व्हीएस न्यूज - राहत्या घरासमोर पार्क केलेली मारूती कंपनीची ईरटिगा मोटार 12 डिसेंबर रोजी चोरीला गेली आहे. या मोटारीचा चिंचवड पोलीसांना अद्याप छडा लावण्यात यश आले नाही.
याप्रकरणी उदयसिंह तात्यासाहेब गायकवाड (वय-55, रा. गिरीराज हौसिंग कॉम्प्लेक्स, बिजलीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड यांची एमएच-14. एफ. जी.2659 या क्रमाकाची ईरटीगा मोटार त्यांच्या इमारतीच्या समोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने 12 डिसेंबर रोजी मध्यरात्री मोटारीचे लॉक तोडून चोरून नेला. या घटनेला एक महिना झाला असून मोटारी चोरीचा चिंचवड पोलीसांना छडा लावण्यात यश आले नाही. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.