व्हिएसन्यूज - चिंचवडमधील इंदिरानगरात तीन दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक नाल्यामध्ये मृत अवस्थेत आढळून आले आहे. हा प्रकार बुधवारी उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर येथील एका इमारती जवळील नाल्यामध्ये दोन ते तीन दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक आढळले आहे. दुपारी दीडच्या सुमारास एका स्थानिकाने संबंधित घटनेची पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी संबंधित अर्भक ताब्यात घेतले असून डीएनए टेस्टसाठी पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात पाठवले आहे.
अर्भकाच्या मृत्यूचे कारण अद्याप कळाले नसून पिंपरी पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत. पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.