व्हिएसन्यूज - पाळीव श्वानाला फिरावयास घेवून जाणाऱ्या व पतीसह पायी जाणाऱ्या अशा दोन महिलांच्या गळ्यातील दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दोन लाखांचे मंगळसुत्र हिसका मारून जबरदस्तीने तोडून नेले. दोन्ही घटना वाकड परिसरात सोमवारी सायंकाळी पावणे सहा ते सहा या पंधरा मिनिटांच्या फरकाने घडल्या.
पहिल्या घटनेप्रकरणी 62 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला पावणे सहा वाजता गोल्डन पाम सोसायटीजवळून पाळीव श्वानाला फिरायला घेवून जात होती. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक लाख 5 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसका मारून तोडून नेली.
दुसऱ्या घटनेप्रकरणी 50 वर्षीय महिलेनी फिर्याद दिली आहे. ही महिला पती समवेत पायी प्रेस्टीन गॅं्रडीवर सोसायटीजवळून जोत होती. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 90 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र तोडून नेले.