व्हिएस न्यूज - रेल्वेची धडक बसून एका 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
सागर बाळासाहेब जाधव (वय 26 रा. पिंपळे गुरव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा इलेक्ट्रिशियनची कामे करतो. मंगळवारी सकाळी त्याला कासारवाडीयेथून टीव्ही दुरुस्तीसाठी फोन आला. त्यासाठी तो सकाळी नऊ वाजता घराबाहेर पडला. काम संपवून घरी परतत असताना कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ सकाळी साडेदहा वाजता रुळ ओलांडत असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चेन्नई एक्सप्रेसच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला.