Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
संविधान हाच मानवतेचा आदर्श धर्मग्रंथ - सत्यपाल महाराज

व्हीएस न्यूज - विश्वाला मैत्री, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारा सामाजिक समता तसेच न्यायाचा धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुर येथे देऊन धम्मचक्र परिवर्तन केले. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागण्याचे मार्गदर्शन संविधान करते. भारतीयांचे कल्याण संविधानाव्दारेच शक्य आहे. संविधान हाच खरा मानवतेचा आदर्श धर्मग्रंथ आहे. हा मानवतावादी विचार सर्व भारतीयांनी स्विकारला पाहिजे. असे मार्गदर्शन प्रबोधनकार, सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी केले.

पिंपळे गुरव येथे 61 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, औंध कॅंम्प, दापोडी परिसरातील संयुक्त जयंती महोत्सव समिती आणि नागविदर्भ असोसिएशन तसेच सेहेचाळीस बुध्द विहारांच्या वतीने पिंपळे गुरव येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात रविवारी (दि. 8 ऑक्टोबर) आयोजित कार्यक्रमात माजी आमदार आण्णा बनसोडे, परराष्ट्र मंत्रालयाचे संचालक अतुल गोतसुर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे अध्यक्ष अमरसिंग आदियाल, ओबीसी परिषदेचे राज्य संघटक उल्हास राठोड, राहूल काकडे, ॲड. राजेश नितनवरे, ज्येष्ठ पत्रकार बबन कांबळे, संदीप नितनवरे, चंद्रकांत वाकोडे, प्रा. रवींद्र इंगोले, नयन अहिरे, सुनील निकम, दिपक म्हस्के, पारधे सर उपस्थित होते.

परराष्ट्र मंत्रालयाचे संचालक अतुल गोतसुर्वे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना गोतसुर्वे म्हणाले की, मृत्यूनंतर पुढे काय होते, या प्रश्नाचे उत्तर शोधत बसण्यापेक्षा वर्तमानात चांगल्या गोष्टींचे आचरण करा, अशी शिकवण देणारा धर्म म्हणजे बौध्द धर्म होय. समाजात समतेने जगण्याचा मार्ग बुध्दांनी दिला. बुध्दांची पंचशील तत्व आचरणात आणल्यास दु:ख कमी होण्यास मदत होईल. डॉ. बाबासाहेब सुध्दा सुखकारक आयुष्य जगले असते. मात्र, त्यांनी बहुजनांसाठी त्याग केला. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्यासाठी आधी स्वयंप्रकाशित व्हा. असेही गोतसुर्वे म्हणाले. स्वागत अमरसिंह आदियाल, सुत्रसंचालन दीपक म्हस्के आणि आभार नयन अहिरे यांनी मानले.

...Read More

V. S. News
भिमसृष्टीला गती देवून काम पूर्ण करा – महापौर नितीन काळजे

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात येणा-या भिमसृष्टीचे कामकाजास गती देण्यात येवून भिमसृष्टीचे काम मार्च 2018 पूर्वी पूर्ण करण्यात यावे अशा सुचना महापौर नितिन काळजे व स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांनी दिल्या. तसेच भिमसृष्टी मध्ये माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. पिंपरी चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भिमसृष्टी उभारणे कामी गठीत केलेल्या समितीच्याबैठकीत ते बोलत होते.

महापौर नितिन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकिस उपमहापौर शैलजा मोरे, आयुक्त श्रावण हार्डीकर, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्य शैलेश मोरे, बाबासाहेब त्रिभुवन, नगरसदस्या कमल घोलप, अनुराधा गोरखे, आशा धायगुडे-शेंडगे, माजी नगरसदस्य ॲड गोरक्ष लोखंडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, निवृत्त कार्यकारी अभियंता शरद जाधव, उपअभियंता एन.एन.मोरे, व्हि.के.जाधव, सामाजिक कार्यकर्ते संतोष जोगदंड, अशोक शिलवंत, वास्तु विशारद शिरिष चिद्दरवार, शिल्पकार महेंद्र थोपटे, चित्र शिल्पकार डॉ.जी.एन.आंबे आदी उपस्थित होते.

भीमसृष्टि अंतर्गत उभारण्यात येणा-या म्युरल्सचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. महापौर नितिन काळजे व स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांनी भीमसृष्टी उभारण्यात येणा-या म्युरल्सला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात माता रमाई यांचा पुतळा उभारण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी पुतळ्याभोवती पोष्टर, फ्लेक्स, बॅनर्स लावण्यास प्रतिबंध करण्यात येवून परिसर संरक्षित करण्यात यावा असे स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांनी सागितले. बैठकिचे सुत्रसंचालन कार्यकारी अभियंता संजय कांबळे यांनी केले तर आभार सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी मानले.

...Read More

V. S. News
अंत्योदय लाभार्थींना साखर वाटप बंद होण्याची शक्‍यता

व्हीएस न्यूज - अंत्योदय योजना लाभार्थींकरिता शिधापत्रिकेवर वाटप केली जाणाऱ्या साखरेचे अनुदान केंद्र सरकारने बंद केले आहे. त्यामुळे या महिन्यानंतर अंत्योदय लाभार्थींना शिधापत्रिकेवर मिळणारी साखर बंद होणार आहे. याचा शहरातील तीन हजार लाभार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. यापूर्वीच दारिद्य्र रेषेखालील आठ हजार लाभार्थ्यांना गेली चार महिन्यांपासून साखर वाटप करणे बंद करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात अ आणि ज या दोन परिमंडळ कार्यालयांतर्गत एकूण 197 स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दोन्ही कार्यालयांतर्गत स्वस्तधान्य दुकानदारांमार्फत शिधापत्रिकाधारकांना गहू व तांदळाचा पुरवठा केला जातो. अंत्योदय योजनेअंतर्गत अ कार्यालयाकडे 412 शिधापत्रिकाधारकांची नोंद असून नव्याने 36 नागरिकांचे अर्ज नुकतेच कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. तर ज कार्यालयाकडे 1,989 शिधापत्रिकाधारकांची नोंद आहे. याशिवाय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अ कार्यालयाकडे 1 लाख, 46 हजार 552 तर ज कार्यालयाकडे 1 लाख, 53 हजार 59 शिधापत्रिकाधारकांची नोंद आहे. या दोन्ही कार्यालयांतर्गत अंत्योदय लाभार्थ्यांची संख्या सुमारे तीन हजार आहे. तर दारिद्य्र रेषेखालील लाभार्थी सुमारे आठ हजार आहेत.

या दोन्ही घटकांना केंद्र सरकारकडून रेशनिंगवर गहू व तांदूळ दिले जाते. याशिवाय साखरेचे वाटप केले जात आहे. मात्र, साखरेला दिले जाणारे अनुदान केंद्र सरकारने बंद केल्याने गेली चार महिन्यांपासून दारिद्य्र रेषेखालील लाभार्थी साखरेपासून वंचित आहेत. दरम्यानच्या काळात अंत्योदय लाभार्थीना प्रति माणसी 500 ग्रॅम अनुदानित साखर वाटप केली जात असायची. त्यानंतर यामध्ये प्रत्येक शिधापत्रिकेला 500 ग्रॅम वाटपाचे आदेश निघाले. त्यात पुन्हा बदल करुन प्रत्येक शिधापत्रिकेला एक किलो साखर वाटपाचा बदल करण्यात आला. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने साखरेला दिले जाणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुढील महिन्यापासून या सर्वच लाभार्थींना साखर वाटप होणार नाही.

अंत्योदय व दारिद्य्र रेषेखालील लाभार्थींना पुरेसे धान्य वाटप करणे दोन्ही शासनाचे कर्तव्य आहे. मात्र, सणासुदीच्या काळात धान्य वाटपावर मर्यादा लादणे चुकीचे आहे. हळुहळू वितरण व्यवस्था बंद करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अन्नधान्य वितरण व्यवस्था क्षीण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

- गजानन बाबर, अध्यक्ष, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर्स फेडरेशन.

...Read More

V. S. News
सुरक्षा संघाच्यावतीने महागाई विरोधात “शिमगा’ आंदोलन

व्हीएस न्यूज – दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका उडाल्याच्या निषेधार्थ भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात सोमवारी निदर्शने करण्यात आली. भाजप सरकारच्या नावाने “शिमगा’ करत निषेध व्यक्‍त करण्यात आला.

प्रदेशाध्यक्ष मारुती कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात हे आंदोलन झाले. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा डॉ. रंजना पेडणेकर म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल, गॅस अशा जीवनावश्‍यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहे. व्यापाऱ्यांवर लादलेली जीएसटी चूकीची असल्याचे लक्षात आल्यानंतर आता “जीएसटी’मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. हे सरकारचे अपयश आहे. गो हत्या बचावच्या नावाखाली निरपराध नागरिकांचे खून सत्र सुरु आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतरही केंद्र सरकार या प्रश्‍नाकडे गांभिर्याने पाहत नाही, ही दुर्दैवी बाब आहे.

प्रदेशाध्यक्ष मारुती कदम यांनी राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयावर टीका केली. शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी दिवास्वप्नच ठरली आहे. अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीसाठी जेलभरो आंदोलन करावे लागले. याशिवाय पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असताना, स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रश्‍न सोडविण्यात चालढकल केली जात आहे. शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्यादृष्टीने ही बाब योग्य नाही. त्यामुळे शहराच्या पोलीस आयुक्तालयाचा प्रश्‍न त्वरित मार्गी लावण्याची गरज आहे.

या निदर्शनामध्ये अमित कांबळे, कल्याण अडागळे, संतोष खाडे, रवींद्र आडागळे, चंद्रकांत मुळे, आमीर शेख, दशरथ वाघमारे, रितेश देशमुख, पार्वती कांबळे, वंदना अडागळे, विजया बेंदळे, रेश्‍मा डोगरा, रंजना भोसले, नसीम कांबळे, सुषमा सोनवणे, मंजुषा वाघमारे, सतिश कदम आदी सहभागी झाले होते.

...Read More

V. S. News
तरुणांनी नवीन संशोधन क्षेत्राकडे वळावे – चित्रा बाविस्कर

व्हीएस न्यूज – नवीन संशोधनासाठी भारताला आजही पाश्‍चात्य देशांवर अवलंबून रहावे लागते. हे चित्र बदलण्यासाठी तरुणांनी संशोधन क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या नगरसचिव चित्रा बाविस्कर यांनी चिंचवड येथे केले.

अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्‌घाटन प्रसंगी नगरसचिव चित्रा बाविस्कर बोलत होत्या. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मिलिंद वाणी, सुरेश बागड, प्रबोधन संस्थेचे राष्ट्रीय संघटक दीपक येवले, प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरुडे, संस्थेचे अध्यक्ष रविंद्र मालपुरे, संस्थेच्या महिला शाखेच्या अध्यक्षा प्रतिभा पाखले, युवा अध्यक्ष प्रशांत ब्राम्हणकर यावेळी उपस्थित होते. दहावीतील नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेतर्फे बक्षीस वितरण करण्यात आले.

बाविस्कर म्हणाल्या की, पालकांनी लहानपणापासून मुलांच्या सर्जनशीलतेला आणि जिज्ञासू प्रवृत्तीला खतपाणी घातले तरच अधिकाधिक तरुण संशोधन क्षेत्राकडे वळतील. जे संशोधक होणार नाहीत, ते आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये निश्‍चितच सरस कामगिरी करून दाखवतील. धकाधकीच्या जीवनात आजचा भारतीय तरुण फक्त पैसा, प्रमोशन ह्याच्याच मागे धावत आहे. मात्र, देशाला संशोधकांची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी संशोधन क्षेत्रात उतरायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरुडे म्हणाले की, समाजाचे संघटन होण्यासाठी प्रबोधन संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवत आहोत. समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ मिळवून देण्याचे काम प्रबोधन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. अशावेळी समाजातील संघटनामुळे गरजू घटकापर्यंत पोहचता येणे सहज शक्‍य आहे. मात्र, त्यासाठी संघटन मजबूत असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्षपदी किरण अमृतकर, महिला अध्यक्षपदी भारती दशपुते, युवक अध्यक्षपदी स्वप्निल पाचपुते तसेच सामुदायिक विवाह सोहळा समन्वयकपदी रविंद्र मालपुरे यांची निवड जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरुडे यांनी ही निवड केली. मिलिंद वाणी, सुरेश बागड, दीपक येवले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ऋतुजा अमृतकर यांनी केले. प्रा. उदय पाटकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

...Read More

V. S. News
माझे जिवन हे माझ्या लेकरांसाठी – सिंधुताई सपकाळ

व्हीएस न्यूज - आज ज्या ठिकाणी मी आहे तिथून मागे वळून पाहिले तर दुसरे तिसरे कोणी नसून मीच आहे. इतकी मी आता पुढे गेलीय. ना दुःख ना आनंद यात खचले असते तर कधीच मरून गेले असते. जगतेय ती फक्त माझ्या लेकरांसाठी, असे मत अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

इनरव्हील क्लब पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी इनर व्हील निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापूरकर, पिंपरीच्या अध्यक्षा संगीता देशपांडे, पिंपरी स्टारच्या अध्यक्षा राधिका माकन, निगडी झेनेक्स संजुश्री मुनोत, क्लबचे सभासद व रोटरीयन आदी उपस्थित होते. यावेळी इनरव्हील क्लबच्या वतीने सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेस 51 हजाराची देणगी स्वरूपात चेक देण्यात आला.

त्या पुढे म्हणल्या की, जगा, ठामपणे स्वाभिमानाने जगा. तुम्हीच जगू व जगवू शकता. माझी लेकरच माझी उर्मी आहेत. संकटांनी मला उभे केले. मी संसारात रमले असते तर एक दोन मुलांचा सांभाळ करू शकले असते. मी माझ्या लेकरांची माय बनले, त्यांना सक्षम करू शकले, असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक सविता राजापूरकर यांनी केले. सूत्रसंचालन सुमन शिरूर यांनी केले. आभार प्रिती पाटील यांनी मानले.

...Read More

V. S. News
आयुक्‍त हार्डीकर यांच्याकडून थेरगावातील आरक्षणांची पाहणी

व्हीएस न्यूज – महापालिकेच्या आरक्षित जागांवर अतिक्रमण झाल्यामुळे थेरगाव येथील विकासाला खीळ बसली आहे. इच्छाशक्ती असताना देखील विकास साधता येत नसल्याची खंत नगरसेवकांनी व्यक्त केल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी थेरगाव येथे जाऊन विविध आरक्षित जागांची पाहणी केली. अतिक्रमणे हटविण्याचे आदेश ग क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिले आहेत. सर्व आरक्षणे ताब्यात घेऊन तातडीने विकसित केली जातील, असेही आश्‍वासन आयुक्त हर्डीकर यांनी दिले.

थेरगाव परिसर प्राधिकरणाच्या हद्दीत असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून या भागातील विकास दुर्लक्षीत राहिली आहे. सर्व्हे क्रमांक 33 मधील बस डेपोचे80 गुंठे जागा, सर्व्हे क्रमांक 36, 37 मधील खेळाच्या मैदानाची सुमारे तीन एकर जागा, सर्व्हे क्रमांक 32 आणि 33 पैकी या जागेतील प्रस्तावित उद्यानासाठी अडीच एकर जागा आरक्षित आहे. त्याचबरोबर कुणाल रेसिडन्सी ते थेरगाव स्मशानभूमी 12 मीटरचे दोन रस्ते प्रस्तावित आहेत. संबंधित जागा मालकांचा ताबा देण्यास विरोध असल्यामुळे आरक्षणे विकसित करण्यात अडथळे येत आहेत. या जागेची पाहणी करून आरक्षणे ताब्यात घेण्याकरिता जागा मालकांना विश्‍वासात घेण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना स्थानिक अपक्ष नगरसेवक कैलास बारणे यांनी पत्र दिले होते.

त्यावर आयुक्त हर्डिकर यांनी थेरगाव परिसरात जाऊन आरक्षित जागांची पाहणी केली. त्यातील काही जागांवर पत्राशेडचे अतिक्रमण हटवण्याचे आयुक्तांनी ग क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर आरक्षीत जागा ताब्यात घेण्यासाठी लवकरच जागा मालकांसोबत बैठक घेऊन प्रश्‍न सोडवला जाईल. लवकरात लवकर आरक्षणे विकसित केली जातील, असे हर्डीकर यांनी सांगितले. तर, जागा मालकांना योग्य मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न आहे, असे नगरसेवक कैलास बारणे यांनी सांगितले. यावेळी नगररचना विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर, स्थापत्य विभागाचे प्रवक्ते शिरीष पोरेडी, सव्हेअर सुहास शिंदे, उपअभियंता सुनील बागवानी, कनिष्ठ अभियंता राजेंद्र जगताप, नितीन निंबाळकर आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची अधिसूचना जारी

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरासाठी कळीचा मुद्दा बनलेला अनधिकृत बांधकामांचा प्रश्न राज्य सरकारने अखेर मार्गी लावला आहे. सरकारने राज्यभरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली असून, त्याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. त्यानुसार ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित केली जाणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अनधिकृत बांधकामांचा हा प्रश्न सुटावा म्हणून भाजप सरकारवर विरोधकांकडून वारंवार दबाव टाकण्यात येत होता. त्यासाठी राष्ट्रवादीने जन हाहाकार आंदोलन काढून या प्रश्नांसह अनेक प्रलंबित विषयांवर आवाज उठवला होता. अखेर या प्रश्नावर सरकारने अंतिम निर्णय घेऊन पिंपरी चिंचवडमधील जनतेला दिवाळीची भेटच दिली आहे.

३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची बांधकामे अधिकृत -

भाजप सरकारने जुलै महिन्यात अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची प्रारूप नियमावली जाहीर केली होती. या नियमावलीला महाराष्ट्र टाऊन प्लॅनिंग (एकत्रित संरचना) नियम २०१७ असे म्हटले होते. या निमयावलीमध्ये कोणती अनधिकृत बांधकामे अधिकृत करायची आणि कोणती करायची नाहीत, त्याबाबतचे स्पष्ट निकष प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी झालेल्या अनधिकृत बांधकामांनाच अधिकृत करणे, नद्या, कालवे, पूररेषा, रेडझोन, ऐतिहासिक क्षेत्र, कचरा डेपो, पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनक्षम म्हणजे डोंगराळ उतार भागातील आणि धोकादायक अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यात येणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. तसेच कोणती बांधकामे अधिकृत होऊ शकतात, त्याची वर्गवारी प्रसिद्ध करण्यात आली होती.

या निर्णयामुळे इनामाच्या जागेत संबंधित मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र न घेता अनधिकृत बांधकाम केले असल्यास असे प्रमाणपत्र घेऊन बांधकाम अधिकृत होणार आहे. आरक्षणाच्या जागेत झालेली अनधिकृत बांधकामे सुद्धा अधिकृत केली जाणार आहेत. मात्र संबंधित आरक्षण मैदान, उद्यान, मोकळी जागा वगळून अन्य ठिकाणी हलविल्यानंतरच आरक्षणातील अनधिकृत बांधकामे अधिकृत होतील. पिंपरी चिंचवडमधील हजारो अनधिकृत बांधकामधारकांसाठी हा मोठा दिलासा देणारा निर्णय मानला जात आहे.

...Read More

V. S. News
लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

व्हीएस न्यूज - आपल्या दिलखेच अदाकारीने आणि नृत्याविष्काराने लावणी रसिकांना घायाळ करणार्‍या आणि राज्यातील तमाम लावणी रसिकांवर गेली अनेक दशके अधिराज्य गाजविणार्‍या ज्येष्ठ तमाशा कलावंत, लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे यांना कलेतील योगदानाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सोमवारी दिल्ली येथील शानदार समारंभात ‘वयोश्रेष्ठ सन्मान’ या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी नागपूर जिल्ह्याचे डॉ. महादेवराव मेश्राम आणि कोल्हापूरच्या मनोरमा कुलकर्णी यांनाही सन्मानित करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयाच्यावतीने दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात मंचावर राष्ट्रपती कोविंद, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री क्रिष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, सचिव जी. लता कृष्णराव उपस्थित होत्या. सृजनशील कलेच्या क्षेत्रात मंगला बनसोडे यांना सन्मानित करण्यात आला. यावर्षी वयोश्रेष्ठ सन्मान हा विविध ११ श्रेणींमध्ये २२ लोकांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र असे होते.

महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखल्या जाणार्‍या लावणी कलेतील एक आग्रगण्य कलाकार म्हणून मंगला बनसोडे यांचे नाव घेतले जाते. पणजोबा नारायण खुडे, आजोबा भाऊ नारायणगावकर, आई विठाबाई नारायणगावकर यांच्यापासून चालत आलेली लोककला जोपासत त्यांनी आपला मुलगा नितीनकुमार बनसोडे यालाही या कलेत उतरविले. या कलेत त्यांची पाचवी पिढी नितीन बनसोडेच्या रुपाने कार्यरत आहे.

तमाशा कलेतील मंगला बनसोडे यांचे आजोबा भाऊ बापू नारायणगावकर यांना १९६१ साली तात्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या आई विठाबाई नारायणगावकर यांना १९९० साली तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता मंगला बनसोडे यांना राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यामुळे कलेतील योगदानाबद्दल एकाच घरातील तिघांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.

कलेच्या सेवेची पावती मिळाली - मंगला बनसोडे

पणजोबा, आजोबा, आई यांच्यापासून चालत आलेली कला जोपासण्याचे काम लहानपणापासून गेली साठ वर्षे करत आहे. मुलगाही आज कलेची सेवा करत आहे. आयुष्यभर कलेची जी निस्वार्थीपणे सेवा केली. त्या सेवेची पावती राष्ट्रपतींच्या हस्ते झालेल्या सन्मानाने मिळाली आहे. हा सन्मान माझा एकटीचा नाही. तो माझी आई, माझे संपूर्ण राज्यातील सहकारी कलाकार आणि मला डोक्यावर घेणार्‍या रसिक मायबापांचा आहे. या सन्मानामुळे धन्य झाल्यासारखे वाटते. आयुष्याच्या शेवटापर्यंत कलेची आणि रसिकांची सेवा करणार.

...Read More

V. S. News
मागल्यमय दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या

व्हीएस न्यूज - चैतन्य आणि मांगल्याचे वातावरण निर्माण करणारा, लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणारा, सर्वत्र प्रकाश, फटाक्‍यांची आतषबाजी, पंचपक्वानांची गोडी आणि नात्या-नात्यांमध्ये स्नेह व मैत्रीची मधुरता वाढविणारा दीपोत्सवाचा सण आता केवळ काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सज्ज झालेल्या बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत.

बालचमूंकडून किल्ले बांधकामाची लगबग सुरू झाली आहे. सर्वांच्या घरा-घरांतील स्वच्छता आणि रंगरंगोटीची कामे अंतिम टप्प्यात असून दिवाळीचा फराळ बनविण्याची जोरदार तयारी महिलांनी सुरू केली आहे. आता मुलांना शाळांना सुटी मिळणार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांसह सर्वांना आता उत्सवाचे वेध लागले आहेत. चिमुकल्यांनी किल्ले बांधकाम सुरू केले असून, सैन्य खरेदीसाठी तर त्यांचे आईबाबा त्यांना नवीन कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत धाव घेत आहेत. उत्सवानिमित्तच्या मोठ्या आर्थिक उलाढालीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. आकर्षक आणि रंगीबेरंगी पणत्या रस्त्यांवर ठिकठिकाणी विक्रीसाठी मांडल्या आहेत. दुकानांबाहेर लटकणारे छोट्या-मोठ्या आकारातील रंगीबेरंगी आकाशकंदील, तोरण, रांगोळ्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामुळे बाजारपेठा इंद्रधुष्यासारख्या दिसत आहेत.

आधी मातीच्या साध्या रंग नसलेल्या पणत्या असायच्या मात्र, काही वर्षांपासून मातीच्याच पण नव-नवीन आणि विविध रंगांतील आकर्षक पणत्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे मातीच्या पणत्यांबरोबरच पेटवल्यानंतर सुगंध आणि सुवास पसरवणाऱ्या फॅशनेबल पणत्या ग्राहकांना भुरळ पाडत आहेत. ग्रीन, ऍपल, लेमन, स्ट्रॉबेरी अशी त्या नवीन बाजारात आलेल्या पणत्यांची नावे आहेत. शहरातील ठराविक दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या या पणत्यांच्या किंमती ५० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत आहेत. बारामतीत भिगवण चौक, मंडई व दुकानांमध्ये या रंगेबेरंगी पणत्या उपलब्ध आहेत.

आकाश कंदिलांच्या किमती वाढल्या

दरवर्षीप्रमाणे बाजारपेठांमध्ये आकाश कंदिलांचा झगमगाट आहे. यंदाही आकाश कंदिलांमध्ये नवीन प्रकार पाहायला मिळत आहेत. साध्या पातळ व जाड रंगीबेरंगी कागदापासून बनविलेले, प्लास्टिकचे तसेच कापडी आकाशकंदील सुद्धा ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. यावेळी आकाश कंदिलांमध्ये नवीन प्रकार दिसत आहेत,सजावटीसाठी वापरले जाणारे छोट्या आकारांतील आकाश कंदील ५ रुपयांना मिळत आहेत. तर इतर प्रकारांतील आकाश कंदिलांच्या किमती साधारणपणे २५ रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत आहेत. यावर्षी २० ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत किमती वाढल्या आहेत.

किराणा मालांच्या दुकानांमध्ये गर्दी…

दिवाळी म्हटले की, पंचपक्कवानांचा फराळ आलाच. लाडू, करंजी, चकल्या, शंकरपाळ्या, अनारसे, चिवडा या प्रमुख पदार्थांबरोबरच इतर अनेक पदार्थांची फराळात रेलचेल असते. हे पदार्थ बनविण्यासाठी आवश्‍यक साहित्य खरेदीसाठी सध्या ग्राहकांनी किराणा मालाच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी केली आहे. रवा, तेल, साखर, मैदा, पोहे, चना डाळ, खोबरे या वस्तुंच्या किमतींही गगनाला भिडल्या आहेत.

रंगीबेरंगी तोरण, हार, फुलमाळा…

बाजारात यंदा ग्राहकांना आकर्षित करतील असे तोरण, हार दिसत आहेत. गृहसजावटीसाठी महिला तोरण, हार, नकली फुलमाळा यांना अधिक महत्त्व देतात. त्यामुळे जरी त्यांच्या किंमतीत वाढ जरी झाली तरी घर सुंदर बनवण्याच्या दृष्टीने ग्राहक फुल माळा, तोरण यांना अधिक पसंती देत आहेत.

लहान मुलांना परीक्षा संपून आता सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे मुलांनी किल्ले बनवण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी बनवलेल्या किल्ल्यावर ठेवण्यासाठी लागणारे सैन्य बाजारात उपलब्ध झाले आहेत. ते घेण्यासाठी मुले गर्दी करत आहेत.

...Read More

V. S. News
शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, १८ फेब्रुवारीला परीक्षा

व्हीएस न्यूज - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी आणि आठवीचे शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी होणार असून, ८ नोव्हेंबरपासून आॅनलाइन अर्ज भरता येणार आहेत.

इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेबरोबरच विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षाही याच दिवशी घेतली जाणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १२.३० यावेळेत प्रथम भाषा व गणित आणि दुपारी १.३० ते ३ या वेळेत तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांच्या परीक्षा होणार आहेत. अधिक माहितीसाठी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in

www.puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
महापालिकेच्या बॅडमिंटन हॉल “ऑनलाइन बुकिंग’मध्ये “सेटींग’ ?

व्हीएस न्यूज महापालिका आणि क्रीडा विभागाकडून ठिकठिकाणी बॅडमिंटन हॉल बांधण्यात आलेले आहेत. या ठिकाणी खेळण्यासाठी नागरिकांना आपला ग्रुप तयार करून “ऑनलाइन बुकिंग’रावी लागते. मात्र या “बुकिंग’मध्येच“सेटींग’ होत असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी केला आहे.

यासंदर्भात संतोष बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले असून याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये नागरिकांच्या सोईसाठी महापालिकेच्या माध्यमातून क्रीडा विभागातर्फे सुसज्ज असे एकुण 11 बॅडमिंटन हॉल बांधण्यात आले आहेत. या ठिकाणी खेळण्यासाठी आपला ग्रुप व वेळ याची “ऑनलाइन बुकींग’ करणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने क्रीडा विभागाचे स्वतंत्र संकेतस्थळ देखील उपलब्ध केले आहे. “बुकींग’ खुल्या होण्याच्या वेळांविषयीची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळासह क्रीडा संकेतस्थळावरही दिली जाते.

त्यानुसार, नागरीक “बुकींग’ करतात. मात्र, विशिष्ट वेळेचे काही ठराविक लोकांनाच “बुकींग’ मिळते. इतरांना मात्र त्या वेळेची “बुकींग’ उपलब्ध होत नाही. क्रीडा विभाग आणि बुकींग करणारा संगणक विभाग यांच्या संगनमताने तर हे“सेटींग’ होत नाही, अशी चर्चा खेळाडूंमध्ये आहे. अनेक खेळाडूंना बुकींग अभावी बॅडमिंटनच्या सरावाला मुकावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये महापालिकेच्या कारभाराविरोधात नाराजी आहे. याबाबत तोडगा काढणे गरजेचे असून बॅडमिंटनसाठीच्या “ऑनलाइन बुकींग’च्या प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी संतोष बारणे यांनी केली आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!