भाजपाचे आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कारटं धोरण
व्हीएस न्यूज - महापालिका प्रवेशव्दारावर आंदोलन केल्याप्रकरणी मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांवर दखल पात्र तर आंदोलन करणाऱ्या सत्ताधारी भाजप नगरसेवकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाचे आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचे ते कारटं या धोरणाबाबत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तुषार कामटे यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुरूवारी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पालिकेच्या सुरक्षा रक्षकाने तक्रार दिली आहे.
प्रभागातील बेकायदा फ्लेक्स काढावेत म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक तुषार कामटे यांनी सोमवारी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर फेकले. कामटे हे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असल्यामुळे त्यांच्यावर फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडून होऊ लागला आहे.
यापूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेविका पौर्णिमा सोनावणे आणि मनसेचे गटनेते नगरसेवक सचिन चिखले यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा फेको आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा पालिका प्रशासनाने दाखल केला होता. त्यामुळे प्रशासन सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना अभय देत असल्याची टीका होऊ लागली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002