व्हीएस न्यूज - शहरातील, टपरी पथारी हातगाडी धारकाच्या प्रश्नांसाठी आणि त्याच्या समस्या सोडवण्यासाठी, फेरीवाल्यांची संख्या, हॉकर्स झोन दिलेले लायसन्स आणि किती फेरीवाल्यांचा सर्वे झाला, किती राहिले याबाबत माहिती करून घेण्यासाठी टपरी पथारी हातगाडी पंचायत वतीने जनजागृती अभियान राबविले जात आहे.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या येथे फळभाजी विक्री करणाऱ्या कष्टकरी महिला शारदा जगताप, सुनंदा बेडें यांचे फॉर्म भरून अभियानास सुरवात करण्यात आली. याप्रसंगी पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे, शहर अध्यक्ष रमेश शिंदे उपाध्यक्ष गणेश अहेर, बळीराम काकडे, धर्मराज जगताप, राजेश मायरमनी, रवी शेलार, राम प्लहारे, संतोष परदेशी युवराज माळी आदी उपस्थित होते. टपरी पथारी हातगाडी 2007 साली कायदा झाला. 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 10 वर्षानंतर देखील आज शहरात एकही अधिकृत हॉकर्स झोन झाले नाही. टपरी हातगाडी पथारी धारक फळभाजी विक्रते अशा गोरगरीब जनतेला या योजनेचा लाभ झाला नाही. गोरगरिबांच्या योजनेत मोठ्या प्रमाणात घुसखोरी करून श्रीमंत व्यक्ती ने लाभ घेतला आहे. या योजनेत अनेक व्यक्ती ना लायसन्स मिळाले मात्र त्याचे पक्या गळ्यामध्ये पुनवर्सन झाले पाहिजे. प्रत्येक विभागात हॉकर्स झोन झाले पाहिजे. या साठी हे अभियान राबवले असल्याने बाबा कांबळे यांनी सांगितले. या अभियान अंतर्गत शहरातील सर्व टपरी पथारी हातगाडी धारकाचा मोफ़त सर्वे करून 15 फेब्रुवारी रोजी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना हा सर्वे सादर करणार असल्याने प्रल्हाद कांबळे यांनी सांगितले. शहरातील सर्व टपरी पथारी हातगाडी धारकांनी अभियानात सहभागी होऊन मोफत असलेले फोर्म भरून दयावेत असे आव्हान शहराध्यक्ष रमेश शिंदे यांनी केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002