व्हिएसन्यूज - मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चेन्नई एक्सप्रेसचा जोरदार धक्का लागल्याने तरुचाच जागीच मृत्यू झाला. ही घटना चिंचवड येथे आनंदनगर झोपडपट्टीजवळ रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. प्रकाश भाऊ कांबळे (वय18) असे या तरुणाचे नाव आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चेन्नई एक्सप्रेसचा जोरदार धक्का लागल्याने प्रकाश खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती प्रकाशच्या कुटुंबीयांनी दिली. मात्र तो रेल्वेमार्गाजवळ कशासाठी गेला होता हे कळू शकले नाही. उशीर झाला तरी प्रकाश घरी आला नाही म्हणून त्याचा कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता हा प्रकार उघडकीस आला.