व्हीएस न्यूज - पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर जात असताना फुगेवाडी जवळ बीआरटी मार्गातील दुभाजकावर चढला. यामुळे बीआरटीचे बॅरिकेटस तुटून पडले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, बुधवारीही याच ठिकाणी अपघात झाल्याचे समजते. त्यामुळे बीआरटी मार्ग किती सुरक्षित आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तर बीआरटी सुरू मार्ग सुरू होण्यापुर्वी चालकांना दिसेल असा सुचना फलक लावण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.