व्हीएस न्यूज - एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड, चिंचवड या कंपनीमार्फत सामाजिक बांधिलकीतून एस. के. एफ. कंपनीजवळ (सी.एस.आर) फंडातून बांधण्यात आलेल्या महिला व पुरुषांसाठीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे तसेच काळभोर नगर येथील मनपा शाळेमधील मुलींच्या स्वच्छतागृहामध्ये बसविण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनचे हस्तांतरण महापालिकेस करण्यात आले.
यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, झामाबाई बारणे, माधुरी उर्फ मोनाताई कुलकर्णी, करुणा चिंचवडे, मीनल यादव,नगरसदस्य नामदेव ढाके, सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त संदीप खोत, आशादेवी दुरगुडे, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, उपअभियंता सी.बी.कोंडे, उमेश मोने, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम. शिंदे,पुंडलिक दरोडे, मुख्य आरोग्य निरीक्षक मकरंद पानसे, वसंत सरोदे, एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.अनिरुद्ध, मुख्य कार्मिक अधिकारी संजय गायकवाड, उपकार्मिक अधिकारी निम्हा गिध आदी उपस्थित होते.
यापूर्वी एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने के.एस.बी.चौक व थरमॅक्स चौक चिंचवड येथे महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी केलेली आहे. या उपक्रमासाठी आजपर्यंत कंपनीने (सी.एस.आर) च्या माध्यमातून सुमारे ३५ लाख रुपये इतका खर्च केला आहे. तसेच एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने आकुर्डी, काळभोर नगर चिंचवड, रुपीनगर निगडी, श्रमिक नगर निगडी येथील मनपाच्या माध्यमिक शाळेत देखील सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवून त्याचे महापालिकेस हस्तांतरण केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002