व्हीएस न्यूज - सदनिकेचे कुलूप उचकटून चोरट्यांनी सुमारे पावणेतीन लाखांची घरफोडी केली. ही घटना शुक्रवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास घडली.
या प्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदनिका कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी कुलूप कशाच्या तरी सहाय्याने उचकटले. त्यानंतर घरात घुसून कपाटातील एकूण 2 लाख 73 हजार 200 रुपयांचे सोन्याचे दागिने घरफोडी करून चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.