काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार
पिंपरी-चिंचवड
2017-12-08
व्हीएस न्यूज - कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर जातीवाचक टीका करताना नरेंद्र मोदी हे 'नीच आदमी'व 'असभ्य' आहेत, असा उल्लेख केला. या वक्तव्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या वक्तव्यानंतर राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी निगडी पोलीस ठाण्यात कॉंग्रेस नेते अय्यर यांच्याविरोधात तक्रारअर्ज दाखल केला आहे.
यावेळी आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, महिला आघाडी शहराध्यक्षा शैला मोळक, 'अ' प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, नगरसेवक माऊली थोरात, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.