सराईत गुन्हेगार अमर चव्हाणवर एमपीडीए अंतर्गत कारवाई
पिंपरी
2018-01-11
व्हीएस न्यूज - दहशत निर्माण करणारा व पिंपरी पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार अमर नानासाहेब चव्हाण (वय-20, रा. इंदिरानगर, चिंचवड) याच्यावर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी एमपीडीए अंतर्गत गुरूवारी कारवाई केली.
सराईत गुन्हेगार चव्हाण हा पिंपरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवित होता. चव्हाणवर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. पिंपरीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याची शिफारस पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे केली होती. त्यानुसार शुक्ला यांनी सराईत गुन्हेगार चव्हाणवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. चव्हाण एका गुन्ह्याप्रकरणी येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.