व्हीएस न्यूज - पोलिसांच्यावतीने सुरु असलेल्या ‘डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप’ स्पर्धेअंतर्गत उपविभागीय पोलिस अधिकारी स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत लहान गटात भैरवनाथ विद्यामंदिर, नराळे, तळवडे शाळेच्या तर मोठ्या गटात डॉ. डी.वाय. पाटील, एबीएम महविद्यालय संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
पोलिसांच्यावतीने ‘डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप’ ही विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेअंतर्गत मंगळवारी उपविभागीय पोलिस अधिकारी स्तरावर प्रत्येक पोलिस ठाण्यातून निवड झालेल्या झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा झाली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी (देहूरोड) गणपत माडगूळकर हे प्रमुख पाहूणे होते. यावेळी व्यासपिठावर डॉ. डी.वाय. पाटील महविद्यालयाचे प्राचार्य ए.एस. कोंडेकर, पोलिस निरीक्षक अरुण मोरे, सुरेश निंबाळकर, मुगूट पाटील, बी.आर. पाटील, पत्रकार अमोल येलमार उपस्थित होते.
विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून या स्पर्धा सहा जिल्ह्याच्या स्तरावर सुरु आहेत. यामध्ये सुरुवातीला प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शाळेत या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतून प्रत्येकी एका शाळेची लहान, मोठ्या गटात निवड करुन त्यांची स्पर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी स्तरावर घेण्यात आली. या स्पर्धेत महिला व बालकांवरील अत्याचार, जलदगती न्यायालय, अल्पवयीन गुन्हेगारी, धार्मिक तेढ यासारख्या गंभीर विषयांवर वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये लहान गटात चार शाळांच्या संघांनी तर मोठ्या गटात तीन शाळांच्या संघांनी सहभाग नोंदवला.
लहान गटात भैरवनाथ विद्यामंदिर, नराळे, तळवडे शाळेच्या वैभवी साहेबराव मराठे, संस्कृती वसंत पवळे आणि सरोज मारुती पोले या संघाने विद्यार्थ्यांमधील वाढत्या आत्महत्येचे प्रमाण या विषयावर पहिला क्रमांक पटकावला. तर मोठ्या गटात डॉ. डी.वाय. पाटील, एबीएम कनिष्ठ महविद्यालय, आकुर्डीच्या आकाश मनोहर पाटील, सुदर्शन रघुनाथ कारखीले आणि गौरव राजेंद्र काळे या संघाने धार्मिक तेढ या विषयावर प्रथक क्रमांक पटकावला. या स्पर्धेत लहान गटात वैयक्तीक प्रथम क्रमांक वैभवी मराठे तर द्वितीय क्रमांक संस्कृती पवळे हिने पटकावला. मोठ्या गटात वैयक्तीक प्रथम क्रमांक आकाश पाटील तर द्वितीय क्रमांक गौरव काळे याने पटकावला. विजेता संघाची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे, या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून बाळासाहेब रासकर, अमोल येलमार आणि अनिल धर्माधिकारी यांनी काम पाहिले. डॉ.डी.वाय. पाटील महाविद्यालयात या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्राचार्य एम.एस. हिरेमठ, आर.बी. सिद, तसेच कर्मचारी यांनी कष्ट घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. एस.आर. पाटील यांनी तर संयोजन प्रा. सपना ठाकुर यांनी केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002