व्हीएस न्यूज - भरधाव वेगातील दुचाकी चालकाने पायी जाणाऱ्या महिलेला पाठीमागून धडक दिल्याने 30 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजता घडली.
मंगल मल्लीनाथ तुपे (वय 30 रा. संभाजीनगर, थेरगाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी अल्पवयीन दुचाकी चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल या सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास काळेवाडी फाट्याच्या दिशेने पायी जात होत्या. पाठीमागून आलेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराने त्यांना पाठीमागून धडक दिली. यामध्ये त्यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.