खरं वाटत नाही ना... सिद्धार्थला पाहून कोहलीही झाला होता आश्चर्यचकित
पुणे
2017-12-27
व्हिएस न्यूज - सध्या आपल्या चेहऱ्याला साजेशा चेहरा असणे काही नवीन नाही. यात सचिन तेंडुलकर असो, धोनी, अमिताभ बच्चन, वा स्वर्गवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या हस्ती देखील सुटल्या नाहीत. मग, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली तरी कसा सुटणार.
सध्या, टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीसह सिद्धेश जाधव हा त्याचा डुप्लिकेटही चांगलाच चर्चेत अाहे. जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावात तो सध्या शेती करतोय. विशेष म्हणजे तो विराटला भेटल्यानंतर खुद्द विराटही चकित झाला हाेता. एवढेच नाही,तर त्याने सिद्धार्थला भारत-इंग्लंड कसोटी सामन्याचे व्हीअायपी पासही दिले हाेते.
सिद्धेशने ओतूरमध्ये बी.काॅम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो आईसोबत पिंपरी पेंढारमध्ये राहून शेती करतो. काॅलेजमध्ये असताना एका मुलीने त्याला सांगितले होते की,तो विराट कोहलीसारखा दिसतो. तेव्हापासून तो विराटला फाॅलो करायला लागला. सिद्धेश गावी शेती व पोल्ट्री फार्म सांभाळतो. त्याचा गावचा रहिवासी व मुंबईत हाॅटेलमध्ये सिक्युरिटी आॅफिसर असणारा सुभाष तपासे एकेदिवशी गावी अाला असता तोही सिद्धेशला पाहून चकित झाला. त्याने सिद्धेशचा फोटो मोबाइलमध्ये काढला. काही दिवसांनी विराट हाॅटेलात आल्यानंतर त्याला दाखवला. विराटने लगेच सिद्धेशला मुंबई बोलावून घेण्यास सांगितले. विराटने सिद्धेशची भेट घेतली व सुमारे २० मिनिटे चर्चाही केली हाेती. त्याच्या कुटुंबाबद्दल आणि शिक्षणाबद्दल माहिती जाणून घेतली. तसेच पुन्हा एकदा भेटण्याचे आश्वासनही त्याला दिले.
विराटने केली अापुलकीने विचारपूस : सिद्धेश
सिद्धेशने सांगितले की,पाच वर्षांपासूनचे विराटला भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाले. हे केवळ माझ्या मित्रांच्या प्रोत्साहनामुळे आणि सहकार्यामुळे. एवढ्या मोठ्या क्रिकेटरने आपली आपुलकीने विचारपूस केली आणि शुभेच्छा दिल्या याचा आनंद जास्त आहे. सिद्धेशला जेव्हा विराटचा डुप्लिकेट म्हणून ओळख मिळाली तेव्हापासून त्याला विविध कार्यक्रमांमध्ये बोलावले जाऊ लागले. विराटचे चाहते सिद्धेशसाेबत सेल्फी काढून आपली हौस भागवतात. विराटचा डुप्लिकेट आमच्या गावात आहे याचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया रोहित खर्गे या तरुणाने दिली.