श्वान देण्याच्या बहाण्याने महिलेला दहा हजारांचा गंडा
हिंजवडी
2018-01-06
व्हीएस न्यूज - लोकॅन्टो या संकेतस्थळावर श्वान विक्रीची जाहिरात पाहून एका महिलेला संपर्क साधला. तिला दहा हजार रूपये ऑनलाईन भरण्यास सांगून श्वान न देता तिची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार हिंजवडी येथे नुकताच उघडकीस आला आहे. शुभ्रा रस्तोगी (वय-35, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजन जनार्धन शर्मा (रा. गोवा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्तोगी यांनी लोकॅन्टो या संकेतस्थळावर श्वान विक्रीची जाहिरात पाहिली. त्यांनी जाहिरात देणाऱ्या आरोपी शर्मा याच्याशी संपर्क साधला. त्यांना दहा हजार रूपये ऑनलाईन भरण्यास सांगितले. परंतु, श्वानाचे पिल्लु न देता दहा हजार रूपयांचीफसवणूक केली. फौजदार रूपनर अधिक तपास करत आहेत.