व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडीवरून बरेच महाभारत घडले आहे. आमदार महेश लांडगे गटाला अध्यक्षपदावरून डावलल्याने मोठा राजकीय भूकंप झाला आहे. नितीन काळजे यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला. तर लांडगे समर्थक राहुल जाधव यांच्यासह जुने निष्ठावंत शितल शिंदे यांनी स्थायीच्या सदस्यपदाचा राजीनामा पक्षनेते तसेच शहराध्यक्षांकडे देऊन आपली नाराजी जाहिर केली आहे.
स्थायी अध्यक्षपदी भोसरीचे आमदार लांडगे समर्थक राहुल जाधव तसेच जुने निष्ठावंत शितल शिंदे यांना डावलून आमदार जगताप समर्थक ममता गायकवाड यांचा अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळेच सर्व नाराजांनी राजीनामे दिले आहेत.
राजीनाम्याबाबत बोलताना महापौर काळजे म्हणाले की, शहराच्या स्थायी समिती सभापती पदी राहुल जाधव यांना संधी देण्यात माझ्या पदाची भौगोलिक अडचण झाली असेल म्हणून आमदार महेश दादा लांडगे यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या वृत्तीचा आदर करुन मनापासून महापौर या पदाचा राजीनामा दिला आहे.
तर भाजप आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, सर्वच प्रमुख पदाधिकार्यांचे राजीनामे पक्षानामे घेतले असून अजून कोणताही स्विकारलेला नाही. लवकरच पक्षाची भूमिका स्पष्ट करू.
व्हीएस न्यूज - रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना विनाकारण शिवीगाळ करणाऱ्या टोळक्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघांना या टोळक्याने कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण केली. दोन वाहनांचीही तोडफोड केली. ही घटना चिखली येथे शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली. विक्की काळे, संतोष कळमकर, सचिन तेली (सर्व रा. विद्यानगर, पिंपरी) यांच्यासह आणखी तिघांविरोधात निगडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी समाधान नवनाथ खरात (वय 27, रा. हरगुडेवस्ती, चिखली) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हरगुडे वस्ती येथील एका गॅरेजजवळ शुक्रवारी सायंकाळी हे टोळके येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना विनाकारण शिवीगाळ करीत होते. याबाबत समाधान खरात यांनी जाब विचारला असता चिडलेल्या टोळक्याने समाधान यांना कोयत्याने मारहाण केली. तसेच समाधान यांच्या मित्राला देखील मारहाण करून जखमी केले. निगडी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - टोळक्यासह एकास मारहाण केल्याप्रकरणी महापालिकेच्या माजी नगरसेवकाच्या विरोधात त्याच्या तीन साथीदारांसह चिंचवड ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत कोऱ्हाळे असे गुन्हा दाखल झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. कोऱ्हाळे यांच्यासह चंद्या, प्रसाद जाधव आणखीन एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सागर रमेश कोंडे (वय 42, रा. दत्तवाडी, पुणे) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोऱ्हाळे हे मागील पंचवार्षिकमध्ये मनसेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. गेल्या वर्षी निवडणुकीपूर्वी त्याने त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. 2017 च्या पालिका निवडणुकीत त्यांच्या पराभव झाला होता. फिर्यादी कोंडे हे गुरुवारी रात्री आठच्या सुमारास काही कामानिमित्त चिंचवडगाव बस थांब्याजवळ थांबले होते. त्यावेळी आरोपी प्रसाद जाधव तिथे आले. त्याने तुम्ही येथे कशाला परत आलात, परत येथे आलात तर तुमचे हातपाय तोडून टाकेन अशी धमकी दिली. तसेच दुसऱ्या एकाने कोंडे यांच्या डोक्यात मारहाण केली. तर कोऱ्हाळे यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, असे कोंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - ईशान्य भारतातील त्रिपुरा आणि नागालॅंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यामुळे देशातील एकूण 20 राज्यांमध्ये भाजपची सत्ता निर्माण झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने शनिवारी पिंपरीतील आंबेडकर चौकात जल्लोष साजरा करून पेढे वाटण्यात आले. तसेच यावेळी गुलाल उधळून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्रिपुरा, नागालॅंड, मेघालय या तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचा शनिवारी निकाल लागला. त्यामध्ये त्रिपुरा आणि नागालॅंड या दोन राज्यांत भाजपने विजय मिळविला आहे. त्रिपुरा आणि नागालॅंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यामुळे भाजपची देशातील एकूण 20 राज्यांत आजमितीला सत्ता निर्माण झाली आहे. यावेळी शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, भाजप शहर सरचिटणीस प्रमोद निसळ, अमोल थोरात, सारंग कामतेकर, संजय मंगोडेकर, प्रदेश सचिव उमा खापरे, प्रदेश पदाधिकारी राजेश पिल्ले, सदाशिव खाडे, अमर मुलचंदानी, महेश कुलकर्णी, स्थायीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेविका ममता गायकवाड, आशा शेंडगे, रवि लांडगे, कैलास बारणे, शैला मोळक, विजय लांडे, रामकृष्ण राणे आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या एकूण 22 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महापालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला. स्थायी समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमास स्थायी समिती सदस्य शितल शिंदे, नगरसदस्या झामाबाई बारणे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, चारुशिला जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये भांडार अधिकारी सुरेश लांडगे, असिस्टंट मेट्रन शोभा शिंदे, मुख्य आरोग्य निरिक्षक संजय देसाई, मुख्य लिपिक किशोर केदारी, नितीन खंडागळे, अंकुश लाहीगुडे, दत्तात्रय वाघमारे, फार्मासीस्ट किशोर परदेशी, ग्रंथपाल कम लिपिक आशा शिंदे, मजूर रमाकांत दळवी, आरोग्य कर्मचारी जालिंदर मकासरे, भागीरथी वजाळे यांचा समावेश आहे. तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी संजय पोटे, मुख्य लिपिक कैलास गायकवाड, हार्टीकल्चर सुपरवायझर इलाई बंडवल, प्रभाकर कुंभार, आरोग्य कर्मचारी सिताबाई तुपे, भारती क्षीरसागर, प्रकाश शिंदे, सुभाष ढोरे, मनोजकुमार ढिलोड, लक्ष्मी भोसले, यांचा समावेश आहे. प्रास्ताविक व सुत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले.
व्हीएस न्यूज - महाराष्ट्र राज्याची एस.एस.सी परीक्षा तळेगाव शहर व मावळ परिसरात शांततेत सुरु झाली. कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. सर्वच केंद्रावर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी पहिला पेपर सोपा गेल्याने आनंद व्यक्त केला. मावळ तालुक्यात एकूण अकरा केंद्रावर 6560 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. तळेगावात रामभाऊ परुळेकर आणि ऍड पु. वा. परांजपे विद्या मंदिर अशी दोन प्रमुख मुख्य केंद्र आहेत. या दोन्ही केंद्रात एकूण 1562 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. मावळ तालुका मुख्याध्यपक संघाचे अध्यक्ष राजेश गायकवाड, मावळ तालुका शिक्षेकेतर संघटनेचे अध्यक्ष संजय कसाबी, नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्ष महेश शहा आदि संस्थांचे पदाधिकारी यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. मावळ तालुक्यात लोणावळा शहरात 1564 विद्यार्थी, पवनानगर 434 विद्यार्थी, वडगाव 743 विद्यार्थी, चांदखेड 424 विद्यार्थी, देहूरोड 823 विद्यार्थी, देहू 359 विद्यार्थी, तसेच तळेगाव दाभाडे येथे 1562 विद्यार्थी असे तालुक्यातील विविध माध्यमिक शाळामधील विद्यार्थी परीक्षेला बसल्याचे मावळ तालुका मुख्याध्यपक संघाचे अध्यक्ष राजेश गायकवाड यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीने अभ्यासाच्या तणावामुळे होस्टेलवर ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दीडच्या सुमारासा चिंचवड येथे उघडकीस आली. प्रिती गोरख जाधव (वय 22 वर्ष रा. चिंचवड, मूळ सांगवी, जिल्हा बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. प्रिती ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. चिंचवड, गांधी पेठ येथे होस्टलमध्ये ती मैत्रिणीसोबत राहत होती. शुक्रवारी होस्टलमध्ये कोण नसताना तीने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी दीडच्या सुमारास तीची एक मैत्रिण होस्टलमध्ये आली. तिने दरवाजा ठोठाविला असता आतून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. घर मालकीनेने घराच्या जाळीतून पाहिले असता प्रिती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी प्रितीने लिहून ठेवली आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
भांडणे सोडविण्यास आलेल्या दोघांना चोपले
व्हीएस न्यूज - बारा जणांच्या टोळक्याने एका तरूणाला हॉकी स्टिक, सिमेंटच्या गट्टूने जबर मारहाण केली. तरूणाला वाचविण्यासाठी आलेल्या दोघांनाही टोळक्याने मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास गांधीनगर येथे घडला. पूर्ववैमनस्यातूनच हाणामारीचा प्रकार घडल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. दिनेश शिंगाडे (वय 26, रा. खराळवाडी), अक्षय थोरात, (वय20), कुणाल वेताळ (वय19), अनिकेत भांडेकर (वय20), लंकेश गुंजे (वय21), सुनिल तेलकर (वय19), रामु बनपट्टे (वय20), विजय धोत्रे (वय21), बसलिंग (वय21), योगेश बनपट्टे (वय25) यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चंद्रकांत बोचकुरे (वय-28, रा. पिंपरी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत फौजदार सागर पाटील यांनी माहिती दिली. शुक्रवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास हातात कोयते, हॉकी स्टिक, गड्डू घेवून दहशत माजवित फिर्यादीचा मित्र सौरभ वाघमारे याला बारा जणाच्या टोळक्याने जबर मारहाण केली. सौरभच्या मदतीला गेलेल्या फिर्यादी यांना आरोपी दिनेश शिंगाडे याने जीवे मारण्याची धमकी देत डोक्याच्या उजव्या बाजूस सिमेंटचा गट्टू मारून गंभीर जखमी केले. तर राहूल खाटीकमारे याला जबर मारहाण केली. पूर्व वैमनस्यातूनच हाणामारी झाल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश व मराठी मिडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. एकाहून एक सरस प्रकल्प सादर करीत चिमुकल्यांनी विज्ञानाची गुपिते उलगडली. फायर अलार्म, सबमशीन, विघटनशील प्लास्टिक, स्पीड कंट्रोलर, वॉटर लेव्हल इंडिकेटर, एल.ई. डी. अल्ट्रासॉनिक सेन्सर, गर्ल्स सेफ्टी डिवाइस, हायड्रॉलिक ब्रिज, प्रोजेक्टर, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी वैज्ञानिक प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. पाणी वाचवा संदेश, पर्यावरणाची हानी रोखण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांनी केले. आरती राव म्हणाल्या, विज्ञानाची कास धरुन त्याचे प्रत्यक्ष दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावे, याकरीता असे प्रकल्प उपयुक्त आहेत. प्रत्येक घटनेमागे शास्त्रीय विवेचन असते. त्यामुळे विज्ञान प्रकल्पांमधून आपल्याला नैसर्गिक गुणधर्मांच्या क्रिया व प्रतिक्रिया समजतात. विज्ञानातील गमतीजमती आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सतत नवीन शोधण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ज्याच्या मनात वेगळा आणि नाविन्यपूर्ण विचार येईल, तो शास्त्रज्ञ बनू शकतो. विज्ञानाची आवड विद्यार्थ्यांतील शास्त्रज्ञ वृत्ती विकसित करीत असते. त्यामुळे केवळ अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विज्ञान शिकण्यापेक्षा आवडीने विज्ञान शिकायला हवे.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजपाचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे व राष्ट्रवादी कॉंग्र्रेसचे किरण मोटे यांनी बुधवारी मुंबईत मातोश्री बंगल्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख योगेश बाबर उपस्थितीत होते. जितेंद्र ननवरे हे 10 वर्ष राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक म्हणुन कार्यरत होते. 2017च्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नीला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी संत तुकारामनगर-कासारवाडी या प्रभागातुन मिळाली होती. तसेच किरण मोटे हे कासारवाडी प्रभागातुन राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक म्हणुन 2012 च्या निवडणुकीत निवडूण आले होते.
व्हीएस न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी टॅलेंटेड आर्टिस्ट असून मोकळा श्वास घेण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यांना त्यांच्या भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा. पण अशा खासगी कंपनीची जाहिरात मुख्यमंत्री या पदावर असलेल्या व्यक्तीने करणे ही दुर्दैवाची बाब असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री तसेच सरकारी अधिकाऱ्यांवर नदीवरील टी सिरीजच्या जाहिरातीवरून टीका केली. या जाहिरातीत मुंबई पोलीस आयुक्तांचे काय काम आहे?असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला. त्याचबरोबर सुळे यांनी सरकारवर मराठी भाषेच्या मुद्द्यावरुनही टीका केली. मराठी भाषेचा राग राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला आहे की काय? अशीच परिस्थिती सध्या दिसून येते आहे. मराठी भाषेचा अधिवेशनात सातत्याने अपमान होणाऱ्या घटना घडल्या आहेत. १३०० मराठी शाळा बंद करण्याच पाप हे सरकार करत आहे. त्यामुळे भाजप आणि सेना दोघांकडून मराठीचा अपमान केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुळे यांनी पुण्यातील एम्प्रेस गार्डनच्या जमिनीच्या प्रश्नावर आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांना सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दर्शविला. तसेच या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्याशी बोलण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
व्हीएस न्यूज - सोसायटीतील सभासद आणि बिल्डर यांच्यात आयोजित बैठकीत झालेल्या वादावरून बिल्डरच्या 27 जणांच्या टोळीकडून दोन सभासदांना बॅटने व हाताने जबर मारहाण करून धमकी दिली. ही घटना मुळशी, माणगाव येथील शर्मा व्हिलेज अपार्टमेंट रविवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी तिन आरोपींना हिंजवडी पोलीसांनी अटक केली असून त्याचे साथीदार फरार आहेत. संतोष शिवाजी इरले (वय-35, रा. माणगाव,ता. मुळशी), विशाल सुरेशराव बलकवडे (वय-35, रा. जनवाडी), रविंद्र मोतीलाल जव्हेरी (वय-51, रा. आरोयन कॉम्प्लेक्स, खडकी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रॉबर्ट ऍन्थोनी पॉल (वय-30, रा. शर्मा व्हिलेज अपार्टमेंट, माणगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा व्हिलेज अपार्टमेंटच्या सभासदांची बिल्डर शर्माबरोबर रविवारी सकाळी साडेअकरा वाजता बैठक होती. यावेळी बिल्डर व सभासदांमध्ये काही कारणावरून वादावादी झाली. याचा राग आल्याने बिल्डर शर्माच्या 27 जणांच्या टोळीने फिर्यादी पॉल व सोसायटीच्या आणखी एका सभासदाला बॅटने व हाताने जबर मारहाण करत धमकी दिली. फौजदार नंदराज गभाले अधिक तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002