटात चाकूने वार केले यात चालक गंभीर जखमी झाला. निगडी पोलीस तपास करत आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!