व्हिएस न्यूज - बांधकाम साईटवर काम सुरू असताना एका कामगाराचा सेफ्टी बेल्ट तुटून खाली पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता वाकड, कस्पटे वस्ती येथील वर्धमान ड्रीम्स या बांधकाम साईटवर घडली. कामगाराच्या सुरक्षतेमध्ये हयगय केल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निरापदा धिरेद्र विश्वास (वय-44, रा. लेबर कॅम्प, वाकड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नावे आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्पटे वस्ती येथे वर्धमान ड्रीम्सची बांधकाम साईट सुरू आहे. या साईटवर विश्वास हे मजुर म्हणून काम करत होते. मंगळवारी काम करत असताना त्याचा सेफ्टी बेल्ट तुटल्याने ते खाली पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.