व्हीएस न्यूज - एकाच दुचाकीवरून जाणाऱ्या तीन मित्रांपैकी एकाचा दुचाकी घसरून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास औंध-हिंजवडी रोडवर घडली.
दिपक साऊद असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी मनबहादुर चौधऱी (वय-28, रा. मारूंजी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिपक कुमार कडारा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, साऊद, चौधरी, कडारा हे मित्र आहेत. शनिवारी तिघे एकाच दुचाकीवरून औंध-हिंजवडी रस्त्यावरून जात होते. आरोपी दिपक कडारा हा दुचाकी भरधाव वेगाने चालवत होता. त्यामुळे दुचाकी घसरून दिपक साऊद गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. फौजदार माने अधिक तपास करत आहेत.