पैशावरून एकाची आत्महत्या ; पत्नीसह सात जणांवर गुन्हा
वाकड
2018-01-27
व्हीएस न्यूज - लोन काढण्यास भाग पाडून एकाला सात जणांनी मारहाण करून गळफास घेवून आत्महत्या करण्यास भाग पाडले. गळफास घेण्यापुर्वी त्यांनी पत्नीसह सात जणांच्या नावांनी चिठ्टी लिहून ठेवली आहे. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.
हाजीमंलग काशिमसाहब मुल्ला असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्यानुसार त्यांची पत्नी सपना हाजीमंलग मुल्ला (वय-29), रंजना प्रकाश शिर्के (वय-50), अतिश प्रकाश शिर्के (वय-32), सुजाता अतिश शिर्के (वय-28), प्रकाश शिर्के (वय-55, सर्व रा. साई संकुल सोसायटी, रहाटणी), संदीप वाघमारे (वय-35), विकास म्हस्के (वय-35) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांचा भाऊ नबीलाल मुल्ला (वय-41, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत फौजदार सुनिता गोडे यांनी माहिती दिली. हाजीमंलग मुल्ला यांना आरोपींनी पैशांची मागणी करत लोन काढण्यास भाग पाडून हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या धक्का बसलेल्या मुल्ला यांनी शुक्रवारी घरामध्ये फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. मुल्ला यांनी आत्महत्या करण्यापुर्वी पत्नीसह आरोपींच्या नावाने चिठ्टी लिहून ठेवली आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत. परंतू, त्यांना लोन का काढण्य़ास सांगितले हे अद्याप निष्पन्न झाले नसल्याचे गोडे यांनी सांगितले. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.