हिंदी चित्रपटातील विनापरवाना गाणे वाजविल्याबद्दल म्यूझिक कंपनीच्या प्रमुखासह चौघांवर गुन्हा
हिंजवडी
2018-01-02
व्हिएसन्यूज - हिंदी चित्रपटातील विनापरवाना गाणे वाजविल्याबद्दल परसेप्ट लाईव प्रा. लिमीटेड म्यूझिक कंपनीचे प्रमुख जय उपाध्याय यांच्यासह चौघांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नुकताच बावधन सनबर्न फेस्टिव्ह येथे उघडकीस आला आहे.
विवेक खडसे (वय-31, मालती निवास, रहाटणी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार परसेप्ट लाईव प्रा. लि. मी. डायरेक्टर जय उपाध्याय व इतर तिघांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडसे नॉवेक्स कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर आहेत. त्यांच्याकडे नॉवेक्स कंपनीकडे असलेले यशराज फिल्मस प्रा. लि. मी व इरॉक्स इंटरनॅशल म्यूझिकचे अधिकार आहेत. हिंदी चित्रपटातील गाणे परसेप्ट लाईव प्रा. लि. मीच्या प्रमुखांनी वाजविले. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.