व्हीएस न्यूज - ट्रक पाठीमागे घेत असताना कंपनीत खाली बसून काम करणाऱ्या महिलेच्या अंगावरून ट्रकच्या चाकाखाली आली. त्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजता तळवडे येथील ज्योतीबानगर मधील मधुबन ट्रेड स्टिल येथे घडली.
मंगल जालींदर सुर्यवंशी (वय-59, रा. नवनिर्माण हौसिंग सोसायटी, रूपीनगर, तळवडे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा सुनिल सुर्यवंशी याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रक चालक योगेश मधुकर आगाव (वय-21, रा. बालघरे वस्ती, कुदळवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार, सुर्यवंशी या तळवडे येथील मधुबन स्टिल प्रा.लि कंपनीत कामाला होत्या. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता त्या कंपनीत खाली बसून काम करत होत्या. ट्रक चालक योगेशने ट्रक पाठीमागे घेत असताना पाहिले नाही. खाली बसलेल्या मंगल सुर्यवंशी यांच्या अंगावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
फौजदार एस. वाय होळकर अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002