व्हिएस न्यूज - पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या वतीने यशस्वी प्राथमिक विद्यालयात आयोजित चित्रकला स्पर्धेत गायत्री हंडाळ हि प्रथम, सदाफ शेख द्वितीय, अंकिता गवई तृतीय तर रेणुका चौगुले हिला उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवकाते, मुख्याध्यापिका शोभा देवकाते, पोलीस कामा रत्नपारखी, रामजी प्रजापती, राजेश प्रजापती, संजय दुबे आदी उपस्थित होते. याप्रसंगी विज्ञान प्रदर्शात यशस्वी झालेल्या हिना शाबादी, सिध्दार्थ कोरे, गौरी तुपारे, प्रशांत गुंजाळ, हिम्मत बिक यांचाही गौरव करण्यात आला.