व्हीएस न्यूज - पिंपळे सौदागर येथील शिवार रोडवरील रोझलँड रेसिडेन्सी सोसायटी शेजारी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्रशस्त उद्यान उभारण्यात येत आहे. या उद्यानाला राजमाता जिजाऊ असे नाव देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी केली आहे.
नाना काटे यांनी याबाबत ड प्रभाग अध्यक्षांकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपळे सौदागर येथील सर्व्हे नं.१३०,१३२,१३३,१३४ मधील महापालिका उद्यानांसाठी आरक्षण क्र.३७१ ब प्रमाणे २.०० हेक्टर जागेत प्रशस्त उद्यान तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पिंपळे सौदागर येथील हे सर्वात मोठे व सर्व सोयीनी युक्त असे उद्यान होणार आहे. यामध्ये वैशिष्ट्य पूर्ण कारंजे, लहान मुलांसाठी खेळायचे हिरवळ युक्त मैदान, जॉगिंग ट्रँक, हास्य क्लब परिसर, मिनी ट्रेन, ध्यानधारना करण्यासाठी जागा, रंगी बेरंगी छोटे रोपटे, हस्त कला दालन, बोटिंग सहल केंद्र अशी अनेक सोयीनीयुक्त उद्यान साकारण्यात येत आहे.
या उद्यानामुळे पिंपळे सौदागरच्या शिरपेचात आणखी एक भर पडणार आहे. अशा या उद्यानाला राजमाता जिजाऊ उद्यान असे नाव देण्यात यावे. अशा मागणीचे नगरसेवक नाना काटे यांनी ड प्रभाग समिती सभेमध्ये अध्यक्षाना पत्र दिले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002