व्हीएस न्यूज - कामगारांच्या पगाराच्या तीन लाख रूपये रखमेचा अपहार करणाऱ्या बाप-लेकाला पिंपरी पोलीसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंपरी येथे नुकताच उघडकीस आला आहे. दरम्यान,आरोपींना मोरवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना 15जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अर्जुन अंकुश गवारी (वय-43) व अंकित अर्जुन गवारी (वय-22,दोघेही रा. मेंगडेवाडी, आंबेगाव, पुणे) असे अटक केलेल्या बाप लेकाची नावे आहेत. याप्रकरणी हबीब शेख (वय-53, रा. त्रिवेणीनगर, तऴवडे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांची ग्लोबल एंटरप्रायजेस नावाने मनुष्यबळ पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. शेख यांच्याकडे सुपरवायझर म्हणून अर्जुन गवारी नीइल ऑटो प्रा. लि.मी कंपनीत काम करतात. या कंपनीतील कामगारांना पगार, उचल व रूम डिपॉझिट देण्याची जबाबदारी गवारी यांच्याकडे होती. नोव्हेंबर 2016 ते जानेवारी 2017 या कालावधीत आरोपी अर्जुन गवारी यांनी कामगारांचा पगार, उचल, रूम डिपॉझिट असे तीन लाख रूपये न भरता मुलगा अंकीत गवारी यांच्या मदतीने स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केला. फौजदार हरिदास बोचरे अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002