व्हीएस न्यूज - नवऱ्याबरोबर झालेल्या भांडणाची पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चौकशीसाठी जाणाऱ्या एका महिलेला पती व त्याच्या मित्राने भरस्त्यावर डोक्याचे केस ओढत हाताने मारहाण केली. तसेच तोंडावर ऍसिड फेकून जीवे मारण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना गुरूवारी सकाळी अकरा वाजता वाकड येथील प्रथम सोसायटीजवळ घडली.
याप्रकरणी अरूणा सुहास पवार (वय-27, रा. रहाटणी, श्रीनगर शिवशक्ती कॉलनी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सुहास जनार्दन पवार, प्रशांत जनार्दन पवार, नितीन घोडेस्वार (तिघे रा. विजयनगर, काळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूणा व पती सुहास यांची गेल्या काही दिवसांपासून वारंवार भांडणे होत आहेत. या भांडणाला वैतागलेल्या अरूणा यांनी वाकड पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीविरोधात वाकड पोलीसांनी त्यांना गुरूवारी सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी बोलविले होते. त्या दुचाकीवरून प्रथम सोसायटीजवळ जात होत्या. पाठीमागून आलेल्या एकाच दुचाकीवरून आलेल्या तिन आरोपींनी त्यांच्या दुचाकीला दुचाकी अडवी लावली. आरोपी पती, त्याचा नातेवाईक व एक मित्राने हाताने मारहाण करत डोक्याचे केस ओढून, कपडे फाडून तोंडावर ऍसिड फेकून जीवे मारण्याची धमकी दिली.
वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002