व्हिएसन्यूज - ओलएलएक्स या अँप वरील जाहिराती पाहुन वाहनचोरी करणारा एका चोरट्यास खडकी पोलिसांनी नुकतेच सापळा रचुन गजाआड केले.
वाहनचोरी प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव राहुल मांगिलाल प्रजापती (वय 22 रा. विश्रांतवाडी पुणे) असे आहे या प्रकरणी परवेज मणियार (वय36 रा.बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओएलएक्स या अँपवर आरोपी प्रजापती याने दि. 16 रोजी मणियार यांची डिओ दुचाकी विकण्या संदर्भातील जाहिरात पाहिली व तो मणियार यांच्या बोपोडी निवासस्थानी जाऊन त्याने गाडीची पाहणी केली. नंतर दुचाकीची एक टेस्ट राईड घेतो म्हणुन गाडी घेऊन पसार झाला. बराच वेळ झाला प्रजापती गाडी घेऊन परत न आल्याने अखेर मणियार यांनी आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले व तातडीने त्यांनी खडकी पोलिसांत तक्रार दिली.
वरिष्ठ पोलिस निरिक्षक लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरिक्षक अमित गोरे पोलिस कर्मचारी किरण घुटे तुषार शिंदे व प्रदिप गाडे आदी पथकाने दि. 27 रोजी सापळा रचुन अभियांत्रिकी महाविद्यालय चौक शिवाजी नगर येथुन आरोपी प्रजापती यांस जेरबंद करुण गजाआड केले. या वेळी त्याच्या कडील चोरी केलेली डिओ दुचाकी ताब्यात घेऊन ती जप्त करण्यात आली. आरोपी प्रजापती कडे दुचाकी चोरी प्रकरणी सखोल तपास केला असता त्याने हा गुन्हा पहिल्यांदाच केला असल्याचे निष्पण्ण झाले.