व्हीएस न्यूज - रोटरी क्लब ऑफ निगडी-पुणे तर्फे ११ फेब्रुवारीला (रविवारी) निगडी प्राधिकरण येथे आठव्या ‘रनेथॉन ऑफ होप २०१८’ या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ निगडी-पुणे चे अध्यक्ष रो. हेमंत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष रो. विजय काळभोर, हॉटेल हिलटनचे व्यवस्थापक आदित्य समशेर मल्ला, रो. डॉ. संजय देवधर, रो. रवी राजापूरकर, रो. अरविंद खांडकर, रो. सुनिल जेजुरीकर, रो. सुधीर मित्रा आदी उपस्थित होते.
ही मॅरेथॉन महाराष्ट्र अॅथलेटिक असोसिएशनचा महत्वपूर्ण उपक्रम आहे. निगडी प्राधिकरण येथे संत तुकाराम उद्यानाशेजारील मैदानावरून (सिटी प्राईड स्कूलजवळ) सकाळी पावणेसहा वाजता स्पर्धेला सुरुवात होईन. ही स्पर्धा चॅरिटी आणि स्पर्धा या दोघांचा संगम असून त्यात एकाच दिवशी १२ वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यती होणार आहेत. मुले- मुली तसेच स्त्री-पुरूष अशा चार वेगवेगळ्या वयोगटात स्पर्धा पार पडेल.
निगडी रोटरी क्लबचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी म्हणाले की अशा प्रकारच्या लोकप्रिय आणि सहभागाच्या दृष्टीने महत्वाच्या स्पर्धेचे आयोजन करताना अतिशय अभिमान वाटत आहे.खेळाला प्रोत्साहन देऊन फिटनेस बाबत जागृती करणे यासह वेगवेगळ्या संस्थांमार्फत चालविण्यात येणा-या सोशल सर्व्हिस प्रोजेक्ट्साठी मदत निधी उभारणे हा आमचा उद्देश आहे. गरजू व्यक्तींपर्यंत पोहचून त्यांच्या चेह-यावर हास्य फुलविणे हे यंदाच्या रनेथॉन फॉर होपचे घोषवाक्य आहे.
माजी अध्यक्ष डॉ. संजय देवधर म्हणाले की, सहभागी स्पर्धकांसाठी रनेथॉन नेहमीच जीवनाच्या वेगवेगळ्या प्रवासातून जात असते. केवळ मदत निधी उभारणे एवढाच या स्पर्धेमागचा उद्देश नसून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मात्र एकच छंद आणि आवड असणाऱ्या लोकांना एकत्र आणून त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा रोटरी क्लबचा या उपक्रमामागील हेतू आहे. सर्वांगीण समाज सुधारणा सामाजिक एकता हा रोटरी इंटरनॅशनलचा उद्देश असून वेगळेपण (मेकिंग अ डिफ्रन्स) ही या वर्षीची संकल्पना आहे.
१८ वर्ष व त्यापेक्षा जास्त वयोगटांसाठी २१ किमी आणि १० किमी आणि ५ किमी पेक्षा जास्त तर १४ ते १६ वयोगटासाठी ३ किमी अंतराची स्पर्धा होणार आहेत. याशिवाय अन्य स्पर्धाही होणार आहेत. यामध्ये ५ किमीची स्पर्धा खुल्या वयोगटासाठी असणार आहे. तसेच २ किमीची धर्मादाय स्पर्धा उद्योग क्षेत्रासाठी असणार आहे. या वर्षी एकूण ४ लाख १५ हजार रुपयांपर्यंतची पारितोषिके असून प्रत्येक सहभागी स्पर्धकाला पदक देण्यात येणार आहे. तसेच २१ आणि १० किमीच्या शर्यतीत सहभागी होणाऱ्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वर्षांचे असणाऱ्यांसाठी या वर्षी विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत.या स्पर्धेचे प्रायोजक हे हॉटेल डबल ट्री, सिसका एलईडी, सँडवीक एशिया, टाटा मोटर्स, एसकेएफ इंडिया, एमरसन, एनप्रो आणि टिजेएसबी हे आहोत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकwww.runathon.org या संकेत स्थळावर भेट देऊन आपली नोंदणी करु शकतात किंवा सविता राजापूरकर -9850588864, विजय काळभोर 9881371893 , डॉ.प्रवीण घाणेगावकर – 9823882251 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने करण्यात आले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002