व्हिएस न्यूज - प्लास्टरचे काम करीत असताना तोल जाऊन सहाव्या मजल्यावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास कस्पटे वस्ती येथील वुड इस्टेट येथे घडली.
राजू क्षत्रिय विक्यानंद (वय 25 रा. वारजे) असे मृत मजुराचे नाव आहे. याप्रकरणी कंत्राटदार शंकर गंगाराम राठोड (रा. शास्त्रीनगर, कोथरूड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय सहाव्या मजल्यावर बाल्कनीच्या प्लास्टरचे काम करीत असताना राजू पाय घसरून खाली कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला जबर मार लागला. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. कामगारांना सुरक्षा साधने न पुरवणाऱ्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.