व्हीएस न्यूज - घरी जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी होऊऩ मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता चांदणी चौकात घडली.
अमोल उध्दव टाके (वय-30, रा. वडगांव-बुद्रुक) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मेव्हना कैलास कदम (वय-27, रा. उत्तमनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. टाके हे मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चांदणी चौकातून वडगांव-बुद्रुककडे चाकीवरून जात होते. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत त्यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. वाहन चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. फौजदार ए.एल. गवारी अधिक तपास करत आहेत.